घेई च्छन्द मकरंद -- होमिओपॅथीचा !! [भाग-१]

डॉ. दत्ता फाटक's picture
डॉ. दत्ता फाटक in जनातलं, मनातलं
12 Jun 2014 - 8:30 pm

आपलं शरीर हे मुख्यतः पाणी, सेंद्रीय पदार्थ तथा बारा निरींद्रीय क्षार युक्त असंख्य पिंडपेशींनी तयार झालेले आहे, निरींद्रीय क्षारांमुळे या पेशी तयार होत असतात, अन रक्ताभिसरणाने पोसल्या जातात, याशिवाय साखर, चरबी, पांडूर- Albumin, हे कर्बयुक्त सेंद्रीय पदार्थ असून चुना-Calcium, लोह-Iron, potashium, Natrum, Scical, हे ख-निज क्षार निरींद्रीय – कार्बन विरहित असतात.निरींद्रीय क्षारांचे प्रमाण अल्प असलं तरी अचेतन सेंद्रीय पदार्थापासून लक्षावधी विशिष्ठ पिंडपेशीसमुह निर्माण करत असतात. याचं कारणामुळे या बारा क्षारांना अनन्य साधारण महत्व आहे, त्याचाच अभ्यास करणें आहे. त्यात लक्षणं, त्रुटी, आणि रोग याचा धावता आलेख काढायचा आहे.
काली फोस्फोरीकम – Kali Phosphoricum K2 H PO4. सर्वात महत्वाचा क्षार,शरिराच्या सर्व घटकांचे, अवयवांचे, ऐच्छिक, अनैच्छिक संतुलन, संचलन, आणि अनुशासन करणा-या मेंदू, ज्ञानतंतू, कर्मतंतू या सर्वांशी याचा निकटचा संबंध आहे, आपल्याला भौतिक ज्ञान होतं ते शब्द,रस, रूप, स्पर्श, गंध, या संवेदना कां, जिव्हा-जीभ, डोळे, त्वचा, आणि कांन या पांच ज्ञानेंद्रीयामुळेच होते अन त्याचा घनिष्ट संबंध मेंदूशी आहे.सध्याचे गतिमान, बौधिक्तेची कास धरून चाललेलं स्पर्धात्मक विकृत सांस्कृतिक जीवन आणि असंतुलीत समाजव्यवस्था, आवाज, प्रदूषण,शांत- निवांत-पणा याचा अभाव या सर्वांमुळे मेंदूवर आणि शरीरावर प्रमाणाबाहेर ताण पडतो आहे. याचा संबंध मानसिकते शीही आहेच, बघा, असा दिवस आपल्या आयुष्यात कधीतरी उगवतो, जाग आल्यावर काहीं करू नये, स्वस्थ पडून राहवे, थकलाभागला शीण येतो, अनामिक वैताग आलेला असतो, मन उगाचंच प्रक्षुब्ध बेचैन असतं, कपाळा हात लावून जरा चेपलं तर बरं वाटत, मग ध्यानी येत अरे डोकंही जरा जड झालं आहे त्यात बारीकसा ठणका आहे, कालझोपेपर्यंत तर सगळं उत्तम होतं, मग!! कारण अज्ञात आहे. फ्रान्सिस बेकन यांनी तीनशे वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे जसं माणसाचे मन तसा तो माणूस, मनानी घेतले मी आजारी आहे की तो आजारी पडतोच, मी तब्बेतीत आहे तर तो तब्बेतीत असतो. माणसाचे माणूसपण त्यांच्या बुध्दिवैभावाचा ओज-प्रकाश पाडणा-या मेंदूत आहे त्यांचं रक्षण, पोषण करणारा हा काली फॉस क्षार महत्वाचा आहे. याचा आणि मेम्दुमध्ये, आणि भोवती असलेल्या करडया पदार्थाचा ( Grey matter ) यांचा फार घनिष्ट संबंध आहे.कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे केसांपेक्षा बारीक पण अत्यंत चिवट असं तंतूमय जाळं असते त्याला इग्रजीत Arachnoid असं नाव आहे. हा क्षार शरीर-घटक-धातू ( Tissues ) निर्माण करणारा आहे याचं संतुलन बिघडलं की शरीर घटकच तयार होणार नाहीत. स्नेहाचे घट्ट रूपांतरण होणे, प्राणवायुचा योग्य उपयोग अडून बसेल. बुद्धी काम करेनाशी होते, त्यांच्या वागण्यात सुसंगती राहत नाही, शरीर-मन खचतात, एक तर्हेची भीती ६ न्युनगंड उत्पन्न होतो, चारचौघात बुजतो त्याला एखादेवेळी समोरच्याचे नांवही आठवत नाही, कसलाही निर्णय घेऊ शकत नाही, भावनाविवश होतो, लहानसं कारण ही रागवा चिडायला पुरते तर्कट स्वभाव हेसर्व या क्षाराच्या अभावाने होतं त्यांच्या जोडीला आणखी एक क्षार नैट्रम मूर या सर्व क्षारांचे कोऑरडीनेशन आणि कोऑ- परेशन चांगलं असतं त्यामुळे एखाद्धया क्षाराच संतुलन बिघडलं की काहीना काही शारीरिक व्याधी सुरू होतेच. काली फॉस अल्ब्युमिन व प्राण वायूशी संमिलीत होऊन ग्रे मेटर निर्माण करतो.
