तोतोल चा पुल : एका बंगाली चित्रपटाची कथा, भावांतरीत

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in जनातलं, मनातलं
18 Aug 2014 - 2:36 pm

हा चित्रपट मी खुप आधी दुरदर्शनवर पाहिला होता एका पावसाळी शनिवारी, काल असाच एक शनिवार होता अन मुख्य म्हणजे मी बंगालात होतो, तेव्हा हा नितांतसुन्दर प्लॉट परत आठवला, मी हा प्रयत्न फ़क्त त्या कलाकृतीच्या आठवणी जागवायच्या म्हणुन करतोय, पात्रांची नावे, अभिनेत्यांची नावे, अगदी फ़िल्म चे नाव हि मला आठवत नाहिए पण कथा पुसटशी आठवते आहे, तिची मागे केलेल्या “बुल दे सुफ़” अन “ दगडाच्या सुप सारखी ही एक भावनिक पुनर्बांधणी, कशी वाटते नक्की सांगा”

तोतोल चा पुल : एका बंगाली चित्रपटाची कथा, भावांतरीत

पुर्व बंगालात “बिक्रमपुर” नावाचा जिल्हा आहे, आता तिथे बांग्लादेश आहे, मेघना अन पद्मा नद्यांच्या दोआबात वसलेला हा जिल्हा आहे अन इथे इतर ही छोट्या छोट्या पुष्कळ नद्या आहेत, अश्याच एका कालिंदी नावाच्या छोट्या नदीतिरी वसलेल्या कालिपुर गावात घडलेली ही एक गोष्ट आहे. गाव तसा छोटेखानीच जास्त पसारा नव्ह्ता गावचा, एक काली मंदिर त्याच्याच ओसरीत भरणारी प्रार्थमिक शाळा, अन मंदिराच्याच खोलीत पुजारी चट्टोपाध्याय सोबत राहणारे मास्टर बिभुती डे ह्यांना सगळे गाव “मास्टर बाबू” म्हणत असे, पहिली ते पाचवी अशी ही शाळा मास्टर बाबू स्वतः सांभाळत असत. गावचे तसे बरे होते, गरजे पुरता घमघमाट सुटणारा अरवा तांदुळ पिके, कालिंदी मधे जाळे फ़ेकता गरजेपुरती मासळी पण मिळत असे, रोहु कतला वाम इत्यादी भरपुर मासे होते कालिंदीच्या पोटी, सकाळ संध्याकाळ घंटेचा मधुर स्वर गावाला पावित्र्य देत असे. खड्या आवाजात परवचे म्हणणारी मुले गावाच्या भविष्याची ग्वाही देत असत.

अश्या ह्या शांत अन कथेत शोभेल अश्या सुंदर गावाला एकच त्रास होता, गावाच्या पुर्वेला, उत्तरेला अन दक्षिणेला शिवार, शिवारापलिकडे तीनही दिशांना दाट जंगल होते, कलकत्याला जाणारा मुख्य लोहमार्ग अन महामार्ग होते पश्चिमेला अन मधेच वाहायची ती कालिंदी, कालिंदी वर पुल नव्ह्ता तशी कालिंदी जास्त खोल किंवा धोकादायक नव्ह्ती लोकं तर सुकी धोतरे सुतळीने डोईवर बांधुन नदीपल्याड जात अन तिकडे तेच धोतर परिधान करुन कामावर जात, अन बाकी गावात एकच नावाडी होता , त्याचे नाव होते बिभास मंडल, त्याला सगळे प्रेमाने “बि्भा दा” म्हणत असत, साधारण ६२ वर्षांचा बिभा दा हा विधुर होता, तसेच त्याचे मुलगा अन सुन ही कॉलरा ने निवर्तले होते, आपल्या नदी किनारच्या खोपटीत बिभा दा, अन त्याचा नातु तोतोल राहात असत, तोतोल काही त्याचे खरे नाव नव्ह्ते तर बंगाली पद्धतीने ठेवलेले डाकनाम उर्फ़ टोपणनाव होते, खरे कोणाला आठवायचे ही नाही!!! सगळा गाव त्याला तोतोल म्हणुनच ओळखत असे, त्याचे मित्र बिभा दा ला “तोतोल चे दादाभाई” असे ओळखत असत, लांब वाश्याने नाव रेटता रेटता बिभा दा कितीतरी वेळा प्रवासी मंडळीस कौतुकाने तोतोल कसा कविता पाठ करतो, त्याला आपण कलेक्टर कसे बनवणार हे सांगत असे, सातआठ वर्षाचे ते निरागस पोरच बिभा दा च्या जगण्याचे कारण होते. प्रवासी नेणे आणणे ह्यात बिभा दा ला खुप घबाड होते असे नाही पण तांदुळ, तेल , मीठ, डाळ, मसाला इत्यादी मिळत , कलकत्याहुन आलेल्या जीवन बसु वाण्याच्या गोणी अलिकडे आणल्यावर. मासळी तर घरापुढे लागेल तितकी होतीच. असाच एक दिवस सकाळ सकाळ कौशिक पाल धावत आला होता अन बिभादा चे दार जोरजोरात वाजवत होता…

