अंतरीच्या गुढगर्भी जे मला जे भासले !!!!घेई च्छन्द मकरंद
. स्वच्छंद मकरंद, डॉ. दत्ता फाटक . २७– १२-२०१३ /३AM
,आपण जगाच्या रंगभूमीवरच्या नाटकात प्रसंगानुरूप भूमिका निभावून नेत असतो, म्हणजे बघा, एखादा नट नटसम्राट मधील गणपतराव बेलवलकरांची भूमिका इतक्या समरसतेने वठवतो, की प्रेक्षकही त्या भूमिकेशी एवढे तादात्म पावतात आणि त्यांच्या डोळी पाण्याच्या धारा वाहतात, प्रेक्षकही भारावलेल्या मनानी आपापल्या घरी जातात,पण त्या नटाला याची पक्की जाणीव असते की आपण खरेखुरे गणपतराव नाही, आणि नाटक संपल्यावर तोंडाचा रंग आणि वेश बदलल्या वर तो आपल्या वास्तव जीवनात परत येतो, आणि पुढच्या विनोदी नाटकात हलकीफुलकी भूमिका करण्यास सिद्ध होतो, पण आपण आपल्या वास्तव संसारी जीवनात प्रत्येक भूमिकेशी एवढे एकरूप होतो की त्या भूमिका वठवताना आपण प्रत्येक भूमिके-पासून अगदी भिन्न आहोत, हेच पूर्णतया विसरून जातो. आपण भ्रमाने प्रत्येक भूमिकेशी आणि प्रसंगाशी एवढे तन्मय होतो, की आपले मुलभूत स्वतंत्र स्वरूप विसरून जातो. आणि होतं काय, प्रत्येक भूमिकेशी पूर्णतः समरस झाल्याने आपला जीव (जीवन) सुख, दुःख, आशानिराशा यांनी भारावलेला असतो, त्याचे परिणाम दूरगामी होत असतात, या उलट, तो रंगमंचावरील नट भूमिकेनुसार बेघर झाल्याने दुःखीकष्टी होतो, पण वास्तवात तो दुःखीकष्टी होत नाही कारण तो त्याचा नुसता समरसून केलेला अभिनय असतो. पण वास्तवात तो त्या भूमिकेपासून अलिप्तच असतो. रंगमंचाखेरीज त्याचा त्याच्याशी कांहीही संबध नसतो. पण आपणंमात्र जीवनातल्या अपयश, निराशा, दुःखाच्या सर्व जखमा, त्याचे ओरखाडे मनोमनी जपून ठेवतो, नव्हे कुरवाळत बसतो, त्यावर सातत्याने विचार करत बसतो, आणि याला अंतही नाही .परिणामी शारीरिक तथा मानसिक ताप, दुःखे, संताप, ताणतणाव, वैफल्य, यांनी आपलं जीवन अस्ता-व्यस्त होतं. का, याचं कारण काय ? अर्थात कारण एकच आपल्या स्वस्वरूपाबाबतचे पूर्ण अज्ञान, आपण कितीही सुसंकृत, श्रीमंत, विद्वान, व्यवहारनिपुण, चलाख समजत असलो तरी दुःखात होरपळावेच लागते. पण आपण आपल्या अंतरंगात सगजतेने डोकावलो तर आपले आपल्यालाच जाणवेल अरे, आपण आपल्या आयुष्यात प्रसंगानुरूप त्या त्या वेळेपूरत्या अनेक भूमिका वठवत असलो तरी वास्तवात आपण एकच त्या नटासारखी एकच व्यक्ती आहोत, अनेक नाही. प्रत्येक व्यक्तीचा विकास तिच्या कल्पनाशक्ती, धारणा, भौ-तिक, सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती, वातावरण, उपलब्ध संधी यावर निर्भर असतो, तिच्यात भोवतीची अनेक व्यक्तित्वांची सरमिसळ झालेली असते. आपल्या वाढत्या विकासाबरोबरच आपल्या महत्वाकांक्षा, लोभ, इच्छा, वासना, आसक्ती, कामही वाढत जातात त्याबरहून व्याक्तीत्वातील कप्पे वाढत जातात, साधेच उदाहरणच बघाना, संसारात आपण आपल्या पत्नीचे पती असतो, मुलाचे पिताश्री असतो, मातापित्यांचे पुत्र असतो, भावा बहिणींचे बंधू