हर्षा भोगले यांचे IIM-Ahmadabad मधील भाषण

साधा मुलगा's picture
साधा मुलगा in जनातलं, मनातलं
7 Apr 2014 - 5:02 pm

एकदा you tube वर फिरत असताना प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांचे IIM A मधील भाषण ऐकले. खरे तर पहिले मी या भाषणाचा एक तुकडा पाहिला. जो ‘talent Vs attitude’ अशा नावाने होता. तो पाहिल्यावर मला संपूर्ण भाषण बघण्याचा मोह आवरला नाही.हर्षा हे स्वतः या संस्थेचे विद्यार्थी होते. ते पट्टीचे वक्ते असल्याने त्यांनी अतिशय कौशल्याने हे भाषण फुलवले आहे. हे भाषण जुने म्हणजे ३० जुलै २००५ चे आहे. भाषणाचा विषय आहे, “achievers of excellence”.
हे भाषण अतियश स्फूर्तीदायक असे आहे. सुरुवातीपासून ऐकायला सुरुवात केली कि हळू हळू इतके समरस होऊन जातो कि आपण शेवटपर्यंत थांबत नाही. यातील कित्येक गोष्टी आपल्याला विचार करायला लावतात.कित्येक गोष्टी आपण आपल्या जीवनातील गोष्टींशी निगडीत करू लागतो . आयुष्यातील आपले ध्येय, करीअर , आपली प्रगती ,आपण कुठे आहोत याचा विचार करायला भाग पाडते. अंतिम यश महत्वाचे कि यशाचा मार्ग, giving 100% every time, यशस्वी होण्यात नशिबाचा भाग किती, अशा अनेक विषयावर भाष्य केलेले आहे.
हे संपूर्ण भाषण साधारण १ तास २० मिनिटांचे आहे. एखादा सुंदर चित्रपट बघितल्यावर जसे समाधान मिळते तसे समाधान मिळते. आपल्या संग्रही ठेवावे असे आहे. आपण हे भाषण जरूर पाहावे. त्याची लिंक मी खाली देत आहे.
संपूर्ण भाषण
Talent Vs attitude (3.54 min)

हे ठिकाणविचारप्रतिक्रियाशिफारस

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

7 Apr 2014 - 10:20 pm | मुक्त विहारि

मागच्या वर्षी, हर्ष भोगले यांचे नाशिकला झालेले भाषण ऐकायचा योग आला होता.

त्यावेळी पण त्यांनी असेच उत्तम विचार मांडले होते.

आत्मशून्य's picture

7 Apr 2014 - 11:29 pm | आत्मशून्य

.

साधा मुलगा's picture

8 Apr 2014 - 2:26 pm | साधा मुलगा

संपूर्ण भाषण : http://www.youtube.com/watch?v=kaw_bKOkULM
Talent Vs attitude (3.54 min) : http://www.youtube.com/watch?v=O4MuTnUNLpA
दुवे लेखाच्या शेवटी पण दिलेले आहेत त्यावर क्लिक करा.

ट्यालंट कशाशी खातात काही कल्पना नाही आणी त्यामुळे सगळे अटिट्युड वर भागवून न्यावे लागत असल्याने तो नको इतका झालाय... बघुया व्हिडोत काही उपाय भेटला तर. धन्यु.

समिर१२३'s picture

7 Apr 2014 - 11:02 pm | समिर१२३

उपयुक्त माहितिबद्ल आभार .

शुचि's picture

7 Apr 2014 - 11:28 pm | शुचि

+१
ऐकले.