“बिभादा, दार उघडा जल्दी करा बिभादा”

“कोण रे कोण आहे तो?? “ बिभा दा ने झोपेतच विचारले,

“दादा मी कौशिक पाल, अहो माझ्या पत्नीस फ़ार बरे नाहीए हो”

तशी बिभादा झटकन उठला , तोतोल ला उठवले अन दार उघडले

“काय झाले पाल मोसाय??”

“अहो माझी कादंबिनी घेरी येऊन पडली , वैद्य म्हणाला कलकत्याच्या डॉक्टर शिवाय पर्याय नाही, जल्दी करा नाव काढा मला पलिकडे सोडा”

बिभादा जोरात ओरडला “तोतोल बाळा बाहेर ओढलेली नाव आत लोट अन वासा तयार ठेव, कौशिक घाबरु नकोस पोरीला काही होणार नाही, तु अन मी तिला झोळी करुन इथवर आणु तु शेजारच्या सेन काकांना उठव अन सोबत घे त्यांना कलकत्याची पुर्ण महिती आहे, चल जल्दी कर”

एव्हाना कौशिक डोळे पुसत बिभादा च्या मागे धावला होता, अन साताआठ वर्षांचा तोतोल जीव लावुन ती त्याच्यासाठी मोठी असलेली नाव पाण्यात लोटायच्या उद्योगाला लागला होता, दहा मिनिटात बिभा दा , कौशिक ,सेन काका अन सेन काकांचा मुलगा परितोष चौघे कादंबिनीस घेऊन आले होते, सगळे झटकन नावेत बसले तसे बिभा दा म्हणाला,

“तोतोल डब्यात भात ठेवला आहे अन इलिश पण मी नाही आलो तर जेवुन शाळेत जा अन मास्टर बाबुं ना पण सांग दादाभाई कलकत्याला गेलेत म्हणुन, आत्ता कडी लाऊन झोप तु आत” आजारी कादंबिनी मासी पाहुन उदास झालेल्या तोतोल ने फ़क्त मान डोलवली अन माघारी वळला.

एव्हाना सकाळ झाली होती, तोतोल स्वतःच उठला, त्याने आन्हिके आटोपली अन डब्यातला भात थोडा मासळी सोबत खाल्ला, खाकी दप्तर टांगले अन शाळेत पोचला, हळुच तो ४थी च्या मुलांस गणिते घालणार मास्टर बाबूंच्या पाठीमागे जाऊन उभा राहीला, त्यांना तसे जाणवताच ते मागे वळले पाहीले ते काळेभोर टपोरे डोळे अन पिंगट केस असलेला गोंडस तोतोल उभा होता,

“ह्म्म्म तोतोल महाशय कलेक्टर व्हायचे आहे न आपण दादाभाईंसाठी तुझ्या? मग असा अभ्यास सोडुन माझ्या मागे फ़िरुन का होणार आहेस बाळा ?”

“ते म्हणजे मास्टरबाबू, दादाभाई कलकत्याला ला गेलेत, कादंबिनी मासी ला बरे नाही न म्हणुन कौशिक काका, सेन आजोबा, परितोष दा सोबत आहेत, ते म्हणाले होते मास्टर बाबूंस सांग म्हणुन आलो”

“अरे!!! परवा तर हसरी नाचरी होती ती पोर!! काय असे झाले अचानक देव जाणे, असो!!! ते लोकं परततील त्यानंतर मी तिच्या आरामाची सोय करुन ठेवेल हो वैद्य महाराज सोबतीला घेऊन, बरे झाले मला सांगितलेस तु बाळा, अन हो संध्याकाळपर्यंत ती मंडळी येणार नाहीत , तेव्हा दुपारी तु माझ्याच सोबत जेव हो तोतोल” असे फ़र्मान सुटले