असतो, मावजी, काका, मामा, मित्र, शेजारी, विधार्थी, मालक, नोकर, ह्या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका आपल्याला त्या त्या व्यक्तीमत्वात प्रसांगानुरूप वठवाव्या लागतात, शिवाय स्वतःच्या कल्पना, धारणा, उच्चनीच भाव-भावना, महत्वाकांक्षा, यामुळे एकाच व्यक्तीचे वागणं भिन्न प्रकारचे होते, व्यक्तित्वाचे अनेक पैलू अजाणीवेतून पडतात, आणि नकळत त्या त्यावेळी ती भूमिका वठवली जाते, त्यात दुसरी भूमिका मिसळत नाही, म्हणजे पित्याशी वागताना ते पत्नीशी वागतात तसे वागत नाही, नोकरांशी वागताना पत्नीशी बोलतात तसे हळूवार वागत नाही म्हणजे नटासारख्या अनेक अनेक व्यक्तित्वाच्या भूमिका करूनसुध्दा रंगररंगोटी उतरल्यावर तो नेहमीच्या वास्तव जीवनात परततो. तसचं आपल्या आपल्या दैनंदिन जीवनात विविध भूमिका बजावतो तेव्हा आपली स्मृती त्या खोटया भूमिका खेळत असते आपण त्या स-या भूमिका नाटकाप्रमाणे बजावत असतो आपण त्याहून भिन्न आहोत हेच नेमके विसरून जातो आणि भ्रमाने, कल्पनेने, विस्मृतीने, अज्ञानाने ती भूमिका खरी आहे असे मानतो त्यामुळे आपण दुःखी होतो अशा रीतीने मायेशी म्हणजे खोट्या समजुतीशी आपण पक्के जखडले जातो याचं स्थितीत क्षणोक्षणी सावध होवून निरीक्षणाने वस्तुस्थितीचे ज्ञान करून घेणे आपल्या आत्म्याचे किंवा चैतन्याचे चिंतनातून अनुभविक ज्ञान मिळविणे हेच आपल्याला खोट्या भ्रमातून, दुःखातून मुक्त करील. थोडक्यात त्या त्या भूमिकांपासून मनाने अलिप्त रहाण्यास शिकणे गरजेचे त्यात गुंतून न जाणे हेच महत्वाचे.
आपल्याला आयती सिद्धी प्राप्त करून देणारा आत्मसाक्षात्कार, चमत्कार, घडवून आणणारा गुरू हवा असतो, नाममंत्र, गुरूमंत्र, देणारा गुरू हवा असतो, पण अध्यात्म,परमात्मा, अज्ञात, सत्य यासाठी दलाल, गुरू, उपदेशक, यांची मुळीच आवश्यकता नसते, संकल्प हीच सिद्धी आहे यावर स्वतः चिंतन, मनन क- रावं म्हणजे त्यातील सत्य कळून येईल प्रचीती येईल. ते सत्य आपल्यालाच शोधायचं असतं त्यासाठी स्वनिरीक्षण, ध्यान, निरपवाद स्वानुभव घ्यायचा असतो, त्यामुळे आपल्या मनावरील ताण, दडपण नष्ट होईल जगात उपदेश, सल्ला देणा-याची वाण नाही, पण तो कृतीत आणणार कुणीच नसतं गुरू असलाच तर तो आपल्याला त्याच्याशी जखडून ठेवत नाही, आपलं स्तोम माजवत नाही, अथवा त्याने दिलेल्या ध्यान पध्दतीशी, विधीशी तो जखडून ठेवत नाही, आपल स्वातंत्र्य अबाधित ठेवतो, लोकेषणा, धनेषणा नमस्कार, पायापडणे, स्तुती या सर्वांपासून अलिप्त असतो. तोच खरा गुरू असतो. आपल्याकडे मात्र अशा गुरूंची वाण आहे, पण धंदेवाईक बुवा, महाराज, बापू, स्वामी, आचार्य, महंत, यांची खाण आहे. सत्संगाची चंगळ आहे. दूरदर्शनवर आस्था किंवा इतर मालिकांवर पन्नास शंभर सत्संग, भागवत, भजनादी कार्यक्रम आढळतील, कार्यक्रमात अपवाद वगळता उपरोक्त लहानथोर वयाने आणि अधिकाराने !! संतमंडळी, आणि पूज्य माताजी भल्यामोठ्या मंचकावर गळ्यात मावणार नाहीत अशा फुलांच्या माळा, कपाळभर गंधाचे