अहमदाबाद-गांधीनगर_2

अमितसांगली's picture
अमितसांगली in भटकंती
11 Mar 2014 - 1:47 pm

दिवस दुसरा: प्रवासाची रूपरेषा
१. कांकरिया लेक (तलाव) : (लागणारा कालावधी : ४० मि.)
२. सिद्दी सय्यद मस्जिद: कांकरिया लेकपासून १५ मि. च्या अंतरावर (लागणारा कालावधी: ३० मि. )
३. जुम्मा मस्जिद: सिद्दी सय्यद मस्जिदपासून १५ मि. (लागणारा कालावधी: ४० मि.)
४. साबरमती आश्रम: लाल दरवाजापासून ३० मि. (लागणारा कालावधी: ३ तास )
५. सायन्स सिटी: साबरमतीपासून ४५ मि. (लागणारा कालावधी: ३ तास )

१. कांकरिया लेक : संध्याकाळी सहाची बस पकडायची असल्याने दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय कांकरिया लेकवरच बघण्याचे नियोजन होते. पण नेहमीच उठण्याच रडगाण पाठ सोडायला नको. कसेतरी करून शेवटी ७.४५ च्या दरम्यान लेकवर पोहचलो.

a

हा लेक वर्तुळाकार असून १४५१ च्या दरम्यान बांधल्याचा अंदाज आहे. हा लेक बघताना हैद्राबादच्या हुसेन सागर तलावाची आठवण होत होती.

a

संध्याकाळी इथे लहान मुलांसाठी टॉय ट्रेन, प्राणी संग्रहालय, बोटिंग, उद्यान आणि आपल्यासाठी चरण्याचा अड्डा पण आहे.

a

२. सिद्दी सय्यद मस्जिद: १५७३ साली बांधलेली हि मस्जिद दगडावर अतिशय नाजूक कोरलेल्या अर्धवर्तुळाकार जाळीदार नक्षीसाठी प्रसिद्ध.

a

a

जाळीदार खिडकीचे समोरील बाजूने टिपलेले सोंदर्य....
a

a

जाळीदार खिडकीचे बाहेरील बाजुने टिपलेले सोंदर्य...
a

चारही खडक्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे कोरीव काम आहे.
a

a

a

a

३.जुम्मा मस्जिद : १४२३ साली सुलतान अहमद शाह यांनी बांधलेली भव्य व तितकीच सुंदर अशी वास्तू...

a

a

a

a

a

४.साबरमती आश्रम: प्रवासाला सुरुवात झाल्यापासून मी पाहण्यास सर्वाधिक उत्सुक असलेली हि जागा म्हणजे माझ्या देवाचे मंदिर (कृपया इथे बाकी कोणताही वाद सुरु करू हि विनंती)

a

तीन माकडे ....
a

गांधीजींचा जीवनप्रवास उलगडणारे संग्रहालय...
a

गांधीजीनी जगाला दिलेला हाच तो संदेश..
a

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन धृवतारे...
a

दोन राष्ट्रांचे पितामह...
a

अहिंसेची हिंसा...अखेरचा हा तुला दंडवत...
a

सुती धाग्यापासून बनविलेला हो फोटो...
a

तपस्वी, ध्यानमग्न, तेजस्वी महात्मा...
a

तेजाचे वलय प्राप्त झालेली वास्तू...गांधीजींचे निवासस्थान...
a

महात्म्याची सेवा करण्याचे भाग्य लाभलेल्या वस्तू...
a

एक स्वर्गीय अनुभूती...
a

रघुपति राघव राजाराम....गांधीजींचे प्रार्थनास्थळ...
a

५.सायन्स सिटी : आकाराने प्रचंड पण अजूनही विकसनशील अवस्थेत असलेली जागा. त्यामुळे इतक्या दूरवर जाऊन हाती धुपाटणे लागण्याचा प्रकार. इथे मंगळयान, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक यांचा अनुभव घेण्यासाठी राईडस आहेत पण त्यासाठी किमान १५ जणांचा कंपू लागतो.

a

a

a

या ठिकाणी मानवाच्या उत्क्रांतीपासून ते औद्योगिक विकासापर्यंत सर्व टप्प्यांचे अगदी सविस्तर विवेचन केले आहे.
a

हे सगळ बघून होईपर्यंत ५.३० वाजले होते. शेवटी जमेल तेवढा खाकरा विकत घेतला आणि बसमध्ये जाऊन झोपी गेलो.
अध्याय समाप्त.

प्रतिक्रिया

जेपी's picture

11 Mar 2014 - 3:24 pm | जेपी

मी पयला

क्लिंटन's picture

11 Mar 2014 - 3:45 pm | क्लिंटन

फोटो आवडले.

तुम्ही कांकरिया तलाव बघणे ४० मिनिटात कसे पूर्ण करू शकलात याचीच उत्सुकता आहे.मला वाटते की कांकरिया पूर्ण बघायचा असेल तर किमान ३-४ तास हवेत.तलावाला चालत प्रदक्षिणा घालायची असेल आणि मध्येमध्ये विविध स्टॉलवर खायचे असेल आणि मधली इतर आकर्षणे बघायची असतील तर तितका वेळ हवाच. संध्याकाळच्या वेळी तिथे लेसर शो असतो.तो पण चांगला असतो.मी त्या ठिकाणी ४ वर्षांपूर्वी गेलो होतो.आता तिथे हॉट एअर बलून राईड पण सुरू झाली आहे असे ऐकले आहे.

बाकी अहमदाबाद तर एकदम छान शहर आहे--विशेषतः तिथले गुजराती खाणे :)

मस्त फोटो व उत्तम माहिती... लवकरच अहमदाबाद सफारी प्लान करायला हवे.

वेल्लाभट's picture

11 Mar 2014 - 4:01 pm | वेल्लाभट

आठवणी ताज्या झाल्या ! अह्मदाबाद नक्कीच सरस छे भाय !

प्रचेतस's picture

11 Mar 2014 - 4:19 pm | प्रचेतस

सुरेख.
पुन्हा एका प्राचीन मशिदीच्या बांधकामात टिपिकल चालुक्य शैलीचे स्तंभ आणि छताचा भाग..........