मान डोलवत तोतोल आपल्याजागी परतला अन कविता अभ्यासु लागला. मधल्या सुटीत मास्टर बाबू नी कौशिक च्या घरची चावी घेऊन त्याच्या घरी एक बेड तयार केले, सोबत आलेल्या वैद्य महाराजांनी शक्तिवर्धक काढे बनवुन ठेवले अन ते येणा-या लोकांची वाट पाहु लागले. शाळा पाचवीतल्या शिशिर दास च्या हवाली करुन, शिशिर सगळ्यांना गप बसवत अभ्यास घेऊ लागला तेव्हाच ते निघाले होते. संध्याकाळी ५ च्या सुमारास नाव परतताना दिसली कौशिक च्या आधाराने कादंबिनी झोळीत बसली तसे सगळ्यांनी तिच्या घरी गर्दी केली,

“डॉक्टर बोललेत थोडा अशक्तपणा आहे तेव्हा आराम करायला पहिजे” असे कौशिक बोलल्यावर सगळी मंडळी पांगली, त्याला काढा कुठे ठेवला आहे त्याचे जेवण कुठे ठेवले आहे हे सांगुन वैद्य महाराज, बिभादा अन मास्टर बाबू परत निघाले, काली मंदिर च्या आधीच वैद्यबुवा घरी गेले अन बोलत बोलत उरलेले दोघे मंदिर/शाळे पाशी आले. तोतोल दादाभाई पाहताच आनंदाने उड्या मारत आला अन त्यांचा हात धरला.

“ तर मी काय म्हणत होतो बिभा दा, उद्या तु मला सकाळी आठ ला पलिकडे ने, एरवी मी पोहत गेलो असतो धोतर डोई वर बांधुन, पण उद्या काही कागद्पत्रे आहेत सोबत तर तु हवासच!!! नाही का ?”

“हो बाबू मोसाय, तुम्ही या”

सकाळी तोतोल शाळेसाठी तयार झाला तसे मास्टरबाबू घरा बाहेर उभे होते, “तोतोल, नीट रहा, शिशिर दा सांगेल तसा अभ्यास कर, दंगा करु नको, मी संध्याकाळ पर्यंत येतो हो” असे ते म्हणाले, तोतोल शाळेला उड्या मारत निघाला तसे बिभादा ने नाव पाण्यात लोटली होती.

नाव पाण्यात रेटत, त्याने मास्टरबाबुंस विचारले
“आज काही विशेष आहे का बाबू ? नाही धोती पण आज खळ मारलेली आहे तुमची” चाचरत तो बोलला

“अरे बिभा दा, खास माझ्यासाठीच नाही गावासाठी होईल जर आज काम झाले तर, मी कलकत्याला कमिश्नर साहेबांकडे चाललो आहे, आपल्या गावात कालिंदीवर पुल बांधावा असा अर्ज घेऊन”

ते ऐकताच, बिभादा ला एकदम शक्तिपात होऊन घेरी आल्या सारखेच झाले, डोळ्यासमोर रोजगार जाताना अन त्याला कारणीभुत कागद आपल्या नावेतुन जात आहेत हे ध्यानी येताच, त्याला एकदम तोतोल चा चेहेरा दिसला, पण तो शांत होता, संभाषण बंद करुन त्याने नाव रेटण्यात जोर लावल्याचे मास्टर बाबूंच्या नजरेतुन सुटले नव्ह्ते

“बिभादा, मला माहिती आहे रे की तुझ्या पोटावर गदा येईल ह्याने, पण गावासाठी हे गरजेचे नाही का ??”

“नाही नाही बाबू मोसाय, मी कसे ही करेन तडजोड पण गावाचे भले होऊ देत”

तसे मास्टर बाबू स्मित करत म्हणाले, “ बघु तुला काय काय मदत करता येईल ते करु”

“बाबू मोसाय, मला पुलाचाच चौकीदार करायला सांगा न साहेबांस, नाही गावचे भले व्हावे हे मला पण मनापासुन वाटते, पण मग तोतोल च्या शिक्षणाचे काय ? त्याला खायला काय घालु?” डोळ्यात अजीजी आणुन बिभा दा विचारत होता………..

तीन चार महिने अशीच सव्यपसव्यं, हेलपाटे, दहाप्रकारची कागदपत्रे देऊन झाली तरी काही हालचाल होत नव्ह्ती अन आला तो दिवस सुखाचा म्हणत बिभादा कसाबसा ढकलत होता, अश्यातच एक दिवस सकाळी सातलाच मास्टरबाबू आले, बिभादा चल पटकन, पलिकडे आज इंजिनियर लोकं येणार आहेत त्यांना इकडे घेऊन यायचे आहे , लगुडाघात झाल्यासारखे झाले बिभादा ला पण त्याने नाव लोटली, पलिकडे चार माणसे कसली कसली उपकरणे काळे चष्मे अन डोक्यावर पिवळी शिरस्त्राणे घेऊन उभी होती ती घेऊन परत आला तसे बिभादा घरात आला, समोर भात अन डाळ होते पण त्याची खायची इच्छाच झाली नाही, थोड्या वेळाने मास्टरबाबू अन ती माणसे परत आली, तसे नावेत बसल्या बसल्या त्यांचे संभाषण सुरु झाले

“मी काय म्हणतो बिभुती बाबू, आपण लगेच काम सुरु करु शकतो, पण तुम्ही तो तुमचा लोखंडी पुलाचा आग्रह सोडला पाहीजे, आपण मजबुत बर्मा टीक च्या बल्ल्यांचा पाया घेऊ न , पुल मजबुत असेल अगदी ट्रक जाण्या इतपत, मी हमी देतो, “

“ह्म्म्म, लोखंडी पुलास वेळ लागेल हा तुमचा तर्क तर बरोबर आहे श्रीयुत श्रीवास्तव साहेब, ठीक आहे, पुल बांधा लाकडीच”

दोनच दिवसांनी मोठाल्या बल्या, त्यांना मारायची लोखंडी रिविटे, शिसे इत्यादी सामान गावापलिकडे येऊन पडले, नाही म्हणले तरी पुल बांधायला दोन महिने जाणार होते, अन ते तरी काढू म्हणत बिभा दा कसा बसा नाव रेटत होता, ह्या सगळ्याच्या पलिकडे निरागस तोतोल सुद्धा त्याच्या वर्गमित्रांसारखा आनंदी होता अन शाळा संपली की तो पुलाचे काम बघायला जात असे.

पुलाचे काम संपले तो मे महिन्याचा शेवट होता, कालवैशाखी ची वादळे अन धो धो पाऊस यायचे दिवस ते, अश्यातच एक दिवस धुरळा उडवत मंत्री महोदयांची गाडी आली अन रिबिन कापुन पुलाचे उद्घाटन करुन गेली, आता बैलगाड्या छोटे ट्रक हे थेट गावात येत असत, जीवन बसु वाण्याच्या ही गोणी तश्याच येऊ लागल्या होत्या, अजुन बिभादा ला चौकीदारी मिळाल्याची खबर नव्हती, दोन तीन वेळा त्याने मास्टर बाबूंनी सरकारात चौकशी केली होती, पण दर वेळी उडवा उडवी चीच उत्तरे आली होती, टणक दिसणारा बिभादा आजकाल का काय महिती पण पुर्ण कमजोर होत चालल्याचे मास्टर बाबुंस पण जाणवत होते पण ते ही हतबल झाले होते. घरात तांदुळ होते पण पुढे काय एक वर्षात तांदुळ संपतील मग काय ? हा प्रश्न बिभादा ला छळत होता.

असाच, एक मंगळवार उगवला, आता नावेची गरज कोणालाच नव्ह्ती, रात्रभर तळमळत विचार करणा-या बिभादा ला पहाटे पहाटे झोप लागली होती तो अंमळ उशीराच उठला, तेव्हा तोतोल शाळेत जायला तयार झाला होता अन त्याच्या उश्याशी बसुन त्याचे चेह-यावरुन ते मायाळु पोर हात फ़िरवत होते

“दादाभाई तुम्हाला बरं नाहीए का ??”

“नाही बाळ, सहज झोपलो होतो……..” निग्रहाने उमाळा दाबत बिभादा बोलला, “तुझ्यासाठी भात उकडुन ठेवला आहे अन कमळकाकडीची भाजी करुन ठेवली आहे मी रात्रीच न्याहारी केलीस ?”

तसे मान डोलवत तोतोल शाळेत पळाला अन घरात बिभादा रडायला लागला होता. संध्याकाळी हल्ली निरागस तोतोल ने नवा कार्यक्रम सुरु केला होता, शाळेतुन आला की तो आग्रह करकरुन बिभादा ला पुलावर यायला भाग पाडायचा मग धावत पुलाच्या दुसर्या बाजुला जायचा, मग बिभादा ने ओरडायचे

“१…….२……….३ssssss”

की तोतोल धावत यायचा अन दु:खाचे कड रिचवत बिभादा त्याला कडेवर उचलुन घेत लाडाने पापा घ्यायचा. त्याच मंगळवारी संध्याकाळी मास्टरबाबू पण आले होते तोतोल सोबत शाळा संपल्यावर घरी

“मी खुप बोलणे लावले बिभादा, पण अजुन काही सुनवाई नाही, मी इंजिनियर साहेबांशी पण बोललो ते म्हणाले आहेत तुला काम मिळेल पण थोडा वेळ लागेल, मला फ़ार अपराधी भाव दाटुन येतो आहे बिभादा…..”

“अहो गावाचे भले झाले ना बास!!!! मला काय मी पिकलं पान, ह्या पोराचे भविष्यच फ़क्त चिंतेचे कारण, हां तोतोलsssssss १……..२……….३sssssssssssssssss”

धावत येणारे ते पोर पाहताच मास्टर बाबुंचे डोळे पाणावले अन निश्चयाने ते बोलले

“मी तुझ्यासाठी अन तोतोल साठी काहीतरी करेनच दा” म्हणुन ते झटकन वळले तेव्हा विमनस्क असा बिभादा तोतोल ला गुदगुल्या करत हसवत होता.

रात्री नेहेमी प्रमाणे झोपे ने बिभादा शी असहकार पुकारला होता. इतकेच काय त्याच्या मनाची स्थिती नेमकी दर्शवणारे कालवैशाखी चे घोघावते वादळ अन टपटप टपोरे थेंब पण बरसायला सुरुवात झाली होती, आगतिक झालेला दा कुशीवर वळला तसे शेजारी शांत पहुडलेला तोतोल दिसला, तसे कडेलोट झाल्यासारखा बिभादा उठुन बसला, छाती धपापत होती त्याची, तो तसाच हळुच उठला, दार सावकाश लोटत बाहेर आला, ओसरीच्या सांदडीत ठेवलेली कु-हाड त्याने हळुच घेतली अन अंधारात घुमत घुमत चालत सुटला. पुढे पुढे अजुन पुढे अंधार चालवत असल्यागत बिभादा पोचला खाली उतरु लागला पंजे चवडे, घोटे करता करता पोटरीभर पाण्यात उतरला तो समोर पुलाची जाडजुड लाकडी बल्ली होती त्यावर दातओठ खात त्याने एक कु-हाडीचा रट्टा हाणला, त्या बल्लीला त्याने काहीच फ़रक पडणार नव्हता अलबत काही बारीक झिलप्या पडल्या, ती बल्ली एकाएक खदाखदा हसल्याचा भास झाला दा ला, त्याने अजुन एक रट्टा घातला मग तीन चार पाच……….. सहावा रट्टा घालायला त्याने कु-हाड उचलली अन मागुन एक बालध्वनी उमटला…..

“दादाभाईsssssss काय करताय तुम्ही, दादाभाई काय झाले, बरे नाही का दादाभाई तुम्हाला” तसे खुनशी रक्त डोळ्यात उतरलेला बिभादा मागे वळला, तो समोर तोतोल उभा होता, अविश्वास डोळ्यात भरलेला, जणु आपल्या आज्याच्या चांगुलपणाला रागाच्या चिखलात हात घालुन शोधत असलेला…… त्याला पाहताच बिभादा हेलपाटला, कु-हाड हातुन गळुन पडली अन पायतला जोरच निघुन गेला, धडपडत त्याने त्याच बल्लीला पाठ टेकवली अन शुन्यात नजर लाऊन मटकन पोटरीभर पाण्यातच बसला….. एव्हाना तोतोल कालिमंदिराच्या दिशेने धावत सुटला होता हे बघायचे ही भान त्या शक्तिपात झालेल्या वृद्धास उरले नव्ह्ते, हे सगळे कमी म्हणुन की काय वीज चमकुन बिभा दा चे अश्रुच आभाळातुन धो धो कोसळायला लागले अन त्यालाच भिजवुन ठेवले, चांगुलपणाने परत एकदा त्याचा ताबा घेतला अन असहाय्य असा तो म्हातारा ढसाढसा रडायला लागला.

काही वेळाने त्याने मंदिरा कडे पाहीले अन बल्लीलाच पाठ टेकवुन उभा राहीला, तसे धावत येणारे मास्टरबाबू अन तोतोल दिसले, समोर येताच मास्टर बाबूंची नजर त्या कु-हाडी वर पडली अन बिभादा भकास नजरेने जणु त्यांना आपल्या फ़ाटक्या नशिबाचा जाब विचारायला लागले. चिंब भिजुनही दोघांच्या डोळ्यातले अश्रु वेगळे दिसत होते, उदासपणाचा रंग होता त्या आसवांत, मळभ दाटुनच बसले होते, अन अंधा-या ओल्या राती आपले परमप्रिय गुरुजी अन आजोबा का रडतायत हे न कळलेला तोतोल डोळे मोठे करुन निरागसपणा उधळत होता………

बाप्या :)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

18 Aug 2014 - 2:46 pm | स्पंदना

आई ग्ग!!
किती सुरेख कथानक आहे.
आठवा ना नाव चित्रपटाचं. प्लिज!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Aug 2014 - 3:11 pm | कैलासवासी सोन्याबापु

मी पण खुप दिवसांपासुन त्या चित्रपटाच्या शोधात आहे, खुप आदळआपट झाली पण गवासेनाच :/ , अगदी गुगल बाबा ने पण साथ सोडली, आता एक इलाज आहे नॅशनल फिल्म आर्काईव्ह्स ना कोणी ओळखीचा निघाला तर पाहणे :)

एस's picture

18 Aug 2014 - 3:28 pm | एस

हे मी आधी कुठेतरी वाचलंय. पुन्हा वाचूनही छान वाटलं. चित्रपटाचे नाव शोधण्याचा प्रयत्न करतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Aug 2014 - 3:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

स्वॅप्स, हे आधी दुसरीकडे प्रकाशित आहे :)

राजाभाउ's picture

18 Aug 2014 - 4:23 pm | राजाभाउ

फारच सुंदर आहे, नाव मिळाले तर इकडे नक्की टाका

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Aug 2014 - 4:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

हो यत्न तोच आहे, बघु!!! माझ्या लहानपणी दर शनिवारी प्रादेशिक भाषांमधले उत्तमोत्तम चित्रपट डी डी वन ला दाखवत असत, अश्याच एका शनिवारी पाहिलेला हा लक्षात राहिला, अन तो लहान मुलगा जो आहे ते पात्र त्या बंगाली बालकलाकाराने फारच अफलातुन रंगवले आहे :)

पात्रांची हीच नावे कन्फर्म आहेत का? त्यानुसार प्रयत्न करता येईल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Aug 2014 - 5:02 pm | कैलासवासी सोन्याबापु

पात्रांची नावे सुद्धा मीच बनवली आहेत, मी वर बोल्लो तसे, मला फक्त कथा पुसट पुसट आठवत होती!!!!

स्पंदना's picture

18 Aug 2014 - 5:56 pm | स्पंदना

पण मनात अगदी घर करुन बसलीय तुमच्या कथा. किती समरसुन लिहिलय.
मस्त!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Aug 2014 - 6:23 pm | कैलासवासी सोन्याबापु

थँक यु!!!!!, हे कसे पोस्ट करावे ह्याच विचारात होतो, हे एकटाकी आहे, कुठेही संपादन नाही, सो थोडी धाकधुक लागुन होती

छानच साधं पण तितकंच भावपूर्ण कथानक आहे. छान पोचलं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Aug 2014 - 6:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

मुळात ह्या कथाबीजा चे बलस्थानच साधेपणा आहे, अन मुख्य म्हणजे मी सद्ध्या बंगाली आयुष्य फार जवळुन पाहिले आहे/ पाहतोय त्याचे थोडेसे व्हिजुवलायझेशन केले लिहिताना बस :)

पैसा's picture

18 Aug 2014 - 10:04 pm | पैसा

खूपच सुरेख कथा आहे!

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Aug 2014 - 7:31 am | कैलासवासी सोन्याबापु

_/\_

सुहास झेले's picture

18 Aug 2014 - 11:24 pm | सुहास झेले

सुंदर... प्रचंड आवडली कथा. आता सिनेमाचे नाव पण शोध यार. मी मघापासून सर्च करतोय, पण काहीच मिळेना :(

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Aug 2014 - 7:32 am | कैलासवासी सोन्याबापु

सुझे अबे टाळी लागली अन झरझर लिहित गेलो :)

खटपट्या's picture

19 Aug 2014 - 12:45 am | खटपट्या

सुरेख !!!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Aug 2014 - 7:33 am | कैलासवासी सोन्याबापु

हुरुप वाढवलात लिहायचा , आभार !

बहुगुणी's picture

19 Aug 2014 - 2:20 am | बहुगुणी

It's a Long Way to the Sea

बंगाली नव्हे, आसामी सिनेमा आहे.

एका उत्तम सिनेमाची ओळख आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिल्याबद्दल सोन्याबापू यांचे मनःपूर्वक आभार! कथेची खात्री करून घेण्यासाठी काही भाग पाहिला, आजच पूर्ण सिनेमा पहाणार.

जान्हू बारुआ यांचं दिग्दर्शन. 'शागोरोलोइ बोहु दूर' ("It's a long way to sea") हा तो सिनेमा.

हा पूर्ण चित्रपटच यू ट्यूब वर उपलब्ध आहे, दुवा पुढे दिला आहे. कुल्ची टेकड्यांच्या परिसरात घडणारी कथा आहे, बारुआंनी triolgy म्हणून यानंतर आणखी दोन चित्रपट काढले, 'पोखी' ('And the river flows') आणि 'कोनिकार रामधेनु' ('Ride on the Rainbow')

पोखी काही यूट्यूब वर मिळाला नाही, पण 'कोनिकार रामधेनु' चा दुवा खाली देतो आहे:

जाह्नू बारुआ यांचे आणखी ३ चित्रपट खालच्या दुव्यावर पहायला मिळतीलः

'हालोदिया चराये बाओधन खाल' ('The catastrophe'):

बंधन:


अपरूप
:

पुन्हा एकदा, बन्याबापूंचे आभार!

अर्र! ते आभार सोन्याबापूंचे मानायचे होते, बन्याबापूंचे नाही!
तो इथला वेगळाच आय डी आहे बहुतेक :-))

स्पंदना's picture

19 Aug 2014 - 6:46 pm | स्पंदना

चालेश चालेश बहुगुणी!!
इस खजिने के वास्ते आपके सारे टंग ऑफ द स्लिप मुआफ!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Aug 2014 - 7:37 am | कैलासवासी सोन्याबापु

अहो माझे कसले आभार मानताय बहुगुणी !!! मी फक्त थोडी धुळ झटकली!!! आपण तर पुर्ण मौक्तिक पेशे खिदमत केलेत!!!!! आपला सिनेमा व्यासंग जबरा दिसतोय!!!, मी अंधारात चाचपडत रंगवलेले बिभा दा अन तोतोल मला मिळवुन दिल्या बद्दल _/\_

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Aug 2014 - 7:38 am | कैलासवासी सोन्याबापु

पोरगे अन तो आजोबा पाहुन आपण ह्या पात्रांस थोडा न्याय केल्या सारखे वाटले :)

एस's picture

19 Aug 2014 - 12:06 pm | एस

चित्रपट नक्कीच पाहिला जाईल.

अनुप ढेरे's picture

19 Aug 2014 - 4:01 pm | अनुप ढेरे

मस्तं गोष्ट!
धन्यवाद सोन्याबापू आणि बहुगुणी.

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Aug 2014 - 9:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

आभार!!! आपण हुरुप वाढवलात :)

खटपट्या's picture

19 Aug 2014 - 11:29 pm | खटपट्या

वाचन खूण साठ्वत आहे.
आता मस्त दोन तीन चांगले चित्रपट बघायला मिळणार. संध्याकाळ खायला उठते राव.
इंग्रजी सबटायटल्स आहेत का ?

हो, सर्व चित्रपटांना इंग्लिश सब-टायटल्स आहेत.

किती सुरेख लिहीलयं! आणि कसल्या अप्रतिम लिंक्स !! बहोत खूब. तुम्हा दोघांना मनःपूर्वक धन्यवाद!

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Aug 2014 - 6:44 am | कैलासवासी सोन्याबापु

आभार संजयजी, पुढील लेखनासाठी आमचा हुरुप वाढला :)

मनिष's picture

21 Aug 2014 - 11:27 am | मनिष

अगदी! अगदी. दोघांनाही मनःपुर्वक धन्यवाद! :-)

मराठी_माणूस's picture

20 Aug 2014 - 10:44 am | मराठी_माणूस

अत्यंत करुण.

एक प्रश्न असा पडला की, गावासाठी एव्हढे करणारे मास्टर बाबु बिभादा साठी प्रयत्न करताना कमी पडतात का . सरकार कडुन अळंटळं होत असेल तर ते सर्व गावाला आव्हान का करत नाहीत ? ज्या गावकर्‍यांची त्याने इतकी वर्ष ने आण केली त्याची इतकी असह्याता अवघे गाव उघड्या डोळ्यानी नुसते पहात कसे बसते ?

खटपट्या's picture

20 Aug 2014 - 11:20 am | खटपट्या

आत्ताच बघितला चित्रपट. करुण तर आहेच. पण काय करणार….

कवितानागेश's picture

20 Aug 2014 - 1:47 pm | कवितानागेश

हम्म....

खटपट्या's picture

21 Aug 2014 - 10:35 am | खटपट्या

आत्ताच "कोनिकार रामधेनु" पहिला
छान कथा आहे एका लहान मुलाची. बालसुधारगृहामध्ये चालणारे गैरप्रकार यात दाखवलेले आहेत.