पट्टे, संगतीला संगीतकारांचा ताफा घेवून उच्च स्वरात साभिनय दर्शन देतात, श्रोतृगण कपडयांचे भान विसरून बेभान नृत्य ? करत असतात, सगळाच आनंदकल्लोळ, खर्चाचा प्रश्न आड येत नाही, सत्संगाच्या नावावर भक्तांचे दात्तृत्व ओसंडून वाहत असते, असं अध्यात्म कष्ट नकरता मिळणारं लोकांना भावते, असो. तर तर्कसंगत मनोविश्लेषण केलं तर अध्यात्माची नाळ मनाशी, अंतर्मनाशी जोडलेली असते, एखादा विचार मनात घर करतो, येतो त्यावेळी त्याचे मूळ काय आहे, याचा शोध घ्यावयास हवा, आपल्या व्यक्तित्वाच्या ज्या अलग अलग प्रतिमा आपल्याजवळ असतात त्या सगळ्या प्रतिमा आपले आचारविचार, चिंतनमनन, आयोजननियोजन यावर निर्भर असतात. भूतकाळ कितीही उगाळला तरी निष्पन्न काहीही नाही, तो काही जागवू शकत नाही, त्याचा खेद, शोक करून काही उपेग नाही, तो काही परत येणार नाही, आपल्या हाती असतो तो हा क्षण, वर्तमानातला, मग वर्तमान हाच आपल्या हाती असतो, पण होतं काय आपण आपला भूतकाळ जमेस धरून त्यांच्या आधाराने जगण्याचा पुढची वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो आणि येथेच नेमके चुकतो, परिणामी होतं काय वर्तमान वास्तवाकडे दुर्लक्ष होतं आणि निर्णय चुकतो.
आपण मनस्वी रागावलेले असतो, राग अनावर झालेला, अशा परिस्थितीत एखादी आदरणीय व्यक्ती दारी उभी राहते, तेंव्हा होतं काय त्याना पाहताच रागाचा भडका अंतर्मनात लुप्त होतो, वरकरणी आपण झटकन चेहरा हसरा बनवून त्यांचे हात जोडून स्वागत करतो, हा जो निमिषार्धातला बदल म्हणजे राग, द्वेष, अनुसूया, अशा प्रासंगिक भावना दाबून टाकतो, परिणामी आपल्या मेंदूच्या कार्यात बिघाड होयो, त्याला धक्का बसतो, असे प्रसंग अनेकवेळा उद्भवतात आपणास झटकन भावभावना बदलून त्याविरुधचा देखावा उभा करावा लागतो, त्याचा विपरीत परिणाम मेंदू, ज्ञानतंतू, रक्तवाहिन्या,आणि हृदय ही नाजूक अतिसंवेदनशील बनतात, त्यावर कुठल्याही विपरीताचा परिणाम होतो, आपण लगेचच आजारी पडणार नाही पण देहातील त्या नाजूक भागांना त्रास नक्की होतो,असंच जर सातत्याने होत रहिलं तर उच्च रक्त-दाब, मानसिक असंतुलन, हृदय विकार, मधुमेह, केंन्सर, भोवळ येणे असे सामान्यत: विकार सहज जडू शकतात. अर्थात असे धक्के सहन करण्याची यंत्रणा शरीरात असते, नाही असं नाही पण अतिरेकाने ती बिघडून जाते, विस्कटते, आपण उपरोक्त आजारांनी किंवा भ्रमिष्ट, वेड लागण्याच्या अवस्थे पर्यंत पोहचू शकतो. आपण पाहतो याचा परिणाम अतिविदुषी, गतिमान, अतिमहत्वाकांक्षी, भावनाविवश,रागाचा पारा झटकन चढणा-या लोकांवर जास्त होतो. या गतीमान, सुधारलेल्या जीवनात धनासाठी, सुखासाठी, शान्त-तेसाठीसुध्दा मोठी स्पर्धा-धावपळ करावी लागते, भौतिक सुखसाधने मिळविण्याच्या या स्पर्धेमुळेच वरील उपरोक्त आजारांचे वाढत आहेत. ताप, खोकला, देवी, गोवरा सारखे आजार औषधाने बरे होतील, हात, पाय आदी बाह्यांगे शस्त्रक्रियेने बदलतासुद्धा येतील पण आंतरिक यंत्रणेचे, मनाचे काय ??
