वेदना
आठवणी चालून येतात
अचानक.........
एखाद्या बन्दुकीच्या गोळी सारख्या,
आरपार भेदून जातात
पुन्हा जखमी करून.
तरीहि आठवतेच........
एखादी प्रसन्न सन्ध्याकाळ
गन्धित क्षण,
जगावेसे वाटणारे.
हातात हात गुम्फलेले आपले
आणि.........................
तू म्हणालीस "नको रे सैल सोडुस"
नाहीतर...................
"निसटून जातील तुझ्या हातातून."
............................
अशाच कीतितरी जीर्ण जखमा
अजुनहि काहीश्या ओल्या,
काही बरया होत आलेल्या,
वेदनावतात,
पुन्हापुन्हा,
आठवणीन्चा धक्का लागून.
मी मात्र प्रयत्नात,
सार काही विसरण्याचा.
निश्फळ ! !
निरर्थक ! ! !
निरन्जन वहाळेकर
प्रतिक्रिया
17 Sep 2014 - 11:12 pm | कवितानागेश
वेदनावतात हा शब्द नवीन वाटतोय.
चांगला प्रयत्न.
18 Sep 2014 - 8:03 pm | अजय जोशी
हातात हात गुम्फलेले आपले
आणि.........................
तू म्हणालीस "नको रे सैल सोडुस"
नाहीतर...................
"निसटून जातील तुझ्या हातातून."
वा