च्यायला, च्यामारी ( घाटी शब्द )
लहानपणी तुम्ही मित्राला कधी टाळी दिली नाहीत का?
आम्ही तर टाळीवरुन एक खेळ ही खेळायचो
' दे टाळी ' म्हणले की ' घे टाळी ' मग पुढे
घे पोळी मग दुसरा म्हणायचा ' घे , गोळी'
दे विडा आणि शेवटी खा . ' किडा '
असे म्हणायचे आणि खो खो हसायचे, गंमतीचे दिवस होते ( आमच्यात किडेगिरी करायची बी ही अशी लहानपणीच रुजली होती , असो )
मुंबईतली मुले असा खेळ खेळायची नाहीत का? बहुतेक नाहीच
नाही तर एका समवयस्क भावाने ' घे टाळी ' म्हणले असताना दुसरा भाऊ , फोन नाही आला म्हणून रागावून बसला नसता. आमच्या सारखे असतो तर तडक ' शिवाजी पार्क ' ला जाऊन घे टाळी, दे टाळी खेळायला सुरवात केली असती
तसे झाले असते तर आज टोळ्या बनवून इतरांची टाळकी फोडायची वेळ आली नसती. आणि संपुर्ण महाराष्ट्रात एक वेगळेच चित्र दिसले असते.
टाळी देण्यासाठी केला हात
पण फोन करायचे टाळले
ना'राजी'चे कारण हे
त्यामुळेच कळले..
अमोल केळकर
१ एप्रील २०१४
प्रतिक्रिया
1 Apr 2014 - 11:16 am | खटपट्या
चांगलंय !!!