या आंतरिक यंत्रणेसाठी आध्यात्मिक उपाय जास्त परिणामकारी संभवतात. आध्यात्मिक या शब्दाला आपण जरा घाबरतो पण तसं नाहीये, इकडेतिकडे धावणा-या मनावर थोडासा वेळ खर्चून स्वस्थ बसून त्यावर लक्ष ठेवून त्यावर संयमित ताबा मिळविणे, खरं तर हे फार सोप्पं आहे फक्त थोडावेळ खर्च करणें महत्वाचे, यासाठी आपला वागण्याचा बाह्य दृष्टीकोन पूर्णपणे बदलून मनाकडे जास्त लक्ष देणे, मानसिक घडी बिघडू न देणे, मनावरील ताण तणाव नाहीसे करणे, आपल्या आचारविचारानी मानसिक आपत्ती ओढवून घेणा-याला कोणी गुरू, मांत्रिक, त्यांचे गुरूमंत्र, मांत्रिकाचे तंत्रमंत्र वाचवू शकणार नाहीत वा औषधेही फारसा परिणाम घडवून आणणार नाहीत, यासाठी मनाला पूर्ण विश्रांती आणि थोडेसे प्रशिक्षण देणे आगत्याचे, आणि ते फारसे कठीण नाही, इच्छा आणि अल्पसा मनोनिग्रह मात्र हवा.
anthkrnaachaa anthkअंत:करणाचा विकास म्हणजे चित्ताचा समतोलपणा राखणे, यासाठी मन, बुद्धी, चित्त यांचा सुसंगत-पणा राखणे, आसक्ती—अनासक्ती, संग—असंग, प्रेम, राग, द्वेष, असूया, लोभ, हे सारे मनाचे खेळ बालपणी आईवडिलांबद्धल असणारी प्रेम, आसक्ती एवढी की त्यापासून क्षणभरही अलग होणं अशक्य, लहानपणी ज-मवलेल्या वस्तू त्यावरून भांडणे-मारामा-या होत असत पण वाढत्या वयाबरोबर त्यावेळच्या वस्तू, कल्पना rnaachaaयांचे अप्रूप नष्ट झाले आपण त्याबद्धल अनासक्त झालो, त्यासाठी फारसे प्रयास करावे लागले नाहीत, ही अनासक्ती प्रौढतेमुळे व ज्ञानामुळे आली. म्हणजे मानसशास्त्राच्या दृष्टीने ज्या गोष्टी अशक्य व कठीण वाट-तात त्या सहजतेने होवून गेल्या त्यागोष्टी सोप्या की कठीण हे सापेक्ष आहे, यासाठी आपले आंतरिक विचारचक्र चालू ठेवायचं, त्याचे तटस्थेने निरीक्षण करत रहायचं, काल्पनिक तथा बौद्धिक शंकाना थारा ध्यायचा नाही, येणा-या कल्पना, धारणा, विचार, स्थानयावर मन स्थिर न करता फक्त अवलोकन करत राहावयाचे बस्स एवढे केले की काम फत्ते, आपला प्रवास प्रगतीपथावर जोमाने, जोराने मार्गक्रमण करू लागेल. यासाठी पातंजल योगात पहिल्याच ऋचेत ““योग: चित्त: निरोध:”” असं म्हटलं आहे, त्याचा अर्थ आपल्या ज्ञानेंद्रीयाना, कर्मेंद्रियाना जी बाहेरच्या विषयांकडे धावतात, त्याना लगाम घालून त्याना अंतर्म-नाकडे आतल्या मनाकडे वळवणे जमलं की सारं जमतं, फक्त कृती आवश्यक असते, चर्चा, वादविवाद यांनी काही साध्य होत नाही. इतरांच्या उपदेश, बोलणे याकडे लक्ष न देता प्रत्यक्ष अनुभूती हीच खात्री असतें चला मग सुरवात करूया.
