तीन शहाणे अतिशहाणे
हातवारे करीत होते
उगवत्या दिवसाला
रात्र ठरवीत होते.
ऊन तेजस्वी सहन न झाले
बंद खोलीत ते जाऊनी बैसले.
अंधारात बत्ती तयांची पेटली
युरेका युरेका तिघे ओरडले.
ज्या अर्थी अंधार इथे
दिवस नाही रात्र असे.
आपले तर्क ठरले खरे
आनंदी शहाणे नाचले.
टीप : कॉकटेल लाउंज मध्ये, मिसळपाव सोबत, सोमरस प्रश्न केल्याने डोक्याची बत्ती जळेल, कवितेचा उलगडा होईल.
प्रतिक्रिया
22 May 2014 - 12:19 am | भृशुंडी
आज सकाळीच काय हो?
22 May 2014 - 12:33 am | आत्मशून्य
22 May 2014 - 9:59 am | मुक्त विहारि
आजकाल नाना प्रकारचे गहनविचार करणे सोडून दिले आहे.
त्यामुळे किंचीत विचार करायला, एक छोटासा, पक्षी-प्राणी-मासे आणि तीर्थ कट्टा करू या.
22 May 2014 - 11:10 am | अत्रुप्त आत्मा
प्रेषक, विडंबन सराईत, Thu, 22/05/2014 - 11:40
तीन काव्यकिडे अतिशहाणे
कविता करीत होते
बोलत्या संस्थळाला
पेढे भरवीत होते.
प्रतिसाद तेजस्वी सह न झाले
आपुल्याच-खोलीत ते जाऊनी बैसले.
वि'जनात बत्ती तयांची पेटली
सुरेखा सुरेखा तिघे ओरडले.
ज्या अर्थी जिलबी मिळते
मठ्ठ्यास'ही, पात्र असे.
आपण आपल्यात असलेले बरे
आनंदी अतिशहाणे नाचले.
टीप : कॉकटेल लाउन----मधे,उसळपाव सोबत,आत्मगंडरस प्राशन केल्याने डोक्याची बत्ती (असलीच तर..)जळेल,आणि ताकाचा मठ्ठा-होइल! :p
काव्यरस:
बोट का लाविता? ;)
22 May 2014 - 11:22 am | प्रचेतस
*yahoo*
बर्याच दिवसांनी बुवांनी केलेलं विडंबन वाचायला मिळालं.
22 May 2014 - 9:25 pm | अत्रुप्त आत्मा
:D :p =))
22 May 2014 - 3:07 pm | मुक्त विहारि
कधीतरी पुण्याला आलोच तर, आमच्या कडून तुम्हाला म्हणाल तिथे पार्टी.
22 May 2014 - 3:14 pm | सूड
'पाटंच्या पारामंदी, माझा कोंबडा घाली साद' या जात्यावरच्या ओवीच्या चालीवर परफेक्ट बसलंय. *mosking*
22 May 2014 - 10:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
22 May 2014 - 10:42 pm | आत्मशून्य
:)
25 May 2014 - 9:47 pm | सस्नेह
खंग्री इडंबन !और आंदो..