प्रमोद देर्देकर's picture

21 Aug 2014 - 12:30 pm | प्रमोद देर्देकर

हे असले लहान मुलांनी काम केलेले (करुणारसाची झालर असलेले)चित्रपट बघणे मला खुप त्रासदयक वाटतं म्हणुन बघत नाही.
पण आनंदी असतील जसे होम अलोन तर बघतो.

मुक्त विहारि's picture

27 Aug 2014 - 10:31 pm | मुक्त विहारि

कॉलिंग केविन...

धन्या's picture

21 Aug 2014 - 12:56 pm | धन्या

सुंदर रंगवलं आहे कथानक. अप्रतिम !!!

सातआठ वर्षाचे ते निरागस पोरच बिभा दा च्या जगण्याचे कारण होते

माणसाला जगण्यासाठी काहीतरी कारण लागतं. असं काही कारण असेल तर माणूस अगदी हीटलर नावाच्या सैतानाच्या छळालाही तोंड देऊ शकतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Aug 2014 - 2:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

मनीष जी आभार

धन्या, बरोबर आहे आपले म्हणणे

प्रमोद , आपण म्हणता ते बरोबर आहे, आपल्याला नात्याशास्त्रा च्या भरत मुनि रचित नियमां ला अनुसरून असलेले सुखान्ती चित्रपट जास्त आवडतात, जनरल भारतीय जनमानस हे हैप्पी एंडिंग मागत असते

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Aug 2014 - 2:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

मनीष जी आभार

धन्या, बरोबर आहे आपले म्हणणे

प्रमोद , आपण म्हणता ते बरोबर आहे, आपल्याला नात्याशास्त्रा च्या भरत मुनि रचित नियमां ला अनुसरून असलेले सुखान्ती चित्रपट जास्त आवडतात, जनरल भारतीय जनमानस हे हैप्पी एंडिंग मागत असते

सानिकास्वप्निल's picture

21 Aug 2014 - 6:45 pm | सानिकास्वप्निल

सोन्याबापू तुम्ही मस्तं लिहिले आहे.
कथा वाचून लगेच बहुगुणींनी दिलेला दुवा बघीतला
चित्रपट छान आहे.

दोघांचे खूप खूप आभार :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Aug 2014 - 6:19 am | कैलासवासी सोन्याबापु

आभारी आहे _/\_

खटपट्या's picture

22 Aug 2014 - 10:56 am | खटपट्या

बंधन पण चांगला चित्रपट आहे.
आजी आजोबा आणि त्यांचा मोठा नातू यांची कथा आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Aug 2014 - 11:29 am | ज्ञानोबाचे पैजार

साधी सोपीए पण मस्त गोष्ट, फारच आवडली.

बहुगुणींचे उत्खनन कार्यही कौतुकास्पद आहे.

पैजारबुवा,

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Aug 2014 - 8:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

हो त्यांचे खरेच कौतिक आहे!!! मला जमलेच नसते इतके पिन पॉइंट सर्चिंग

बहुगुणी's picture

23 Aug 2014 - 1:42 am | बहुगुणी

तुम्ही पात्रांची आणि गावाचे नाव विसरलात म्हणून लिहिलंत, तेंव्हा राज्य आणि भाषा देखील खात्रीचे नसावेत असा विचार केला, आणि मग तुमच्या कथेतले 'अगदी खरेच असणार' असे sequentially महत्वाचे keywords काय असावेत, ते खालीलप्रमाणे विचार करून गुगलबाबाला विचारले:

film boatman grandson river bridge

आणि पहिलाच दुवा हवा तो मिळाला!

बापु कथा फारच सुरेख लिहली आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Aug 2014 - 8:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

थैंक यू मदनबाण !

सुधीर's picture

24 Aug 2014 - 10:32 am | सुधीर

चित्रपट न पाहताही चित्रपट डोळ्यासमोर तरळून गेला.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Aug 2014 - 11:27 am | कैलासवासी सोन्याबापु

_/\_

शरभ's picture

25 Aug 2014 - 11:42 am | शरभ

अपेक्षानुरूप चटका लागला..

मुक्त विहारि's picture

27 Aug 2014 - 10:30 pm | मुक्त विहारि

आपल्या आवडत्या माणसांपासून आधीच दूर रहात आहे, त्यात हे असले दू:खी सिनेमे बघायचे धाडस नाही होणार....

शरभ's picture

28 Aug 2014 - 11:52 am | शरभ

सिनेमामध्ये कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही. पण एक अनुभव मात्र नक्की आहे.