आपण जर दिवसाचा थोडासा वेळ स्व- अध्यायासाठी दिला, थोडावेळ एकांतात ठराविक वेळी, ठरा-विक जागी, निरवशांततेत ( कठीण आहे पण जमेल तेवढे ) कुठलेही आसन किंवा सहजासनात काही ना-मोच्च-रण, मंत्र, जपजाप्य, न करता आपल्या मनाचे, त्यांच्या खट्याळपणाचे, विभिन्न प्रतिमांचे, व्यक्तित्व निर्मितीचे, येणा-या भन्नाट विचारांचे, ( झेनच्या थेअरीप्रमाणे ) त्याच्या कौशल्याचे सगज निरीक्षण करा-यचं बाहेर निसर्गसान्निध्यात याची अनुभूती अवर्णनिय ! आसपासच्या बाह्यप्रतिमा अंतरंगात कशा उमट-तात, त्याचा अभ्यास मनाला आपण योग्य मार्गाने चालल्याचं समाधान देणारा असतो, या मुळे मन, नि-र्भीड, शांत, स्तब्ध व कधीकधी नि:शब्द होत असतं पण त्याच बरोबर आपल्या वागण्यात दिखाऊ स्वरूपाच्या गोष्टी कमी करणे, टाळण, बारीकसारीक गोष्टींची चिंता करणे, लावून घेणं हेही अंगी बाणवणे जरूरीचे असते. आपण ज्या वेळी आपण जाणीवेच्या पलीकडे नेणीवे-च्या मानस सरोवराच्या आत डुबकी मारली की त्या उच्चतम नेणीवेतून आपल्याला अनेक गोष्टी आगाऊ दृगोचर होवू लागतात, कळू लागतत. त्याला आपण चमत्कार म्हणतो, ते तसं नाही, त्यात महत्वाचे आहे,,ते आपल्या मनाच्या आतील प्रतिमा किंवा चलचित्रे निर्माण करण्याची क्रिया त्यामुळे आपल्याला भूतकाळ दिसतो, फार काय अधिक प्रगती झाली तर गतजन्म सुध्दा आकलन होतो.पण हे चमत्कार, चालीरीती, रूढी, उपचार, मान्संमानाच्या कल्पना, संततीसंपत्ती, यावरील आसक्ती व लोभ आपल्या चिंता, त्रास, कटकटी,हे सगळे बाह्यमनाचे खेळ, आपल्यावर येणारी आपत्ती हीच मनाची आणि अहंकाराची उत्पती त्याला खत्त पाणी घालतात आपल्या भय, महत्वाकांक्षा आदी विकार. पण यासर्व बाबी गौण असून अंतर्यात्रेत, शोधात अडथळा आणणा-या असल्याने त्यात न गुंतता स्वत:ला जाणून घेणे तथा आत्म-ज्ञान, आत्मबोध,आत्मदर्शन हे त्याही पेक्षा उच्च पातळीचे असते. प्रपंच नेटका झाला की परमार्थ आपोआप साध्य होतो, त्यासाठी काही करावं लागत नाही. शेवट गोडच असतो. आणि परम अर्थात जीवनात आवश्यक असणारा अर्थ मग तो भौतिक असो की आध्यात्मिक असो त्यात अर्थ असतोच कुठला तो प्रत्येकाच्या वकुबावर अवलंबून असतो, म्हणजे नेटक्या प्रपंचात – संसारात नीट व्यवहार करून अर्थार्जन करतो, मुलाबाळांची शिक्षणं, त्यांच व्यवस्थापन करून आवश्यक ती शारीरिक, मानसिक आणि खास करून आर्थिक तरतूद करून समाधानाने उर्वरीत आयुष्य ख- -या अर्थाने आध्यात्मिक – पारमार्थिक जीवन व्यतीत करतो. सुख समाधान थोड्याफार प्रमाणात सापेक्ष आहे मानण्यावर आहे. आपली वृत्ती जे आहे ते कमी आहे आणि जे नाही ते जास्त आहे आवाक्याबाहेर चं आहे त्याची मी हव धरतो आणि दुःखी होतो.मी सुखी आहे म्हटलं की मी सुखी असतो, फक्त आसक्ति, हाव थोडी कमी करावी लागते, करण सुखाची स्थिती अल्पजीवी असते म्हणजे बघा, समजा आपण चाळीत राहत होतो कष्टाने आपण वनरूम किचन ब्लॉक मध्ये राहण्यास आलो, थोडे दिवस अप्रूप वाटतं, कृतकृत्य झाल्या सारखे वाटत, पण हावरं मन काही दिवसांनी खट्टू होतं आणि आणखी एक बेड रूम असती तर बरं झालं असत असं वाटू लागत पण मनी विचार येत नाही आपल्या वकुबापेक्षा आपण जास्त गाठलं आहे, पुढेमागे मोठा ब्लॉक घेवू मग सांगा ही सुखाची स्थिती अल्पजीवीच ना !! पण तिच जर