१ ) काली फॉस-६- + कल्के फ्लुऑर-६ + सिलिका-६ तीन तीन गोळ्या एक / दोन वेळा ----- ------------------- वयत्परत्वे शरीराची झीज आणि थकवा झपाट्याने वाढत असतो, मानसिकता बिघडते, मन काळजी-ग्रस्त होतं, झोपेवर परिणाम होउन स्वभाव चिडचिडा होतो, मेंदू काम करीनासा होतो, विस्मरण होतं अशावेळी उप-रोक्त क्षार दिले तर आवश्यक ग्रे मेंटर मेंदू भोवती राहते, शिथील झालेल्या नसा नर्व्हज कल्के फ्लुओरने हव्या तेवढया लवचिक अथवा ताठ राहतात नि सिलिका सर्वाना आवर घालतो.
2 ) काळी फॉस ६, ३० -------------- खास विध्यार्थ्यासाठी हया क्षारासारखा दुजा हितचिंतक नाही, परीक्षार्थी परीक्षा अगदी जवळ आली की रात्रीचा दिवस करून अभ्यासानिमित्त वह्या-पुस्तकात बुडालेला, वाचन चालू असताना वाचनात एकाग्रता हवी, लक्षात राहयाला हवं, परिणामी पोट रिते वाटायला लागते, पोटात गोळा येतो, या क्षाराचे हे महत्वाचे लक्षणं आहे, काली फॉस मेंदुच्या पेशींची तैनात उत्तम राखतो. ग्रे मेटरवर पडणारा ताण वाढला की त्याचा पुरवठा तोकडा पडतो, त्यामुळे गंभीर व्यथा निर्माण होतात, त्यासाठी याक्शाराच्या गोळ्यांची बाटली जवळ बाळगून मधून-मधून घेत गेले की सारी थकावट गायब, एकाग्रता साधते, चांगला अभ्यास होतो जाग्रणे करावी लागत नाहीत, झोप शांत लागते, पोटात गोळा येत नाही, भूक चांगली लागते. वृद्धांसाठी तर हा क्षार जीवनामृत
४) काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने दिले यामुळे र्हुदय विकाराचा रुग्ण हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी आलेली रुग्णवाहिका परत पाठवण्या एवढा स्वस्थ झाला, त्या मुळे काली फोसला प्राण रक्षक म्हणूनही ओळखले जाते. -
४ ) काली फॉस हा अत्यंत महत्वाच्या क्षारा अभावी शरीराची किती दयनीय अवस्था होते ते त्याचं वर्णन त्याच महत्व ध्यानीनी आणून देईल, ही माहिती खूप पडताळे जमवून विचार करून जमविलेली आहे एखादे वेळी मनाला न पटणारीही असू शकेल, पण सत्य आहे, प्रयोग, अनुभव घेण्यास काय हरकत आहे. नुकसान तर अंशात्मकही नाही झालाच तर अमोघ फायदाच होईल काही गोष्टी अनकलनिय, अघटीत असतात त्यावर फक्त विश्वासच ठेवावा लागतो. ५ ) तंतू शूळ न्युरोल्जीया अत्यंत अस्वस्थ करणारी व्याधी, असह्य वेदना, खाणं-पिणं सुचत नाही, ६ ) रूग्णाचं वास्तव वर्णन ---१ )- चेह-याचा वर्ण फिक्कट पिवळा, तर कधी पांढराफटक रक्तक्षीणतेची जाणीव करू देणारा, डोळे दु:खी-कष्टी, ओढलेले, खोल गेलेले, भवती काळी वलयं असलेले, अकाली वृद्धत्व आल्या सारखा काळजी ग्रस्त सुरकुतलेला चेहरा, काहीवेळा चेहरा ओठ तांबूस काळपट निळे, शिरा ताणलेल्या, थकवा, अस्वस्थपणा, २ ) BRAINFAG किंवा CEREBRAL ASTHENOA -- मेंदूची अपरिमित थकान, व्यापारी, उच्चभ्रू लोक, कर्मेंद्रीयापेक्षा ज्ञानेंद्रीयांवर ज्यास्त ताण देणारे सुखवस्तू लोक. यांच्यासाठी या सारखे काली फॉस सारखे औषध नाही.
३ ) स्मृतिभ्रंश – यावर हा क्षार उत्तम कार्य करतोच पण त्याच्याच जोडीला मला आणखी नाव डोळ्यासमोर येतं ते अति गुणी औषध ANACARDIUM ( म्हणजे बिब्बा ) याची खास औषधी लक्षणे म्हणजे आयत्यावेळी आठवणीने दगा देणे, विध्यार्थ्यांच्या बाबतीत सातत्याने घडणारी गोष्ट प्रश्नपत्रिका लिहताना आयत्यावेळी काही आठवत नाही, बरं त्या-ने सडकून अभ्यास केलेला असतो, बुद्धीने तल्लख असतो, घरी आल्यावर सर्व उत्तरे धडाधड देता येतात, फक्त पेपर लिहताना आयत्यावेळी मात्र स्मृतीने दगा दिलेला असतो. या स्थितीला इग्रजीत Examination Funk असे म्हणतात. –

