आम्हा घरी धन (चित्रांकीत)

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
23 Aug 2014 - 7:03 pm

मोदक यांच्या 'आम्हा घरी धन' या मालिकेच्या धर्तीवर ध्वनिचित्रफितींचा एक समृद्ध संच मिपावर तयार व्हावा अशा हेतूने हा धागा काढला आहे.

मराठी/ हिंदी/ इंग्रजी चित्रपटातले काही प्रसंग आपल्या मनावर कायमचे कोरले जातात. चित्रपटगृहात शक्य नसले तरी डिव्हिडी/ व्हिसीडी/ ऑनलाईन अशा स्वरूपात उपलब्ध असलेले चित्रपट पाहताना रिवाइंड करून ते परत परत पाहिले जातात. तशा मोहात पडण्यामागे मनाची पकड घेणारे संवाद, ढंगदार संवादफेक, कसलेला अभिनय, भावस्पर्शी घटनाक्रम, थरार, रहस्यभेद, अप्रतिम अ‍ॅनिमेशन्स, कसलेल्या अभिनेत्यांमधली जुगलबंदी अशी अनेकविध कारणे असतात.

कित्येक वेळा कालांतराने असे काही प्रसंग तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट असल्याचे लक्षात आले, किंवा त्या मागची पार्श्वभूमी कालबाह्य ठरल्याचे लक्षात आले तरी आपल्या मनावर पडलेली छाप अमीट आहे आणि या प्रसंगांचा आनंद आजही लुटता येतो असे अनुभवता येते.

क्लिंट ईस्टवूडना सुपरस्टारचा दर्जा मिळवून देणारी 'डर्टी हॅरी' ही एक गाजलेली व्यक्तीरेखा. डर्टी हॅरीचे चार 'सिक्वेल' झाले - मॅग्नम फोर्स, द एनफोर्सर, सडन इम्पॅक्ट आणि द डेड पूल. कायद्यातल्या पळवाटा शोधून आपली सुटका करून घेण्यात माहिर असलेल्या गुंडांना त्यांच्याच भाषेत उत्तर देताना प्रसंगी कायदा हातात घेणारा हॅरी कॅलाहन हा पोलिस अधिकारी त्या काळी समीक्षकांच्या टीकेचा धनीही ठरला होता. स्वतः ईस्टवूडना त्यांचा फॅसिझम किंवा अतिउजव्या विचारसरणीशी काही संबंध नाही असा खुलासा देण्याची वेळ आली होती.

गुंड पुंडाशी निडरपणे चार हात करणार्‍या राकट, रासवट आणि बेदरकार हॅरी कॅलाहनच्या तीन निवडक ध्वनिचित्रफितींनी या धाग्याची सुरूवात करतो.

१. कॉफी शॉपमधल्या चकमकीचा थरार - एकांड्या शिलेदारासारखा गुंडांचा सामना करतेवेळी तुम्हाला 'आम्ही' सुखासुखी बाहेर जाउ देणार नाही असे गुंडांच्या म्होरक्याला शांतपणे समजावून सांगणारा हॅरी 'आम्ही' या शब्दाचा 'स्मिथ, वेसन आणि मी' असा उलगडा करत असतानाच स्मिथ अँड वेसन रिव्हॉल्वरच्या जबरदस्त प्रहारशक्तीची चुणूक दाखवून देतो. या थरारनाट्यातला लॉरेटाला ताब्यात घेत तिच्या माथ्यावर पिस्तुल टेकवणार्‍या गुंडासमोर नांगी न टाकता उलट त्याच्यावरच जोरदार दबाव टाकत त्याला गर्भगळित करतानाचा ईस्टवूडचा 'गो अहेड, मेक माय डे' हा संवाद तुफान गाजला होता.

२. २. द एनफोर्सर - निरपराध लोकांना ओलीस ठेवणार्‍या गुंडांच्या टोळीशी 'वाटाघाटी करण्याची' हॅरीची अनोखी पद्धत!

३. लिफ्टमधला संवाद - निष्कारण खिजवणार्‍या गुंडाच्या फाजील आत्मविश्वासाला जोरदार हादरा देणारी हॅरीने दिलेली 'समज' (बोलीभाषेत 'सुका दम').

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

23 Aug 2014 - 9:23 pm | कवितानागेश

मस्त आहेत वरचे तिन्ही सीन्स. :)

पैसा's picture

23 Aug 2014 - 9:59 pm | पैसा

जरा सवड मिळाली की येतेच परतून माझ्या आवडीच्या क्लिप्स टाकायला.

दोन नम्बरची क्लिप दिसत नाहीये !!

दोन नंबरची क्लिप म्हणजे अगदी कहानी पुरी फिल्मी है! मजा आली :-D

पैसा's picture

25 Aug 2014 - 7:27 pm | पैसा

मुघल ए आझम सिनेमातील दिलीपकुमार आणि मधुबालावर चित्रीत झालेलं प्रेम जोगन बनके, त्याच्या मूळ काळ्या पांढर्‍या अवतारातच मला आवडतं. अतिशय हळूवार, रोमँटिक असं दृश्य. कितीही वेळा पाहिलं तरी समाधान होणार नाही!

इनिगोय's picture

25 Aug 2014 - 10:57 pm | इनिगोय

आज रिचर्ड अॅटनबरोंचं निधन झालं. त्यांचं स्मरण म्हणून इथे त्यांच्या चित्रपटातली एखादी क्लिप देईल का कोणी?

रिचर्ड अ‍ॅटेनबरोंच्या गांधी चित्रपटातील हे एक दृष्यः

बहुगुणी's picture

25 Aug 2014 - 11:43 pm | बहुगुणी
पैसा's picture

26 Aug 2014 - 10:19 am | पैसा

हा एकूण सिनेमा फार छान वाटला होता. त्यातही या सीनमधे अनुपम खेरचा अभिनय अगदी अस्सल, काळजाला भिडणारा होता.

पैसा's picture

3 Sep 2014 - 1:16 pm | पैसा

गंदी नाली के कीडे!

या अग्लीला बघताना कितीही किळस आली तरी त्याचा अभिनय नकळत सल्युट घेउन जातो.

खरतर हे सगळ पिक्चरच पोस्ट करावं लागेल येथे. मला, माझ्या मुलाला अन नवर्‍याला डायलॉग अन डायलॉग पाठ आहेत. पिक्चर फ्रेम बाय फ्रेम पाठ आहे. अन तरीही एखाद्या लोळायच्या दिवशी आम्ही हे पिक्चर लावुनच लोळण पसंत करतो.

पैसा's picture

8 Sep 2014 - 10:58 am | पैसा

महाभारतः

हा अख्खा सिनेमाच लै भारी आहे!

अग्निपथ मधला माझा आवडता संवाद :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailer