हे मन सैरभैर....!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
11 Aug 2014 - 11:26 am

हे मन सैरभैर....!

मृगजळाच्या मागे धावते
तप्त उजाड वाळवंट त्यात ….
मोकळं मोकळं निळं आभाळ
ढग पांढराही नसे त्यात ….

दिसे किनारा कुठलासा , इतक्यात ! ….
उडून जाई हे मन सैरभैर …….

खोल खोल दाट काळोख
आसवांचे काजवे त्यात …
थकली पावलेही अंधारात
मऊ मऊ काट्यांची वाट …

दिसे कवडसा कुठलासा , इतक्यात ! ….
उडून जाई हे मन सैरभैर …….

बरसुनही मुसळधार कधीचे
परत दाटुनी आले त्यात ……
प्रत्येकाचं भिजणं वेगळं
पाऊसही चिंब आज तशात ……….

दिसे इंद्रधनू कुठलासा , इतक्यात ! ….
उडून जाई हे मन सैरभैर …….

शांत भासतो समुद्र जरी
फेकीतो लाटांवर लाट …
छोटीच होडी वाचलेली ,
मोठी नौका गिळंकृत …….

दिसे बुडणारा सूर्यही कुठलासा ,इतक्यात ! ….
उडून जाई हे मन सैरभैर …….

ठाव मनाचाच घेण्यासाठी
रोखले श्वास आज उरात …….
पण श्वासातील अंतर ऐकावी
फक्त धडधड जी हृदयात ……

भासे !!! सापडले मन कुठलेसे …… इतक्यात ! ….
उडून जाई हे मन सैरभैर …….

............फिझा ……

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 Aug 2014 - 9:09 am | मिसळलेला काव्यप्रेमी

कमाल केली आहेस!!!
__/\__!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 Aug 2014 - 9:10 am | मिसळलेला काव्यप्रेमी

कमाल केली आहेस!!!
__/\__!!

चाणक्य's picture

15 Aug 2014 - 9:58 am | चाणक्य

आवडली कविता.

स्पंदना's picture

15 Aug 2014 - 10:00 am | स्पंदना

"पण श्वासातील अंतर ऐकवी" अस आहे का ते?
सुंदर!!