नुकतचं दिनांक ८ मार्च २०१४ रोजी एम.एह.३७० ही कुलालंपुर-बिजींग हे विमानं कुठलेही सबळ पुरावे नं देता गायब झालय. चीन, मलेशिया आणि इतर अश्या सुमारे १० देशांच्या संयुक्त शोधपथकांना सुमारे ३२,००० चौरस कि.मी. चा परिसर चाळुन काढल्यानंतरही २७७ प्रवासी, मलेशिया एअरलाईन्स चे १२ कर्मचारी आणि बोईंग ७७७ ह्या प्रचंड विमानाचं नक्की काय झालं ह्याचा काही पत्ता नाही. कुठलेही अवशेष, मृतदेह किंवा ईतर पुरावे मागे नं ठेवता गायब झालेल्या ह्या घटनेनंतर दुसर्या महायुद्धाच्या काळात अश्याच गुढ रितीनी गायब झालेल्या फ्लाईट नं. १९ ची आठवण झाली नाही तरच नवल. मुळ स्क्वाड्रन मधले १४ जणं, त्यांची ५ विमानं नंतर त्यांच्या शोधासाठी गेलेलं विमान आणि त्यातील १३ जणं कुठलही समाधानकारक कारण न देता गायब झाली. त्यांच्या गायब होण्यामागे अपघात, घातपात, बर्म्युडा ट्रँगल, एलिअन्स पासुन गव्हरमेंट कन्स्पिरसी पर्यंत हजारो शक्यता वर्तवल्या गेल्या. घटना घडुन आज जवळ-जवळ ६८ वर्ष झाल्यानंतरही आजही ह्या घटनेमागचं गुढ उकललेलं नाही.
- - - - -
- - - - -
५ डिसेंबर १९४५, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरीडा, वेळ दुपारी १.१५
५ डिसेंबर १९४५, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरीडा. नेव्ही एरोनॉटीकल मेकॅनिक्स, मेंटेंनन्स ईंजिनिअर्स ची नेहेमीप्रमाणे धावपळ चालु होती. फ्लाईट नं. १९ च्या उड्डाणाची जोरदार तयारी चालु होती. दारुगोळा आणि ईंधन भरणे, विमांनांची उड्डाणापुर्वीची तपासणी करण्यासाठी लोकांची पळापळ चालु होती. नेव्ही फ्लाईट लेफ्टनंट चार्ल्स टेलर ह्या अनुभवी युद्ध वैमानिकाची स्क्वाड्रन आपल्या नेहेमीच्या उड्डाण सरावासाठी तयार होत होती. नुकताच वॉर रूम मधे आपल्या शिकाऊ वैमानिकांना फ्लाईट प्लॅन समजाऊन देऊन तो उड्डाणासंबधची बाकी कागदी घोडी नाचविण्यासाठी आपल्या कमांडींग ऑफीसर (सी.ओ.) कडे निघाला होता. तो स्वत: धरुन १५ जणं फ्लाईट मधे अपेक्षित असताना फक्त १४ चं जणं उड्डाणासाठी पुर्ण तयार होते. टी.बी.एम. अॅव्हेंजर एफ.टी. ८१ चा असिस्टंट पायलट कम नेव्हिगेटर कम कम्युनिकेशन ऑफिसर अॅलन कोस्नर ह्यानी उड्डाणासाठी नकार दिलेला होता*. सी.ओ. कडची कागदी घोडी नाचवुन झाल्यावर विमानांवर एक नजर टाकण्यासाठी तो हँगर मधे गेला. सी.ओ. नी बदली माणुस देण्यासाठी असमर्थता दर्शवली. शेवटी तयार असणार्या माणसांसोबत सराव उड्डाण करायची तयारी करायची आज्ञा त्याला मिळाली. उड्डाणासाठी आवश्यक असणार्या सगळ्या गोष्टींची त्यानी कसुन तपासणी केली. येत्या ख्रिसमस ला सुट्टी मिळालेली असल्याने आपण घरी येतोय ही बातमी तिच्या कानावर कधी टाकतोय ह्याची त्याला घाई झालेली होती. ऊड्डाणासाठी अवकाश असल्याने कम्युनिकेशन सेंटर मधे जाऊन आपल्या आईला एक फोन करावा म्हणुन तो तिकडे वळला.
