कृष्ण

आनंदमयी's picture
आनंदमयी in जे न देखे रवी...
7 Jun 2014 - 12:17 am

रूप सावळे आतीव सुंदर
भक्तिरसाचा मनात पाझर
उठे शहारा अंगांगावर
अंतरात वसतो मुरलीधर

निळा गंध त्या निळसर देही
मोहक इतुका तो निर्मोही
वरवर सारे चंचल श्यामल
आत गूढ अविचलसे काही

चराचरांतून घुमे बासरी
सप्तसूर सावळा मुरारी
वाहे यमुना अमृत होवुन
उठती आतुन अथांग लहरी

प्राण नांदतो ह्या तीरावर
त्या तीरावर मन झेपावे
कृष्ण मूर्त सर्वस्व पुरे हे
कृष्णातच समरसून जावे

© डॉ.अदिती जोशी

शांतरसकविता

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

7 Jun 2014 - 10:43 am | आयुर्हित

वाचतांना एक वेगळीच अनुभुती मिळाली.
कवयित्रीचे मन कसे विचार करत आहे, ते ही अगदी स्पष्ट दिसुन येते.

"वरवर सारे चंचल श्यामल
आत गूढ अविचलसे काही"
काहीशी द्विधा मनस्थिती आहे असेही वाटते. यामूळे कवितेत दोन प्रवाह/लेयर्स दिसतात.

"प्राण नांदतो ह्या तीरावर
त्या तीरावर मन झेपावे"
या वाक्यावरून वरवर शांत वाटणारे मन आतून अशांत आहे हेच खरे!

मनातले विचार हवे तसे कवितेत उतरवणे ही पण एक कलाच आहे.
कवयित्री त्यात १००% उत्तीर्ण झाली आहे.

एकंदरीत फारच छान कविता आहे!

असंका's picture

7 Jun 2014 - 11:14 am | असंका

सुरेख!!
धन्यवाद!!

संजय क्षीरसागर's picture

7 Jun 2014 - 1:17 pm | संजय क्षीरसागर

त्याच्याकडे पाहण्याचा वेगळा नज़रिया म्हणजे कृष्ण. त्यामुळे भक्तीरसाशी या ओळी विसंगत आहेत :

प्राण नांदतो ह्या तीरावर
त्या तीरावर मन झेपावे
कृष्ण मूर्त सर्वस्व पुरे हे
कृष्णातच समरसून जावे

जर संपूर्ण अस्तित्व कृष्णमय आहे तर त्याला दोन तीर कसे असतील? अस्तित्वाशी एकरुप (कृष्णमय) व्ह्यायचं असेल तर मनातली ही विसंगती दूर व्ह्यायला हवी.

आत्मशून्य's picture

7 Jun 2014 - 7:36 pm | आत्मशून्य

जर संपूर्ण अस्तित्व कृष्णमय आहे तर त्याला दोन तीर कसे असतील ?

कृष्णमयता ही स्थिती आहे व दोन तीर ही प्रोसेस... होप यु गॉट इट इन अ वे यु युज टु फ्रेज द वर्ड्स.

प्यारे१'s picture

7 Jun 2014 - 1:37 pm | प्यारे१

कविता छान जमलीये!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jun 2014 - 5:04 pm | अत्रुप्त आत्मा

+१

मूकवाचक's picture

9 Jun 2014 - 6:15 pm | मूकवाचक

+२

मूकवाचक's picture

9 Jun 2014 - 6:15 pm | मूकवाचक

+२

कवितानागेश's picture

7 Jun 2014 - 7:17 pm | कवितानागेश

सुंदर कविता. दुसरं कडवं फार आवडलं.. :)

यशोधरा's picture

9 Jun 2014 - 8:42 am | यशोधरा

मलाही :)

निलरंजन's picture

9 Jun 2014 - 8:22 am | निलरंजन

जय हो माते आनंदमयी

स्पा's picture

9 Jun 2014 - 9:41 am | स्पा

सुरेख

प्राण नांदतो ह्या तीरावर त्या तीरावर मन झेपावे

पैलतीरी जाण्याची आस दिसते ह्यातून .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2014 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजुन लिहा.

दिलीप बिरुटे

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Jun 2014 - 9:00 am | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर अभिव्यक्ती!

मदनबाण's picture

12 Jun 2014 - 10:19 am | मदनबाण

सुरेख...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}

इन्दुसुता's picture

13 Jun 2014 - 8:53 am | इन्दुसुता

कविता आवडली.

पैसा's picture

13 Jun 2014 - 9:29 pm | पैसा

कविता आवडली!

सुधीर's picture

14 Jun 2014 - 9:52 am | सुधीर

कविता आवडली!

चाणक्य's picture

15 Jun 2014 - 4:54 pm | चाणक्य

सुरेख कविता. आवडली