थोडे विषयांतर करून खास विध्यार्थ्यासाठी, Examination Funk, Loss of Concentration,आणि जबाबदारीचे ओझं त्यामुळे मेंदूवर पडणा-या मानसिक ताणामुळे स्मृतिभ्रंश, शारीरिक मानसिक निरुत्साह- Neuras Thenia, Brainfag, or Cerebral Astthenia, Tic Doulou Reux, Agorphobia, वृद्धत्वामुळे आलेले मानसिक कमीपण,किंवा जन्मजात बथ्थड अशांसाठी खास औषधी व उपचार यासाठी हा लेखाचा उपभाग लक्षणासह सादर करतो. लक्षणामुळे हे सदर वस्तृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विध्यार्थ्यांसाठी व्यवस्थित अभ्यास करूनही ऐन परीक्षेत मनाचा गोंधळ होउन प्रश्नपत्रिका नीट सोडवता आली नाही, असं का होतं एक मनावर दडपण, परीक्षा जवळ आली की विध्यार्थ्या चा Nervous पणा वाढू लागतो, मनाची घब-राहट होते, अभ्यास पुरेसा झाला असं वाटत नाही, रात्रंदिवस जागरणं करून, खेळ, गप्पाष्टक, भटकंती सगळं बंद, काहींच्या मनात वर्षभर अभ्यास न केल्याची खंतसुद्धा असते, खास कृउन १२वी च्या परीक्षेत घवघवीत यशाचा वडिलांकडून तगादा असतो कारण त्यांनी क्लाससाठी, इतर गोष्टींसाठी खूप खर्च केलेला असतो, पुढच्या भविष्याचा विचार सुप्तपणे टोकत असतो, या सगळ्याचा परिपाक मेंदूतील ग्रेमेटरवर व नसां शिथील होतात,अशावेळी अभ्यास चांगला झाला असूनही आत्मविश्वासाच्या अभावामुळे पेपर सोडवताना आठवणीनी, स्मृतीने दगा दिल्यामुळे उत्तरे नीट लिहता येत नाहीत, यालाच एक्झामिनिशन फंक म्हणतात,
औषधे calc. Fluorica fuorica -12 or 30 2) kali phos 30 & ३) silica 30 कल्के फ्लुओर शिथिल नसा-शिरांचा लवचीकपणा टिकवून योग्यतो ताठरपणा आणतो, २ ) काली फॉस आलेला नर्व्हसनेस घालवतो, ३) सिलिका विचा-रातील सैरभैरपणा नाहीसा करून, एकाग्रता वाढवितो,- ग्रहणशक्ती वाढते. उपरोक्त लिखाण हे गाईड लाईन आहे,त्यात अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. परस्पर औषध घेउ नये.
२ ) काली फॉस आणि सिलिका -- वकील, डॉक्टर, मोठेले एक्झीक्यूटिव्ह ऑफिसर्स यांच्यात जबरदस्त आत्मवि-श्वास असतो, एक अत्युच्च वैचारिक पातळी असते, पण कारणवशात एखाद्या कामात नको तेवढया घेतलेल्या बौद्धिक मेहनतीचा परिणाम मेंदू आणि नसा याना थकान येते, शैथ्य येते, मनात येतं एवढी मेहनत घेतली आहे, काय होईल हाविचार मनात येणं हेच मेंदूच्या थकावटीचे लक्षणं आहे, उपरोक्त औषधांनी थकान दूर होउन अशा प्रकांड पंडिताना सहज दिलासा मिळतो.
३ ) लाय्कोपोडियम खास करून अतिशय तल्लख बुद्धीचा, उत्कृष्ट वक्तृत्व, अमोघ वाणी असलेला शरीराने कृश, कुठल्याही विषयात पारंगत, सखोल, पण एकलांडा, त्याच्यावर प्रेम- आदर करणा-यांत बसेल,उठेल, त्याचं बोलणं एकणा-याला ज्ञानाची मेजवानी वाटेल, इतक्या सहजपणे तो अवघड विषयावर बोलेल, त्याच्या विद्वत्तेबध्दल आदर असेल अशाच लोकांच्यात तो रममाण होतो, त्याचा एक समज-गैरसमज आपल्याला समजून घेणारी, आपल्या वि-षयाची गोडी असणारी तर राहोच पण सांगोपांग अभ्यास करू इच्छिणारी व्यासंगी माणसंच नाहीत, अशा लोकांसमोर एखाद्या विषयावर बोलणंच नको, वकील, न्यायाधीश, राजकारणपटू, प्रथितयश अभ्यासक,उद्योजक,डॉक्टर, अशा लोकां-साठीच हे औषध नैराश्य कमी करून मानसिकबल- आत्मविश्वास वाढविणारं चांगल्या वक्त्यासाठींच.

औषधोपचारलेख

प्रतिक्रिया

हाडक्या's picture

19 Jun 2014 - 7:21 pm | हाडक्या

वोके.. मी या वादाला तार्किकदृष्ट्या पहायचा प्रयत्न करतोय..

म्हणजे, तुम्हाला होमिओपथीच्या औषधांबद्दल (महिती नाही म्हणून असेल) आक्षेप नाही.
ते योग्य (कमीत कमी डिटेक्टेबल तरी) मात्रेमध्ये असेल तर गुणकारी असेल (असू शकेल) असे तुम्ही गृहित धरले आहे.

आता इतरांसाठी (विरोधी आणि समर्थक) हाच प्रश्न -
पुरेश्या मात्रेमध्ये औषध शरीरात जात असेल तर ते गुणकारी असेल की नाही ?
जर असेल तर विरोध करणार्‍यांची कारणे अजून स्प्ष्ट होतील का ? (आपण गविंचा आक्षेप मान्य केला आहे तो क्षणभर बाजूला ठेवूयात)
जर औषधे कार्य करतात तर या पॅथीला 'भंपक' म्हणता येईल का ?
जर औषधे कार्य करत नसतील तर पॅथीचे तज्ञ तसेच विरोधी तज्ञ यांच्या लक्षात ही बाब नाही आलीय का अजून ? मग तर पॅथीच रदबादल व्हायला हवी. लोकांना कायदेशीर पदवी (अथवा पदविका ) कशी दिली जाते जगभर ?

तसेच या उपचार-प्रणालीच्या अनुशंगाने (बाजूने) जर काही संशोधन होत असेल तर समर्थकांनी अजून का मांडले नाहीये ? की इथल्या समर्थकांना माहिती नाहीये ?

(अजून बरेच प्रश्न उभे राहतील परंतु आतापुरते इतकेच..)

असंका's picture

20 Jun 2014 - 12:21 am | असंका

हे छान उत्तर दिलेत आपण. छोटेखानी. जेव्हढ्यास तेव्ह्ढे. मुद्देसूद. आपण एका अज्ञ माणसाशी बोलत आहोत हे शेवटी एकदाचे आप्ल्याला कळले. फारच छान.

आपण दिले आहेत त्या दुव्यात नवीन काहीच नाही कळलं. त्याच तिकिटावर तोच खेळ कितीवेळा बघायचा...

साहेब, जगात चालताना, कुणाचा अनुभव प्रमाण मानायचा- स्वत:चा की इतरांचा? आपली थिअरी तर रॉक सॉलिड आहे. पण त्यातून गुण कसा येतो, ते कळत नाही. उलट त्यामुळेच जादू वगैरे शब्द मनात यायला लागले. गुण कशामुळे येतो हे कळणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. (जसं भुंग्याच्या उडण्याचं गणित आपल्या आवाक्याबाहेरचं आहे तसंच...).

पण गुण अनेकदा आलेला आहे. आणि तत्काळ.

वरील प्रतिसाद हा श्री राजेश घासकडवी यांच्या प्रतिसादास आहे.

राजेश घासकडवी's picture

20 Jun 2014 - 1:47 am | राजेश घासकडवी

साहेब, जगात चालताना, कुणाचा अनुभव प्रमाण मानायचा- स्वत:चा की इतरांचा? आपली थिअरी तर रॉक सॉलिड आहे. पण त्यातून गुण कसा येतो, ते कळत नाही.