नेव्ही लेफ्टनंट चार्ल्स टेलर
_
दुपारी २ वाजता फोर्ट लॉडरडेल वरुन ५ टी.बी.एम. अॅव्हेंजर विमानांनी उड्डाण करुन पुर्वेला ९१ अंश वळायचं. सुमारे ५६ नॉटिकल मैल्स वर (सुमारे १०४ कि.मी.) जायचं. तिथे जुन्या मोडीत काढलेल्या आणि नेमबाजीच्या सरावासाठी ठेवलेल्या युद्धनौकेवर लुटुपुटुचा टोर्पेडो हल्ला करुन ती बुडबायची. नंतर ९१ अंश कायम ठेऊन सुमारे ७४ नॉटिकल मैल्स (सुमारे १४० कि.मी) जायचं. तिथुन ९० अंशात डावीकडे वळायचं (उत्तरेकडे) आणि १२० नॉटिकल मैल्स (सुमारे २२० कि.मी.) जायचं आणि तिथे सागरी निरीक्षणाचा सराव करायचा. होम पोसिशन अर्थात फोर्ट लॉडरडेल शी ५५ अंशाचा कोन झाला की परत डावीकडे वळुन फोर्ट लॉडरडेल कडे परत यायचं असा फ्लाईट प्लान होता.
टी.बी.एम. अॅव्हेंजर विमान
_
दुसर्या महायुद्धाच्या आधीपासुन टी.बी.एम. अॅव्हेंजर अमेरीकन नौदलाकडची प्रमुख डाईव्ह टोर्पेडो बाँबर विमानं होती. हवाईदल आणि नौदल ह्या दोन्हींमधे ह्या विमानांचा समावेश होता. जनरल मोटर्स नी बनवलेली ही विमानं त्याकाळच्या अत्याधुनिक संपर्क सुविधांनी सज्ज होती. जनरल मोटर्स नी विकसित केलेल्या ह्या विमानामधे राईट-आर-२६००-२० डबल रो रेडियल सायक्लोन पद्धतीचे ईंजिन बसविण्यार आले होते. विमान जास्तीत जास्त ३०,००० फुट उंचीवरुन प्रवास करण्यायोग्य होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या विमानाचा दिर्घ पल्ला. एक पुर्ण क्षमतेने भरलेले विमान एक टाकी ईंधनामधे १६५० कि.मी. प्रवास करु शकत असे. १९०० अश्वशक्ती असणार्या ह्या ईंजिनाच्या मदतीने विमान २००० पौंडाचा दारुगोळा वाहुन नेता येत असे. विमानाच्या नाकाकडच्या भागामधे पायलटच्या नियंत्रणात असलेली .३० कॅलिबरची मशिन गन बसवलेली असे. पाठलाग करणार्या विमानांचा नाश करायसाठी म्हणुन पाठिमागच्या भागात .५० कॅलिबरची मशिन गन बसवलेली असे. पायलटच्या मागे बसलेला गनरी ऑफिसर ह्या बंदुकीवर नियंत्रण ठेवत असे.
टी.बी.एम. अॅव्हेंजर ईन अॅक्शन
नौदलाकडे असणार्या विमानाच्या आवृत्तीमधे आपत्कालीन स्थितिमधे पाण्यात क्रॅश लँडींग करायची सुविधा होती. पाण्यात क्रॅश लँडींग झाल्यावर विमानाच्या पॉड्स (पाय) ना जोडलेले इन्फ्लेटेबल तराफे रासायनिक अभिक्रिया होऊन फुगवले जात असतं. विमानं कमीत कमी १२० सेकंद पाण्यावर सहज तरंगलं जाईल अश्या पद्धतीनी तयार करण्यात आलेली होती. ही विमानं पाण्यात कोसळल्यानंतर पुढचे काही तास तरंगत राहील्याची उदाहरणे ही आहेत. विमानाच्या क्रु ला ९० सेकंदाच्या आत विमानातुन बाहेर पडुन तराफ्यांवर चढायचे प्रशिक्षण देण्यात आलेलं असे. तराफ्यांवर रेडीओ, ३ माणसांना ३ दिवस पुरेल एवढा कोरडा अन्नसाठा, पाणभाला (हार्पुन), आल्डीस सिग्नलचा दिवा आणि प्रथमोपचाराची पेटी अश्या गोष्टी असतं.
विमानवाहु बोटीवर अजुन जागा उपलब्ध व्हावी म्हणुन ह्या विमानाचे पंख वरच्या बाजुला घडी घालायची सोय केलेली होती. (हायड्रॉलिक विंग फोल्डींग मेकॅनिझम).
पाण्यात कोसळलेलं टी.बी.एम. अॅव्हेंजर विमान, पाण्यात जो पांढरा फेस दिसतोय ते एक विशिष्ट अविषारी रसायन आहे. ज्यामुळे विमान लांबुनही सापडावे.
टी.बी.एम. अॅव्हेंजर विमानाच्या नौदल आवृत्तीमधे अश्या प्रकारे पंख मिटुन ठेवता येत असत. फोटोत दाखविलेलं विमानं टी.बी.एम. अॅव्हेंजर नसुन लॉकहीड मार्टीन नी बनविलेलं आहे. (नावं बहुतेक टी. १८ आहे.)
थोडक्यात सांगायचे झालं तर ही विमानं कुठलाही पुरावा मागे नं ठेवता कायमची गायबं होतील असं म्हणणार्याला विनाचौकशी येरवड्याला पाठविण्यात आले असते एवढी उत्तम दर्जाची होती.
