गजरा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
21 Aug 2014 - 11:55 pm

माधव राव हृदय धक्क्याने गेले..अन सुमतीचे भाव विश्व बदलले.
रिटायर्ड झाले अन ६ महिन्याच्या आतच माधव राव गेले..
सुमती एकटी पडली..
एकुलता एक मुलगा परदेशात स्थायिक झाला होता..
मुलगा तिकडेच बोलावत होता पण सुमती बाई म्हणाल्या मला जरा वेळ दे विचार करायला...
खरं तर त्यांना भारत व नातेवाईक सोडून जाववत नव्हते..
माधव व सुमतीचे एक मेकावर जिवापाड प्रेम होते..तस ठरवून च लग्न झाले होते पण मस्त जमले होते सुर दोघांचे.
सुमतीला मोग~याचा गजरा खुपा आवडायचा व माधव तिला नेमाने आणून देत असे..
तसंच कधी छोटं मोठं भांडण झालं व सुमती नाराज झाली की गजरा हे एकमेव त्यावर औषध असे...
दुपारचे जेवण झाले..खरं तर सुमतीला हल्ली फारशी भूक लागत नसे माधव गेल्या पासून..
व ति बेडरूम मध्ये पलंगावर पहुडली...
व तिला हलकीशी डुलकी लागली..
मोग~याच्या मंद सुवासाने तिच्या चित्तवृत्ती उल्हसित झाल्या ...बघते तर समोर माधव उभा होता..
तुम्ही? ति म्हणाली
हो बरेच दिवसात तुला भेटलो नव्हतो..म्हणून आलो..
का हो असे सोडून गेलात मला..अन ते पण अचानक? तिच्या डोळ्यात पणी तरळले..
खरंच मला जायच नव्हत ग..पण गेलो..
मग आता नाही ना जाणार???
माझ्या काहीच हातात नाही..तुला जाण्यापूर्वी गजरा आणण्याची इच्छा होती..आणणार पण होतो पण अचानक जावे लागले..
ते प्रॉमिस पूर्णं करण्या साठीच आलो आहे..हा घे गजरा..माळ आपल्या हाताने..माधव म्हणाला..
हो माळते मी गजरा ..पण प्रॉमिस करा ..मला सोडून जाणार नाही म्हणून....
असे म्हणत तिने गजरा केसाकडे नेला अन पाहिले तर माधव नव्हता...
माधव ..प्लीज नका जाऊ..असे ति ओरडली..
सुमती एकदम जागी झाली ...
खोलीत कुणीच नव्हते..मग तो गजरा..माधव..म्हणजे हे स्वप्न? तिला काहीच कळेना..
तेव्हढ्यात आत शेजारच्या सुनंदा बाई आल्या..
तुम्ही ठीक आहात ना? सुमतीबाई..एकदम घरातून ओरडण्याचा आवाज आला म्हणून आले..
नाही मी ठीक आहे..सुमती म्हणाली
अन हे काय कसला सुवास सुटला आहे मोग~याचा सुमतीबाई..आणी हे काय? गजरे तुम्ही केंव्हा आणले? ..बाजूच्या स्टूलवर २ मोग~याचे गजरे दिसत होते त्या कडे बघत सुनंदा म्हणाली....
छे गं मी नाही आणले....अन त्यांना स्वप्न आठवले ...
अन सुमती चे डोके गरगरू लागले..काय होते ते तिलाच कळेना...
बेडरूम मध्ये मात्र मोग~याचा सुवास ओसंडून वाहतं होता.

कथा

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

22 Aug 2014 - 12:00 am | संजय क्षीरसागर

नाना महाराजांचा चमत्कार का?

स्पा's picture

22 Aug 2014 - 11:43 am | स्पा

=))

तुमचा अभिषेक's picture

22 Aug 2014 - 12:15 am | तुमचा अभिषेक

मस्त काका, गजरा मोहोब्बतवाला, गजरे ने लेली मेरी जान, अन गेला माधव कुणीकडे ;)

काळा पहाड's picture

22 Aug 2014 - 12:55 am | काळा पहाड

नारायण धारपांच्या एखाद्या गोष्टीतला उतारा आहे का हा? वाचल्यासारखा वाटतोय.

चित्रगुप्त's picture

22 Aug 2014 - 1:47 am | चित्रगुप्त

माधव राव हृदय धक्क्याने गेले

आणि..

समोर माधव उभा होता..

यावरून 'माधवराव' आणि 'माधव' हे वेगवेगळे होते की काय, असे वाटले.
ऐसा भी होता है यारो.
पुढील 'क्रमशः' प्रेमकहाणीच्या प्रतिक्षेत.

पैसा's picture

22 Aug 2014 - 9:51 am | पैसा

जरा जास्त विस्ताराने लिहायला हवं होतं.

वेल्लाभट's picture

22 Aug 2014 - 10:27 am | वेल्लाभट

चांगलं आहे पण तुटक वाटलं खूप.
हां, ते माधवराव्/माधव ते मलाही जाणवलं.

संजय क्षीरसागर's picture

22 Aug 2014 - 11:39 am | संजय क्षीरसागर

माधव हा गजरे विकणारा आहे. तो नियमीत गजरे आणून देत असे. पण माधवराव असतांना मोगर्‍याच्या गंधातून पुढचे विषय निघायचे. आता ते गेले म्हटल्यावर गजर्‍यांचा काय उपयोग? हा एक पॉइंट झाला.

दुसरी बाजू अशी की, हा माधव गजरेवाला डायरेक्ट बेडरुममधे जातो म्हणजे काय? त्यामुळे नायिकेची मती गुंग झाली आहे.

चित्रगुप्त's picture

22 Aug 2014 - 10:52 pm | चित्रगुप्त

हा माधव गजरेवाला डायरेक्ट बेडरुममधे जातो म्हणजे काय?

तेव्हढ्यात आत शेजारच्या सुनंदा बाई आल्या..
तुम्ही ठीक आहात ना? सुमतीबाई..एकदम घरातून ओरडण्याचा आवाज आला म्हणून आले..

सुनंदाबाईंची चाहूल लागल्याने माधव पळाला/लपला की काय?
...रहस्यकथा आकार घेते आहे.

अकुकाकांच्या धाग्यांचा स्वेटर पाहून मझ्याही डोळ्यात पणी तरळले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Aug 2014 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे मेरे अविकाका जियो...! सालं कल्पना छान होती.
साला इथपर्यंत आला मोगर्‍याचा दरवळ.

-दिलीप बिरुटे