विडंबन - विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
28 Jul 2008 - 3:22 pm

खासदार फोडू, सरकार पाडू.
काढीत जाऊ आज "व्हिप" साजणी..!

असंतुष्ट गाठू,पैशास वाटू
कोटीत होई सारे ठीक साजणा..!

नको काळजी तू कर खुशाल बंड,
इलेक्शन विना रे दुजा काय छंद
तुला देतो साथी ,मी हवी ती खाती,
आत्म्यास तूही थोडे वीक साजणी..!

संसदेत चाले अरे हा तमाशा.
डाव्या उजव्यांची कशी एक भाषा
प्रतिष्ठाच सारी धुळीला मिळाली.
कसे गद्दारांचे आले "पीक"साजणा..!

विश्वास निष्ठा लिलावात सारे.
इथे नीतीमत्ता कुठे शोधता रे !
तू का मनाशी ,लाज वाटून घेशी ?
अशी लोकशाहीची आहे "रीत" साजणी..!

-- अभिजीत दाते

मूळ गीत - धुंदीत राहू मस्तीत गाऊ
चित्रपट - बाळा गाऊ कशी अंगाई

विडंबन

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

30 Jul 2008 - 6:51 am | सखाराम_गटणे™

विश्वास निष्ठा लिलावात सारे.
इथे नीतीमत्ता कुठे शोधता रे !
तू का मनाशी ,लाज वाटून घेशी ?
अशी लोकशाहीची आहे "रीत" साजणी..!

हे कडवे, खरी परीस्थीती समोर मांडते.

सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.