।। नया दिन ।।
नवा दिवस
उगवलाय!
घेवून
नवी पहाट!
आलाय
नवा प्रहर!
टाकून
जुनी कात!
कालचाच मावळलेला
तो सूर्य,
आला आहे!
नव्या आशेचा
नवा सोनेरी किरणांचा
शर्ट घालून!
प्रत्येकाला
जगण्याची
नवी उमेद द्यायला!
प्रत्येकाच्या जीवनात
अंधार दूर करुन
प्रकाश वाटायला!
चला रोज
स्वागत करुया
त्या सूर्याचे !
जो घेवून येतो
आपल्या जीवनात,
रोज एक
नवी पहाट!
नवे चैतन्य!
नवा दिवस!
नया दिन !!
# लेखक - निमिष सोनार
प्रतिक्रिया
12 Jun 2014 - 3:00 pm | आयुर्हित
प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद देण्याची
आणि
प्रत्येकाच्या जीवनात अंधार दूर करुन प्रकाश वाटायची खरंच गरज आहे.
कवितारुपी नवे चैतन्य दिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद.
13 Jun 2014 - 4:21 pm | वेल्लाभट
... म्हणजे... ठीक आहे.... पण.... ठीक आहे.
14 Jun 2014 - 3:00 am | भृशुंडी
हे झेपलं नाही.