----
अज्ञाताकडे उड्डाण
दुपारी ठिक १ वाजुन ५५ मिनिटांनी ले. चार्ल्स टेलर आणि त्याचा क्रु धावपट्टीवर दाखल झाला. प्रत्येक जण आपापल्या विमानात चढला आणि त्यांनी आपापल्या जबाबदार्या असणार्या विमानाच्या यंत्रणा तपासुन पाहिल्या. सर्व काही ठिक-ठाक असल्याची खात्री झाल्यावर विमानं ठरलेल्या क्रमानी धावपट्टीकडे जायला लागली. सगळ्यात आधी चार्ल्स टेलर च्या विमानानी आपले फ्लॅप्स आणि रडर (Rudder) हलवुन शेवटची तपासणी केली. ग्राऊंड्समन चा ईशारा मिळताच विमानाने ईंजिनाच्या कानठ्ळ्या बसविणार्या आवाजात धावपट्टीवरुन धावायला सुरुवात केली आणि हवेत उड्डाण केले. ह्याच पद्धतीनी बाकी विमानही हवेमधे गेली. ईन लाईन फॉरमेशन मधे विमान बघता बघता क्षितिजाकडे झेपावली आणि मानवी डोळ्यांच्या टप्प्यापलीकडे गेली ती कायमचीचं.
येत्या काही तासातचं ह्याच विमानांच्या शोधासाठी समुद्रमंथन कराव लागेल ह्याची त्यावेळी कोणाला कल्पना होती? ह्या प्रश्णाच उत्तर नाही असं नक्कीचं नव्हतं. देजावु म्हणा किंवा अजुन काही म्हणा उड्डाणास गेलेल्या अॅलन कोस्नर हयाला ,खुद्द चार्ल्स टेलर आणि फ्लाईट नं. १९ बरोबर गायबं झालेल्य्या जोसेफ बोस्सी ह्यांन नक्कीचं कसलीतरी हुरहुर लागलेली होती. नंतर केलेल्या तपासात चार्ल्स टेलर चं त्याच्या आईबरोबर केलेलं संभाषण, जोसेफ बोस्सी ह्यानी मागीतलेली पण मंजुर नं झालेली रजा आणि अॅलन कोस्नर नी मारलेली दांडी ह्या गोष्टी समोर आल्या. ह्या गोष्टी समोर आल्यानी झालेल्या घटनेचं गुढ अजुनच वाढलं.
(कमशः)
प्रतिक्रिया
12 Mar 2014 - 3:45 pm | कुसुमावती
मलेशिअन एअरलाईन्स्च्या विमानाच्या गायब होण्याची बातमी पहिल्यावर हीच घटना आठवली.
ह्या घटनेचा बर्म्युडा ट्रॅन्गलशी संबध जोडला जातो. या विषयावर वाचायला आवडेल.
पु भा प्र.
12 Mar 2014 - 3:49 pm | राजो
मस्त सुरूवात..
उत्कंठा वाढली आहे. पुभाप्र
12 Mar 2014 - 4:50 pm | सानिकास्वप्निल
सुरुवात छान झाली आहे
वाचतेय.
पुभाप्र
12 Mar 2014 - 4:57 pm | योगी९००
मस्त सुरूवात...लवकर पुढचा भाग टाका...उत्कठा वाढली आहे..
12 Mar 2014 - 5:47 pm | Mrunalini
चांगला झालाय पहिला भाग. पु.भा.प्र.
12 Mar 2014 - 6:10 pm | मुक्त विहारि
ह्या अशा लेखांसाठीच मिपा प्रसिद्ध आहे.
हे असेच उत्तम लेख येवू द्यात...
12 Mar 2014 - 6:56 pm | कंजूस
बेपत्ता होणे हे नातेवाईकांसाठी किती क्लेषदायक असेल ?
12 Mar 2014 - 7:36 pm | प्यारे१
उत्कंठावर्धक!
वाचतोय.
12 Mar 2014 - 7:58 pm | स्पार्टाकस
फ्लाईट १९ बेपत्ता झाल्यावर त्यांच्या शोधात गेलेलं हॅरी कोनचं मार्टीन मरिनर हे विमान पण गायब झालं. अर्थात पुढे त्याचा उल्लेख असेलच अशी अपेक्षा.
12 Mar 2014 - 10:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आहे आहे शेवटच्या भागात मार्टीन मरीनर असणारे.
12 Mar 2014 - 8:39 pm | अजया
पु. भा.प्र.
12 Mar 2014 - 10:08 pm | आत्मशून्य
.
12 Mar 2014 - 11:59 pm | सुहास झेले
वाचतोय....
13 Mar 2014 - 11:53 am | विअर्ड विक्स
पु. ले. शु.