भूलेश्वर -२

डोमकावळा's picture
डोमकावळा in जनातलं, मनातलं
28 Jul 2008 - 3:36 pm

ध्रुव यांचा भुलेश्वर हा लेख वाचून त्याबाबत आणखी थोडी माहिती द्यावीशी वाटते.

मंदिराची जागा ही अतिशय शांत व निवांत असून मंदिरात प्रवेश हा काहीसा वेगळ्या पद्धतीचा आहे. मंदिराच्या मुख्य दाराच्या समोर एक प्रचंड आकाराची पितळी (किंवा मिश्रधातूची) भग्न झालेली घंटा आहे. मुख्य दारातून आत शिरता लगेच एक अंधारी खोली असून तिच्या उजव्या बाजूला एक दगडी जिना आहे जो मंदिरात जातो. जिना चढून गेल्यावर साधारण तीन साडेतीन फुटी उंच, एक दीड फुटी रुंद आणि तीन साडेतीन फुटी लांब असा एक दगडी नंदी आहे. नंदी सुद्धा नेहेमीसारखा नसून त्याची मान एका बाजूला वळालेली आहे. नंदी समोरुन गाभा-याकडे जाताना मधे एक छोटे दालन आहे. त्यात खाली दगडी कासव व छताला एक चक्र आहे. गाभा-यातल्या पिंडीची शाळुंका बाजुला ठेवलेली आहे. या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे असलेल्या शिल्पांपैकी बहुतेक शिल्प ही स्त्री रुपातील आहेत. मुख्य मंदिराच्या आतील भिंतीवर रामायण-महाभारतातील अनेक प्रसंग कोरलेले आहेत.
मंदिराच्या काही ऐतिहासिक व अध्यात्मिक गोष्टी मंदिराचे पुजारी यांनी सांगीतल्या. त्यापैकी काही (जितक्या आठवत आहेत तितक्या) इथे मांडत आहे.

हे मंदिर हे १३ व्या शतकात बांधले गेले आहे.या मंदिराच्या निर्माणासाठी राजस्थानातल्या मारवाड प्रांतातल्या कुशल कारागिरांना बोलवण्यात आले होते.

मुघल सरदार मुल्ला नसरुद्दिन याच्या बरोबर झालेल्या लढाईच्या काळात या मंदिराच्या शिल्पांची तोडफोड झाली.
त्यानंतर पेशव्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.

या मंदिरातील स्त्री शिल्पांबद्दल सांगायचं झालं तर, हिंदू संस्कृतीत स्त्री ही शक्तीस्वरूप मानली गेली आहे. त्यामुळे येथील बहुतेक देवांची शिल्पं ही या शक्तीस्वरूपात म्हणजेच स्त्रीरुपांत आहेत.

मंदिरात, शाळुंकेच्या जागी प्रसाद ठेवल्यावर तो कमी होतो यामागील आख्यायिका अशी की पेशव्यांचे गुरु (नाव स्मरणात नाही) यांनी या ठिकाणी तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले होते. त्यांनी आशिर्वाद मागितला की जे काही देवाला नैवेद्य म्हणून दाखविले जाईल त्यातला काही भाग देवाने स्विकारावा.

नंदी समोरुन, गाभा-याकडे जाताना दालनातून होणा-या प्रवेशाला देखील एक वेगळे महत्व आहे. दालनाचा उंबरा ओलांडून ज्यावेळी दालनात प्रवेश होतो, तो फक्त शारिरीक असतो. दालनाच्या मध्यभागी छताला असलेल्या चक्राखाली आल्यावर ते चक्र आपल्या शरीराच्या कुडंलीनी चक्रांपैकी मस्तिष्कातल्या चक्रावर आपला प्रभाव पाडते आणि मनातील इतर विचार निघून जातात. त्यामुळे गाभा-यात होणारा प्रवेश हा फक्त शारिरीक न राहता तो सर्वदृष्ट्या संपूर्ण होतो.

तसे हे मंदिर फार शांत व निर्जनस्थळी असले तरी महाशिवरात्रीला येथे बरीच भक्तमंडळी दर्शनाला येतात. उत्कृष्ट शिल्पकाम, वेगळी रचना आणि शांत परिसर यामुळे हे मंदिर अधिकच संमोहक वाटते. मंदिरातले काही फोटो इथे टाकत आहे...

दगडी नंदी.

स्त्री रुपी शिल्पं.

मस्तिष्कातल्या कुडंलीनी चक्रावर प्रभाव पाडणारे चक्र.

हे ठिकाणमाहिती

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

28 Jul 2008 - 4:10 pm | आनंदयात्री

छान माहिती डोम. मिपावरच्या पहिल्या लेखाबद्दल अभिनंदन.

ध्रुव's picture

28 Jul 2008 - 5:50 pm | ध्रुव

भुलेश्वर कायमच लक्षात राहाण्यासारखे आहे. येथील शिल्पकामांबद्दल अथवा मंदिराच्या बांधणीबद्दल काही संदर्भ असल्यास जरूर देणे.
कालच परत भुलेश्वर येथे गेलो होतो. परत एकदा भारी वाटलं.

--
ध्रुव

विजुभाऊ's picture

28 Jul 2008 - 6:03 pm | विजुभाऊ

पेशव्यांचे गुरु हे ब्रम्हेन्द्र स्वामी होत.
सातार्‍याजवळ धावडशी येथे ( झाशीच्या राणीचे माहेर) येथे त्यांची समाधी आहे. हे पेशव्याअंचे गुरु सावकार सल्लागार सर्व काही होते. ( संदर्भ : कान्होजी आम्ग्रे : मनोहर माळगावकर)

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ's picture

28 Jul 2008 - 6:14 pm | विजुभाऊ

पेशव्यांचे गुरु हे ब्रम्हेन्द्र स्वामी होत.
सातार्‍याजवळ धावडशी येथे ( झाशीच्या राणीचे माहेर) येथे त्यांची समाधी आहे. हे पेशव्याअंचे गुरु सावकार सल्लागार सर्व काही होते. ( संदर्भ : कान्होजी आम्ग्रे : मनोहर माळगावकर)

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

डोमकावळा's picture

28 Jul 2008 - 6:20 pm | डोमकावळा

धन्यवाद विजूभाऊ,
माझ्या डोक्यात ब्रह्मानंद स्वामी असंच घोळत होतं...
पण नक्की नसल्याने लिहीलं नाही... :)

गणा मास्तर's picture

29 Jul 2008 - 11:43 am | गणा मास्तर

झाशीच्या राणीचे माहेर सातार्‍याजवळ धावडशी की रत्नागिरी हातखंब्याजवळचे पाली.
तज्ञ लोक प्रकाश टाकतील काय?