गुण येणं हे बहुतेक वेळा शरीरच आपलं आपण करतं. त्यामुळे 'आठ दिवस मॉडर्न मेडिसिनची औषधं घेतली, बरं वाटलं नाही, मग होमिओपथीची औषधं घेतली, दोन दिवसात आराम पडला' यासारखे आत्मानुभव हे फसवे असू शकतात, कारण तो पहिल्या आठ दिवसांच्या औषधांचा लेट इफेक्ट असू शकतो, किंवा तसंही ते दुखणं दहा दिवसांत बरं होणारं असू शकतं.

अनेक लोकांना गुण आल्यासारखा परिणाम दिसणं यासाठी काही लागत नाही. या लेखात असा विश्वास कसा पसरतो हे स्टॉक मार्केट गुरूचं उदाहरण देऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

तेव्हा तुम्हाला ज्यावर विश्वास ठेवायचा त्यावर ठेवा. पण त्यावरून 'अमुक अमुक पदार्थ हा औषध आहे' असं म्हणता येत नाही. 'मला हा पदार्थ घेतल्यावर फायदा झाला असं वाटतं' इतपतच म्हणता येतं. तुम्हाला आवडो न आवडो, औषध म्हणून मान्यता मिळण्यासाठी निकष आहेत. त्या निकषांवर होमिओपथीचं काहीच उतरत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

16 Jun 2014 - 7:45 pm | प्रसाद गोडबोले

इथे होमिओपथीच्या नावाने शंख करणार्‍या किती जणांनी मटेरीया मेडिका वाचले आहे किंवा किमान चाळले आहे?

हो हो मीही हेच म्हणणार होतो ...

अजुन काही प्रश्न :
पृथ्वी गोल आहे म्हणणार्‍यांनी कितीवेळा पृथ्वी फिरुन पाहिलिये , किंव्वा पृथ्वी सुर्याभोवती फिरते म्हणणार्‍यांन पकी किती जंणांना त्याचा अनुभव आलाय ? कशावरुन सुर्य पृथ्वी भोवती फिरत नाही ?

=))

आदिजोशी's picture

16 Jun 2014 - 8:01 pm | आदिजोशी

इथे लोकं वादासाठी वाद घालत आहेत. होमिओपॅथी हे थोतांड आहे असं म्हणणार्‍या एकानेही ज्यांना त्याचा उपयोग झाला तो कसा ह्याचे उत्तर दिले नाही. प्लासिबो इफेक्ट असला तर एखाद्य चालून जाईल. कैक वर्ष, कैक रोगांवर वेगवेगळ्या लोकांना उपचाराने बरं वाटलं असेल तर तो प्लासिबो इफेक्ट कसा असेल.

असो. आंधळेपणे विरोध करणार्‍यांकडून ठोस उत्तर मिळायची अपेक्षा नसल्याने ह्या विषयावर आमची लेखनसीमा.

कवितानागेश's picture

16 Jun 2014 - 8:11 pm | कवितानागेश

बरोबर आहे. इथे लोकं वादासाठी वाद घालत आहेत.
शहाण्या माणसानी उगाच आपले रक्त तापवून घेउ नये. उन्चावरुन गम्मत बघावी. ;)

चित्रगुप्त's picture

16 Jun 2014 - 10:35 pm | चित्रगुप्त

होमियोपाथीची औषधे ही अमूक रोगावर अमूक औषध अशी ठोकळ नसून लक्षणांप्रमाणे औषध दिले जाते. म्हणूनच डॉक्टर आधी रोग्याला खूपसे प्रश्न विचारत असतात.
धागार्त्यास विनंती की त्यांनी नमुन्यादाखल एकाद्या पेशंटास काय काय प्रश्न विचारले, ते इथे लिहावे.

चौकटराजा's picture

17 Jun 2014 - 8:24 am | चौकटराजा

लग्न जमण्यावर होमिओपाथीत काही औषध आहे का ?
संपादक मंडळ , हा प्रतिसाद टवाळखोरीचा वाटल्यास उडवून टाकावा. प्लीज !

