छायाचित्र परिक्षण - ३ :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
28 Jul 2008 - 12:37 pm

राम राम मंडळी,

मिपाचे एक सन्माननीय सभासद सूर्य यांनी मिपावर 'छायाचित्र परिक्षण' हे एक सुंदर सदर सुरू केले आहे. याचे पहिले दोन भाग प्रसिद्ध झाले आहेत. त्यात मिपावरील काही तज्ञ छायाचित्रकारांनी संबंधित छायाचित्राबद्दल आपापले विवेचनही दिले आहे.

आज आम्ही सूर्यदेवांच्या परवानगीविना (ते परवानगी नाकारणार नाहीत याची खात्री आहे म्हणून!) हा तिसरा भाग प्रकाशित करत आहोत. मिपावरील छायाचित्र तज्ञांनी व रसिकांनी खालील छायाचित्राचे परिक्षण करावे. आम्ही आमच्या परिक्षणाने सुरवात करत आहोत!

आमचं परिक्षण - आमच्या मते हे चित्र म्हणजे केवळ एक काव्य आहे, साक्षात एक कविता आहे. एक गझल आहे! :)

असो,

आपला,
(मनाने अजूनही एफ वाय बीकॉमच्या वर्गातला एक तरूण!) तात्या.

कलाकविताआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

28 Jul 2008 - 12:42 pm | मनस्वी

छायाचित्र मस्त आहे. राणीकलर आणि हिरवा रंग आणि गोड हास्य सगळंच एकमेकांशी मेळ खातंय!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

नंदन's picture

28 Jul 2008 - 12:54 pm | नंदन

सुरेख फोटो. छायाचित्राबद्दल तज्ञ मंडळी योग्य तो अभिप्राय देतीलच. तोवर हे गाणं ऐका :) -

Usala Lagla Kolha&thePlayerURL=http://www.esnips.com//escentral/images/widgets/flash/mp3WidgetPlayer.swf"> Get this widget | Track details | eSnips Social DNA

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 1:28 pm | विसोबा खेचर

नंदनसायबा,

लावणी झकासच आहे रे! :)

अवांतर -

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

लेका समर्थ भोजनालयात मोरीचं कालवण चापून दोन तास गपगार झोपणारा तू! तुका रे खय कळता त्या मराठी साहित्यात? :)

आपला,
(काकवीप्रेमी मराठी आंतरजालीय साहित्यिक) तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jul 2008 - 1:27 pm | बिपिन कार्यकर्ते

उफ्फ्फ्फ... तात्या, ते राणीकलर वगैरे जाऊ दे, फोटो चे विषय (ऑब्जेक्ट) च एवढा छान आहे की फोटो सुंदर येणारच. अशी अजून बरीच छायाचित्र परिक्षणं येऊ दे हीच इच्छा. ;)

बिपिन.

केशवसुमार's picture

28 Jul 2008 - 1:57 pm | केशवसुमार

आमच्या मते हे चित्र म्हणजे केवळ एक काव्य आहे, साक्षात एक कविता आहे. एक गझल आहे!
हेच म्हणतो..
ह्या कवितेचे /गझलेचे विडंबन अशक्य आहे...
(निवृत्त)केशवसुमार
स्वगतः अशक्य कसल आले त्यात.. X(
जोडीला तात्याचा फोटोलाव झाल विडंबन.. :P हाय काय आणि नाय काय.. :B

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 1:58 pm | विसोबा खेचर

जोडीला तात्याचा फोटोलाव झाल विडंबन.. हाय काय आणि नाय काय..

हा हा हा! :)

घाटावरचे भट's picture

28 Jul 2008 - 2:42 pm | घाटावरचे भट

अरे हिच्याकडे काय हत्यारांची कमतरता आहे की काय म्हणून जोडील हातात एक ऊसाचा दंडुका दिलाय????
पण काहीही म्हणा, एवढी गोडगोड हत्यारं असलेली (ऊस धरून) ललना क्वचितच पहायला मिळते, नाही का?
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 3:40 pm | विसोबा खेचर

अरे हिच्याकडे काय हत्यारांची कमतरता आहे की काय म्हणून जोडील हातात एक ऊसाचा दंडुका दिलाय????

ओहोहो, क्या केहेने..! मार डाला...

तात्या.

सूर्य's picture

28 Jul 2008 - 4:13 pm | सूर्य

ओहोहोहो... तात्यासाहेब एवढा सुंदर फोटो आपण इथे टाकला आहे, त्यास कोण कशी परवानगी नाकारेल :) . फोटो एकदम नॅचरल आला आहे व सौंदर्य एकदम खुलुन दिसते आहे. आपण म्हणता तसे हे चित्र एक गझल आहे :).

- सूर्य.

अन्जलि's picture

28 Jul 2008 - 4:16 pm | अन्जलि

तुम्हाला काय गुपचुप तुमचि अनुश्का असे सुन्दर सुन्दर फोटो पाठवते का? आहे बुवा एका माणसाचि वट. एकदम मस्त.

टारझन's picture

28 Jul 2008 - 6:17 pm | टारझन

शेवटी आमचं अज्ञान दुर झालं ...
ह्याच ऊसाच्या फोकाने जर कोणी नकली आयडी काढणार्‍याना मारणार असेल ना ही .. तर तात्या मिपाचं ट्राफिक कसं कंट्रोल करायच ते बघा बॉ !!!!

कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

भडकमकर मास्तर's picture

29 Jul 2008 - 9:01 am | भडकमकर मास्तर

ह्याच ऊसाच्या फोकाने जर कोणी नकली आयडी काढणार्‍याना मारणार असेल ना ही ..
=)) =)) ______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्राजु's picture

28 Jul 2008 - 6:45 pm | प्राजु

ती देखताच बाला, कलिजा खलास झाला....
हेच शब्द कोणाची रसिकाच्या मनांत यावेत.. :)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

झकासराव's picture

28 Jul 2008 - 9:02 pm | झकासराव

तात्या मी तुमचा जाहीर निषेध करतो. :)
मे तुमच्या खरडवहीत मुद्दाम लिहित नाही कारण तिथे लावलेला फोटो उसासे टाकायला लावतो, तर तुम्ही जाहीरपणे इथे फोटो टाकुन आमची गोची केलीत. :)
काय लिहिणार बॉ, आम्ही तर फोटु बघताच परिक्षण वै सगळ इसरलो.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

धनंजय's picture

28 Jul 2008 - 9:50 pm | धनंजय

आता हे प्रकाशचित्र रचताना (कंपोझ करताना) तात्यांनी शास्त्रातली चौकट मनात आणली की नाही हे मला माहीत नाही. आणली नसेल तरीही काही आंतरिक सौंदर्यदृष्टीमुळे काही कलानियमांचा प्रत्यय इथे येतो.

मॉडेलचे सौंदर्य असे आहे, की तात्यांनी प्रयत्न केला नसता तरी चित्र सुंदरच दिसले असते, म्हणा.

तरी काही सौंदर्यस्थळे मला अशी दिसली -

१. जिथे लक्ष वेधायचे त्याभोवती चौकट (फ्रेम) निर्माण करायची. ऊस, उजवा बाहू, खांदे, आणि मागची दूरची विटांची भिंत - असे मिळून चेहर्‍याभोवती एक चौकट तयार होते. सुहास्य, हसरे डोळे, वगैरेंवर (यादी संपायची नाही) जे लक्ष जाते, ते या फ्रेममुळे तिथेच घोटाळत राहाते. खांदे, डावा बाहू, काटकोनातला डावा हात यांनी एक दुय्यम, अपूर्ण चौकट छातीभोवती तयार होते.
२. नजर ज्यावर घसरत जाईल अशी वळसे घेणारी रेषा चित्रात आली तर सुंदर असते. ऊस, उजवा बाहू, खांदा, डावा बाहू, डावा हात अशी ऽ आकाराची रेषा तयार होते आहे. त्यावरून नजर घसरते, चढते.
३. रंगसंगती. राणी कलर आणि मागची हिरवळ ही रंगसंगती योग्य. पण ५०% मार्क. हा ग्लॅमर-शॉट आहे. फोटोशॉपमध्ये हिरवा रंग अधिक "सॅचुरेट" केला पाहिजे. सिनेमाचे पोस्टर म्हणून हा हिरवा रंग चालणार नाही. झळाळदार राणीकलरच्या पुढे तो फिक्कट दिसतो.

ध्रुव's picture

29 Jul 2008 - 10:16 am | ध्रुव

चांगला प्रतिसाद :)

अवांतर: डाव्या बाजुला खाली कोंबडा काय करत आहे हे नवलच आहे :P

--
ध्रुव

विसोबा खेचर's picture

29 Jul 2008 - 10:21 am | विसोबा खेचर

अवांतर: डाव्या बाजुला खाली कोंबडा काय करत आहे हे नवलच आहे

हा हा हा! धृवा, तुझे निरिक्षण छान आहे रे! साला तो कोंब्डा आपल्याला दिसलाच नाही! बहुतेक अनुष्काचा लाडका असावा.. :)

आपला,
(ऊसप्रेमी) तात्याकोंबडा.

