विसर

आनंदमयी's picture
आनंदमयी in जे न देखे रवी...
28 Apr 2014 - 12:39 am

भातुकलीचा रंगलेला संपला ग डाव
आता तुला गाठायचा आहे तुझा गाव
आवर सारे तुझे तुझ्या सोबती घेऊन जा
आठवणी तुझ्या इथे तेवढ्या ठेवून जा

तुला पुन्हा मांडायचा आहे नवा खेळ
तुझ्या माझ्या सोबतीची संपली ग वेळ
विसर सखे ओळखीच्या जुन्या वाटा सार्या
हृदयाशी बांधलेल्या सोड जुन्या दोर्या

हरवुदे सोबतीने गुंफलेली माळ
हरवुदे वाट आडवळणी खट्याळ
खुणावती तुला तुझ्या नशिबाच्या रेघा
तुला-मला जोडणारा तोड आता धागा

नको सखे निरोपाचे उगा अश्रू ढाळू
जायचीच निसटून हातातली वाळू

सोसायचा तुझ्या-माझ्या नात्याला दुरावा
जायचे जरी तुला ग सखे तुझ्या गावा...
राहीन मी तुझ्या उरामध्ये ग दाटून
कधी तुझ्या डोळ्यातून येईन बरसून .....

-अदिती शरद जोशी

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Apr 2014 - 8:56 am | मिसळलेला काव्यप्रेमी

छान!

अत्रुप्त आत्मा's picture

28 Apr 2014 - 3:08 pm | अत्रुप्त आत्मा

ठीक!

फारच सुंदर!! एका जोडीदाराचा जीवनप्रवास संपताना अशाच काही भावना सहचराच्या होत असाव्यात :(

मनीषा's picture

29 Apr 2014 - 10:29 pm | मनीषा

सुंदर

वेल्लाभट's picture

2 May 2014 - 2:29 pm | वेल्लाभट

सुरेख! नि:शब्द.