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2014 - 9:33 am | अत्रुप्त आत्मा

@लग्न जमण्यावर होमिओपाथीत काही औषध आहे का ?>>> =)) होमिओच काय कुटच्याही पॅथित असेल...तरी सांगा! =))

चित्रगुप्त's picture

17 Jun 2014 - 10:55 am | चित्रगुप्त

लग्न जमण्यावर औषधे आहेत.
"गलत साबित करने वाले को दस हजार नगद इनाम"
(नोटः यह कोई धोका, फरेब नही है, आजतक सैकडो लोग इनाम पा चुके है)

१. लग्न जमत नाहीये, आणि ते जमावे यासाठी: नक्सव्हॉम ३०, कॅलेन्डुला २००
२. लग्न तर जमले, पण पुढला त्रास टाळण्यासाठी: कल्केरिया कार्ब २००, सिलिशिया २००
३. लग्न जमूच नये यासाठी: कॅन्थेरिस १००० (फक्त एक डोस) त्यानंतर कॅनॅबिस इंडिका ३० आणि हेपर सल्फ ३०

वरील सर्व उपचार स्वतःचे लग्नाचे संबंधित आहेत. मुलाचे, मुलीचे, वडिलांचे, आत्याचे, मामीचे, मित्राचे, मैत्रिणीचे वगैरे लग्नासंबधी दुसरी औषधे आहेत. गरजवंतांनी व्यनितून संपर्क करावा.

कवितानागेश's picture

17 Jun 2014 - 11:39 am | कवितानागेश

खरोखरच कॅनॅबिस इंडिका ३० ????? =))

राजेश घासकडवी's picture

19 Jun 2014 - 6:36 pm | राजेश घासकडवी

कॅनॅबिस इंडिका उत्तमच, पण त्याचं ३० डायल्यूशन? एक रेणूसुद्धा शरीरात जाणार नाही, मग काय मजा? ;)

म्हणजे सर्दीवर काही औषध आहे का...त्या धर्तीवर का?
;-)

सुबोध खरे's picture

17 Jun 2014 - 10:51 am | सुबोध खरे

म्हणजे लग्न जमण्यासाठी का लग्न न जमण्यासाठी?

प्रसाद१९७१'s picture

17 Jun 2014 - 10:56 am | प्रसाद१९७१

लग्न जमण्यासाठी का लग्न न जमण्यासाठी?>>>>> लग्न झाल्यावर जमावे म्हणुन असतील

कवितानागेश's picture

17 Jun 2014 - 11:53 am | कवितानागेश

सर्वसाधारणपणे माझं निरिक्षण असं आहे, की लोक फक्त पॅथीची माहिती नसताना फुकटची चर्चा करतायत. पण आहार विहार आणि मानसिक आरोग्य यादेखिल तितक्याच महत्त्वाच्या गोष्टींकडे पार दुर्लक्ष करतात.
उदाहरणार्थ; मला सर्दी झाली आहे. तरीही मी तिन्ही त्रिकाळ दही खातेय, पावसात भिजतेय, एसी २० वर ठेउन बसतेय आणि जागरणं करतेय.... मग जगातला कुठलाही डॉक्टर आणि कुठलिही पॅथी मला बरं करु शकणार नाहीत. आणि मी सगळ्याच्या नावानी शिमगा करायला मोकळी होईन! ;)
सगळ्या रोग्यांना वाटत असतं की डोक्टरनी जादूची गोळी द्यावी आणि एका क्षणात आपल्याला बरं करावं, म्हणजे आपण पुन्हा उनाडायला मोकळे. पण तसं कधीच होत नाही.
पॅथीच्या चर्चेला अर्थ नाही. कारण सगळ्याच पॅथी आपापल्या जागी योग्य आहेत. गरजेप्रमाने त्या त्या वेळेस काय वापरायचं हे रोग्यालादेखिल कळ्णं आवश्यक आहे. पण आपल्याला स्वतःला आपल्या विचित्र लाईफस्ताईलमध्ये शरीर नक्की कसं काम करतंय आणि काय काळजी घ्यायला हवी याचं भान नसतं. मग एखादी "पॅथी" कशी काम करतेय हे कुणालाही कळणं फार दूरची गोष्ट आहे. :)

उदाहरणार्थ; मला सर्दी झाली आहे. तरीही मी तिन्ही त्रिकाळ दही खातेय, पावसात भिजतेय, एसी २० वर ठेउन बसतेय आणि जागरणं करतेय.... मग जगातला कुठलाही डॉक्टर आणि कुठलिही पॅथी मला बरं करु शकणार नाहीत.

म्हणजे वरील गोष्टी केल्यामुळे सर्दी होते असं म्हणायचंय का?

पण मग होमिओपॅथी तत्त्वज्ञाना (- "सारख्याने सारख्याचा नाश") अनुसार तर आपली सर्दी हेच सगळे केल्यामुळे बरी व्हायला हवी हो?

चित्रगुप्त's picture

17 Jun 2014 - 12:15 pm | चित्रगुप्त

म्हणूनच समर्थांनी 'सावधपण सर्वविषयी' आणि 'विवेक' यांचं महत्व सांगितलेलं आहे.