सुखाची प्रवृत्ती जी चिरंजीवी आहे ती असेल तर मी दुःखी होणार नाही, आता आहे वर्तमानात सुख मानेन, आणि पुढे मागे याही पेक्षा मोठा ब्लॉक घेण्याच्या आर्थिक तरतुदीला लागेन, वर्तमान दुःखीकष्टी करणार नाही ही सुखाची प्र - विशेष वृत्ती, त्यामुळे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असं होणार नाही. आपली मान-सिकताच परिस्थितीपेक्षा जास्त दुःखाला कारणीभूत असते. फारकाय कित्येत लोकं आत्मघातासप्रवृत्त हो-तात प्रेमभंग, घटस्फोट, कोणा इष्टआपत्ताचा देहान्त, आजारपण, या गोष्टी सुंदर ईश्वर-प्र-निधान म्हणजे “”ईश्वराने दिलेल्या विशेष ठेवा”” त्याचा विनाश का करावा बरं !! त्याला मार्ग आहे की, आपल्या शरीरात काही दोष निर्माण झाला तर आपण काय करतो तेवढया भागावर शस्त्रक्रिया करून काढून टाकतो, नई का !! अगदी तस्सच करायचं थोडा संयम, सम्यक विचार करून तो आयुष्याचा भाग विसरून जायचा, काल हे त्यावर औषध आहेच, आणि उर्वरित आयुष्य मागची ठेच लक्षात ठेवून मस्तीत जगायचं. जगणं आणि जग खूप सुंदर आहे चष्मा बदला, पाहण्याचा दृष्टीकोन बदला, विचार करण्याचा तरीका बदला जग तुम्हांला सुंदर लुभावणं भासेल नव्हे अनुभवाल. ‘’ जिंदगी एक सफर है सुहाना यहां कल क्या हो किसने जाना खरंच हे गाणं ख-या अर्थाने लक्षात घ्या सुखी व्हाल. इति आलम
प्रतिक्रिया
20 Jun 2014 - 8:30 am | चौकटराजा
आपली मान-सिकताच परिस्थितीपेक्षा जास्त दुःखाला कारणीभूत असते.
एक हजार एक टक्के खरे. खरे तर या जगात न भरून येणारी जखम म्हणजे आप्ताचा मृत्यू . तरीही काळ ती जखम भरून
देतोच की. आपण कृतकृत्यतेची ,ध्येयांची लेबले घेउन जगायला लागलो की दु: खे निर्माण होतात. मग मस्त मजेत जगणे
कठीण होते. जीबनाचा मनमुराद आनंद हेच मुख्य ध्येय ठेवले तर पैसा, नातेसंबंध, मानमरातब ई ना फक्त साधनांचे महत्व उरते. साध्य काही वेगळेच असते.
20 Jun 2014 - 10:17 am | कंजूस
दमदार आणि प्रभावकारी लेखन .
20 Jun 2014 - 10:50 am | nasatiuthathev
कित्येत लोकं आत्मघातासप्रवृत्त हो-तात प्रेमभंग, घटस्फोट, कोणा इष्टआपत्ताचा देहान्त, आजारपण, या गोष्टी सुंदर ईश्वर-प्र-निधान म्हणजे “”ईश्वराने दिलेल्या विशेष ठेवा”” त्याचा विनाश का करावा बरं !!
त्याला मार्ग आहे की, आपल्या शरीरात काही दोष निर्माण झाला तर आपण काय करतो तेवढया भागावर शस्त्रक्रिया करून काढून टाकतो.
अगदी खर ....
20 Jun 2014 - 3:39 pm | धन्या
क्या बात हैं.
धार्मिक असणं आणि अध्यात्मिक असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. धार्मिकतेचा भर बाहयोपचारांवर, कर्मकांडांवर असतो तर अध्यात्मिकतेचा भर आपल्या अंतरंगाशी आपलीच नाळ जुळण्यावर असतो, आतल्या शांतीवर असतो. धर्म आला की देव येतो, देव आला की त्याची सुपरनॅचरल पॉवर येते आणि मग आपण भ्रमांमध्ये अडकतो.
अध्यात्मात देव नसतो. तिथे आपण असतो, आपल्यासारखेच इतर असतात आणि सभोवतालचा निसर्ग असतो. आपण आपल्याशीच कनेक्ट झालो की आपल्यासारख्याच इतरांशी आणि सभोवतालच्या निसर्गाशी कनेक्ट होणे सहजतेने घडते.
20 Jun 2014 - 3:57 pm | आदूबाळ
दाक्तरसाहेब - जरा प्यारेग्राफ पाडलेत तर वाचाय बरं पडेल.
20 Jun 2014 - 4:42 pm | म्हैस
आम्हाला स्वच्छंद पणे मकरंद प्यावासा वाटतोय