मी तुझ्या ऐन्यात होतो नेहमी

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
1 Apr 2014 - 11:43 am

भर्जरी दुःखात होतो नेहमी
मी तुझ्या कर्जात होतो नेहमी

शोधिसी आता मला दुनियेत या
मी तुझ्या ऐन्यात होतो नेहमी

तू जरी केले न दिसल्यासारखे
मी तुझ्या लक्षात होतो नेहमी

आसवे उबदार तू मजला दिली
मी असा श्रीमंत होतो नेहमी !

तू जरी रस्ताच माझा सोडला
मी तुझ्या रस्त्यात होतो नेहमी !

मी जरी पापी न होतो फारसा
पण तिथे स्वर्गात होतो नेहमी

मी तुझ्या हास्यामधे होतो कुठे
पण तुझ्या अश्रूंत होतो नेहमी

मी तुझ्या भाग्यामधे नसलो तरी
हातच्या रेषांत होतो नेहमी !

डॉ.सुनील अहिरराव

कविता