प्यारे१'s picture

17 Jun 2014 - 2:55 pm | प्यारे१

थोडक्यात 'पथी' बरोबर 'पथ्य' देखील तेवढेच किंबहुना त्याहून महत्त्वाचे...

बाळ सप्रे's picture

17 Jun 2014 - 2:56 pm | बाळ सप्रे

सर्वसाधारणपणे माझं निरिक्षण असं आहे, की लोक फक्त पॅथीची माहिती नसताना फुकटची चर्चा करतायत

असहमत..
खूपजणांनी खूप वाचन करून फार योग्य प्रश्न विचारले आहेत.. ज्यावर योग्य उत्तर देण्याचा प्रयत्नही झालेला नाही..
अनेकांचा आक्षेप विरलीकरणाच्या संकल्पनेवर आहे.. औषधाची उपयुक्तता गृहीत धरली तरी ती संकल्पना पचनी पडत नाही..

बॅटमॅन's picture

17 Jun 2014 - 3:02 pm | बॅटमॅन

बेसिक शंकांना उत्तरे तर देता येत नाहीत, मग प्रश्नकर्त्यांवर सरसहा आरोप करून आपल्या अंधश्रद्धेचे समर्थन करायचे हा प्रकार इथे कैकदा दिसून येतोय. प्रश्नकर्ते डॉक्टर नसतील म्हणून त्यांचे सर्व प्रश्नच रद्दबातल कशावरून? अन समजा तोच न्याय लावायचा असेल तर समर्थक तरी जे डॉक्तर नाहीत त्यांना तरी काय कळतंय?

प्रसाद१९७१'s picture

17 Jun 2014 - 3:21 pm | प्रसाद१९७१

मी डॉक्टर नसेन पण मूर्ख पण नाही

राज्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांच्या अॅलोपॅथी प्रॅक्टीस बाबतच्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात होमिओपॅथीक डॉक्टरांना अत्यावश्यक सेवा म्हणून अॅलोपॅथी प्रॅक्टीस करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचे विधेयक पारीत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधानसभेत पारीत करण्यात आलेल्या विधेयकानुसार आता एक वर्षाचा फार्माकॉलॉजीचा कोर्स केल्यास होमिओपॅथीक डॉक्टरांना अत्यावश्यक सेवा म्हणून अॅलोपॅथी प्रॅक्टीस करता येणार आहे. राज्यातील ग्रामीण भाग तसेच शहरातील मध्यमवर्गीय व झोपडपट्टी भागात सर्वाधीक होमिओपॅथीक डोक्टरांकडून रुग्णसेवा केली जाते. परंतु, रुग्णांवर तातडीच्या उपचारांसाठी होमिओपॅथीक डॉक्टरांना अॅलोपॅथी प्रॅक्टीस करता येत नव्हती.

आमदार वसंत गिते यांनी या बाबत राज्य विधानसभेत आवाज उठवत होमिओपॅथीक डोक्टरांच्या न्याय्य मागण्या लावून धरल्या होत्या. आता राज्यातील ६० हजाराच्यावर होमिओपॅथीक डॉक्टरांना फार्माकॉलॉजिचा कोर्स पूर्ण केल्यानंतर अॅलोपॅथी प्रॅक्टीस करण्याचा मार्ग मोकळा होईल. या निर्णयाचे राज्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांनी आधीच जोरदार स्वागत केलेले आहे.

नव्याने करण्यात आलेल्या विधेयकात बॉम्बे होमिओपॅथीक प्रॅक्टीशनर्स एक्ट १९५९ मधील "ओन्ली" हा शब्द वगळण्यात आला असून, एमएमसी एक्ट १९६५ मध्येही दुरुस्ती करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे होमिओपॅथीक डॉक्टरांना अॅलोपॅथीची दारे उघडून देण्यात आली आहेत, असे मनसे प्रवक्त्या शर्वरी लथ यांनी म्हटले आहे.

साभारः होमिओपॅथीक डॉक्टरांना अखेर न्याय

हे चुक आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट तत्वता मान्य नसताना, त्याची प्रॅक्टीस करण्याची परवानगी कशी दिली जाते?

मी दुसरीकडे म्हणल्या प्रमाणे हे म्हणजे एखाद्या नास्तिकाला देवळाचा पुजारी करण्यासारखे आहे.

अनुप ढेरे's picture

19 Jun 2014 - 2:19 pm | अनुप ढेरे

होमिओपदीच्या डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्र अमान्य असते का?

प्रसाद१९७१'s picture

19 Jun 2014 - 3:21 pm | प्रसाद१९७१

होमिओपदीच्या डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्र अमान्य असते का?

हो.