केशवसुमार's picture

29 Jul 2008 - 12:25 pm | केशवसुमार

आहो तात्याशेठ,
इतकी सुंदर गझल समोर असताना तुम्हाला कोंबडा दिसेल तरी कसा :?
(निवृत्त विडंबक)केशवसुमार
स्वगतः उस दिसला हे ही नशिबच म्हणायचं :B
अवांतरः वैनिंची हताची नखं वाढलीत जरा निगा घ्यायला सांगा..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jul 2008 - 11:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, सुंदर चित्र !!! :)

लांबसडक केसांवर भाळलेला मोगरा, र्‍दयाच्या परीटघड्या मोडणारा आणि खोलवर स्पर्श करणारा बोलका गोड चेहरा आणि उजव्या हातापासून उसापर्यंतची नजरेत भरणारी कांती ही या चित्रातली सौंदर्य स्थळे.

टीका : उजव्या हातातला पकडलेला ऊस पर्ण मुठीत नाही, उजव्या हातातील अंगठ्याच्या नखाला गुलाबी नेल पॉलीश शोभले असते. उसाची चुट्टी दुरपर्यंत ओढलेली असते ती इथे दिसत नाही. कानातले रिंग मोठे असते तर चित्र अधिक सुंदर झाले असते.

अवांतर : तात्यासाहेब, अजून कशाकशाचे परिक्षण करायला लावतील मिपावर कोणास ठाऊक !!! :)

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

29 Jul 2008 - 12:35 am | चतुरंग

ये हुई ना बात! परीक्षणाला यावं छायाचित्र तर ते असं, नाहीतर सूर्योदय काय, सूर्यास्त काय, फुलं काय छ्या अरसिक लेकाचे?;)

बोलके डोळे, सुंदर दंतपंक्ती, नितळ कांती, सुंदर केशकलाप, त्यावर माळलेला मोगरा, ते किंचित खट्याळ आणि गोड हास्य वा वा ही तर गजलच, वादच नाही !!
उजव्या हातात सहा कांड्याचा ऊस घेऊन ही मदालसा असं तर सुचवत नाही ना, की माझ्या हातात आहेत ते सहा स्वर आणि सातवा ती स्वतः?

(स्वगत - ह्या गजलेची 'चाल' कशी आहे तात्यांना विचारायला हवं! B) )

चतुरंग

विसोबा खेचर's picture

29 Jul 2008 - 8:20 am | विसोबा खेचर

ये हुई ना बात! परीक्षणाला यावं छायाचित्र तर ते असं, नाहीतर सूर्योदय काय, सूर्यास्त काय, फुलं काय छ्या अरसिक लेकाचे?

हा हा हा! अगदी खरं रे रंगा! :)

उजव्या हातात सहा कांड्याचा ऊस घेऊन ही मदालसा असं तर सुचवत नाही ना, की माझ्या हातात आहेत ते सहा स्वर आणि सातवा ती स्वतः?

क्या बात है रंगा! मार डाला....!

बाकी धन्याशेठने नेहमीप्रमाणेच अत्यंत किचकट परिक्षण केले आहे, परंतु चांगले केले आहे. बिरुटेशेठचेही परिक्षण आवडले..

असो, सर्वांना मनापासून धन्यवाद...

आपला,
(अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या.

अरुण वडुलेकर's picture

29 Jul 2008 - 12:52 pm | अरुण वडुलेकर

रंगचित्र केवळ अप्रतिम. ते तर मूर्तिमंत काव्यच.

आणि

त्यावरच्या प्रतिक्रिया म्हणजे झणझणीत मिसळवर झकास तर्री आणि कांदा-लिंबू!

सखाराम_गटणे™'s picture

29 Jul 2008 - 8:59 pm | सखाराम_गटणे™

हा उस अर्धा खाल्लाय काय?
ऐका बाजुला, उस खाल्लासारखा वाटतोय !!!!!!!!११

सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

आणि तोही बहुदा मुळासकट खाल्ला असावा गोड आहे म्हणून, कारण मुळं दिसत नाहीयेत! ;)

चतुरंग

सखाराम_गटणे™'s picture

29 Jul 2008 - 10:05 pm | सखाराम_गटणे™

वरची वाढ्याची बाजु दिसतेय ती. सफेद आहेना. मुळाचा भाग तोडुन खाल्लाय असे वाटते.
तो मधला भाग आहे असे वाटते.

अवातंरः आपण कोणत्या ठीकाणी काय पाहतोय !!!!!!!!! ;)

सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

मनाने अजूनही एफ वाय बीकॉमच्या वर्गातला एक तरूण!) तात्या.
क्या बात है तात्या..............

हममम.............खरच ती १ गझल आहे.............