होमिओ पाथी च्या लोकांची शरीराची कार्य कशी चालतात ह्या बद्दल पूर्ण वेगळी मते आहेत.
एखद्या औषधाची clinical trial कशी घ्यावी हे त्यांना माहीती नाही.

त्यांना bacteria, virus वगैरे मान्य नाही. रक्ताचे विविध घटक, हार्मोन असले प्रकार माहिती/मान्य नाहीत. सध्या भारतात हे विषय म्हणुन शिकवत असतील, पण ते होमिओपाथीचे भाग नाहीत.

या निर्णयाचे राज्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांनी आधीच जोरदार स्वागत केलेले आहे.
नाहीतरी ९५ टक्के लोक ते अगोदरच करत होते आता फक्त राजमान्यता मिळाली.
उरलेले पाच टक्के( कि एक टक्का) जे शुद्ध होमियोपथी चा व्यवसाय करतात ते आधुनिक वैद्यकाच्या साईड इफेक्ट्स बद्दल कंठशोष करून आपली टिमकी वाजवत असतात. उदा. डॉक्टर बात्रांचे जितके लेख मी कुतूहल म्हणून चाळले त्यात एकही लेख असा आढळला नाही कि त्यात "साईड इफेक्ट्स" बद्दल आरडा ओरडा नाही. हिच परिस्थिती इतर होमेओपाथ ची आहे.
माझे म्हणणे एकच आपली रेषा मोठी आहे दाखवण्यासाठी दुसरी रेषा लहान आहे हे दाखवणे आवश्यक आहे का?

सुबोध खरे's picture

19 Jun 2014 - 2:40 pm | सुबोध खरे

मग हे डॉक्टर आधुनिक लस टोचणार कि होमियोपथिक लस टोचणार?
पहा http://www.sciencebasedmedicine.org/homeopathic-vaccines/

प्रसाद१९७१'s picture

19 Jun 2014 - 3:24 pm | प्रसाद१९७१

लोकांच्या हे का लक्षात येत नाही की नीट Clinical Trials झाल्यामुळे "साईड इफेक्ट्स" लक्षात आले आहेत. Trials करायच्या नाहीत आणि म्हणायचे की "साईड इफेक्ट्स" नाहीत, ही शुद्ध बुवाबाजी आहे.

पण नशिबानी होमिओपाथीला "साईड इफेक्ट्स" ची भिती नाही, साखरेच्या गोळ्यांचा "साईड इफेक्ट" काय होणार (फक्त मधुमेहींना होत असणार).

इरसाल's picture

19 Jun 2014 - 3:44 pm | इरसाल

जे गंडे - दोरे देतात त्यांची गंडोरापॅथी असते का मग ?......डोरा डोरा.......मिनी डोरा.

प्रसाद१९७१'s picture

19 Jun 2014 - 4:42 pm | प्रसाद१९७१

:-) त्या लोकांना डॉक्टर ओफ गंडोपाथी असे का म्हणु नये?

बंगाली बाबांना नावापुढे डॉक्टर ही पदवी लावायची परवानगी का मिळु नये?

आजची 'आयुष' मंत्रालयाची बातमी वाचल्यावर आठवण झाली ती या आणि आयुर्वेदावरच्या वाचनीय धाग्यांची.

या नवीन मंत्रालयावर आता आयुर्वेद, योगोपचार, होमिओपॅथी यांबरोबरच सिद्ध आणि युनानी या पद्दतींच्या वापराबद्दल लोकजागृती करण्याची (promoting traditional medicines) जबाबदारी असेल असं दिसतं. या जबाबदारीत या निरनिराळ्या उपचारपद्दतींच्या प्रमाणीकरणाबद्दल प्रामाणिक प्रयत्न करणं देखील अभिप्रेत असेल अशी आशा आहे. यात औषधांची सुरक्षितता आणि उपयुक्तता स्थापित करण्यासाठी प्राण्यांवर व माणसांवर विविध प्रकारच्या चाचण्या करणं (pre-clinical and clinical trials), तसंच भोंदू व्यावसायिकांवर कठोर नियंत्रण ठेवणं हे सर्व समाविष्ट असेल. हे खास खातं स्थापन करणं ही चांगली पायरी असेल, पण या मंत्रालयाने वरील जबाबदार्‍यादेखील समर्थपणे सांभाळल्या पाहिजेत.

श्री. श्रीपाद येस्सो नाईक यांची या नव्या खात्याचे मंत्री म्हणून नेमणूक झाल्याचं वृत्तात म्हंटलं आहे. त्यांच्याकडे या व्यतिरिक्त सांस्कृतिक आणि पर्यटन खात्याचे स्वतंत्र मंत्री म्हणूनही पदभार आहे.