जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ४ : अंगकोर थोमची राजमंदिरे (बायोन आणि बाफून)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
1 Mar 2014 - 10:35 pm

==================================================================

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...

==================================================================

...चला, आता निघूया हा सगळा खजीना पहायला. अर्थातच सर्व जागा पाहणे तेथे बराच काळ ठिय्या मारून बसल्याशिवाय बघणे शक्यच नाही. तसेच तेथे खरंच काय आहे याची पूर्ण कल्पना स्वतः भेट देऊन डोळ्यानी पाहिल्याशिवाय येणे शक्य नाही. मात्र आमच्या चार दिवसांच्या धावत्या भेटीत बघितलेल्या मुख्य ठिकाणांना एक एक करत माझ्या तुटपुंजा शब्दसंपत्तीतून आणि कॅमेर्‍याच्या डोळ्यातून जेवढे जमेल तसे पहायला पुढच्या भागापासून सुरूवात करूया.

अंगकोर वट वरून पुढे जाता जराशी नाराजी वाटलीच. पण जास्तित जास्त आकर्षणे कमीत कमी वेळात बघण्यासाठी योग्य तोच आराखडा केला आहे ह्या मार्गदर्शकाच्या आश्वासनाने जरा बरे वाटले.

अंगकोर थोम

सर्वात प्रथम आम्ही अंगकोर थोमला भेट दिली. ख्मेर भाषेत अंगकोर थोम म्हणजे महानगर (Great City). बाराव्या शतकाच्या शेवटाला सातव्या जयवर्मनने वसवलेले हे शहर खेर साम्राज्याचे शेवटचे आणि सर्वात जास्त काळ राजधानीचे ठिकाण होते. ह्याचे अवशेष एकूण नऊ चौ किमी क्षेत्रफळावर आहेत. अंगकोर थोम, तिच्या पूर्वीची राजधानी यशोधरापूर आणि तिच्या नंतरच्या राजधान्यां यांची क्षेत्रे एकमेकात मिसळलेली आहेत. त्यामुळे, अंगकोर थोममध्ये सातव्या जयवर्मनने बांधलेल्या इमारतींबरोबर त्याच्या पूर्वजांनी आणि वंशजांनी बांधलेल्या अनेक इमारतीही आहेत. यातील बायोन (Bayon) राजमंदिर सर्वात महत्वाचे मानले गेले असले तरी बाफून (Baphuon) राजमंदिर, फिमिनाकास (Phimeanakas) राजमंदिरासारखी स्थळेही आपले वेगळेपण आणि महत्व राखून आहेत.


अंगकोर थोमच्या मध्यवर्ती भागाचा नकाशा (जालावरून साभार)

या चौरस आकाराच्या शहरासभोवती ३ किमी X ३ किमी लांबीरूंदीची ८ मीटर ऊंच तटबंदी आहे. तटबंदीभोवती पाण्याने भरलेली मोट आहे. मोट ओलांडून शहरात जाण्यासाठी मोटेवर बांधलेल्या पूलांच्या कठड्यांवर डाव्या बाजूला देव आणि उजव्या बाजूला दानव वासूकीची दोरी ओढून समुद्रमंथन करत आहेत असे दर्शवणारे शिल्प आहे. आम्ही सर्वात जास्त वापरात असलेल्या दक्षिण व्दाराने आम्ही शहरात प्रवेश केला...

 ...
अंगकोरच्या दक्षिण व्दारासमोरील समुद्रमंथन शिल्प

२३ मीटर उंच व्दाराच्या शिखराच्या चार बाजूस बायोन शैलीतली चार विशाल मुखे आहेत...


अंगकोर थोमचे दक्षिण व्दार

ही चार मुखे कोणाची आहेत याबाबत एकमत नाही. ती मुखे राजाचे चहुकडे लक्ष असल्याचे प्रतिक, बोधिसत्व अखिलेश्वराचे प्रतिक, साम्राज्याचे रक्षण करणार्‍या देवतांचे प्रतिक, इ असल्याची वेगवेगळी मते आहेत. पण या शहरात ही मुखे अजून भव्य आकारात आणि संख्येत दिसणार आहेत.

बायोन राजमंदिर

बायोन हे सम्राट सातव्या जयवर्मनने (इ स १२६५ - १३१५) नागफण्याखाली बसलेल्या जयबुद्धमहानाथ या बुद्धाच्या नावे बांधलेले महायान बौद्धमंदिर आहे. हे अंगकोर साम्राज्यातले शेवटचे आणि महायान बौद्ध संप्रदायाचे एकुलते एक राजमंदिर आहे. मंदिराच्या खोल्यांत व भिंतींवर ख्मेर साम्राज्यातील विविध भागातल्या स्थानीक देवदेवतांच्या मूर्ती आणि कोरिवकामे आहेत. त्याबरोबरच मंदिराच्या भिंतींवर पौराणिक, ऐतिहासिक आणि सर्वसामान्य जीवनातल्या प्रसंगांची कोरीवकामे आहेत. मात्र बायोन मंदिर त्याच्या विशाल चतुर्मुखी शिखरांमुळे जगप्रसिद्ध आहे...


बायोन राजमंदिर ०१

.


बायोन राजमंदिर ०२

.


बायोन राजमंदिर ०३

.


बायोन राजमंदिर ०४

.


बायोन राजमंदिर ०५

.


बायोन राजमंदिर ०६

.


बायोन राजमंदिर ०७ : नृत्यांगना

मंदिरातील इतर कोरीवकाम...


ख्मेर भूदल
.

चंपा आणि ख्मेर नौदलाचे युद्ध
.

अंगकोरचा बाजार
(वरची तीन चित्रे जालावरून साभार)

या मंदिराच्या शिखरांवर एकूण २१६ मुखे आहेत. इतक्या संख्येने असलेली आणि दूरवरून दिसू शकणारी भव्य मुखे एक प्रकारचा गुढ मानसिक परिणाम करतात. तेराव्या-चौदाव्या शतकांत त्यांचा जनमानसावर आणि ख्मेर साम्राज्याच्या शत्रूंवर मानसिक प्रभाव नक्कीच पडला असणार.

हे मंदिर बरोक प्रकारच्या ख्मेर स्थापत्यशैलीचा नमुना म्हणून ओळखले जाते. ही शैली पारंपारिक ख्मेर शैलीपेक्षा वेगळी आहे. जपानी सरकारच्या मदतिने या मंदिराचे पुनस्थापन चालू आहे.

या मंदिरावरचे चेहरे अनेक चित्रपटांत आलेले आहेत. त्यातले काही...
१. Lara Croft: Tomb Raider
२. Patlabor the Movie 2
३. Civilization IV: Beyond the Sword
४. Eternal Darkness: Sanity's Requiem, इ.
तसेच ते काही कादंबर्‍यांतही आलेले आहेत. त्यातल्या काही...
१. The Judas Strain (James Rollins)
२. The Golden Pagans (Peter Bourne c.1956), इ.

सुरुवात तर छान झाली होती. अंगकोर वटचे चित्र डोळ्यासमोर होतेच. पण आता तेथे जाण्याअगोदर अजून काय काय अनपेक्षित बघायला मिळते आहे याचीही उत्सुकता वाटू लागली होती !

बाफून राजमंदिर

बायोन पासून चालत थोड्याच अंतरावर असलेल्या बाफून राजमंदिराकडे गेलो. हे मंदिर सम्राट उदयादित्यवर्मनने (इ स १०५० - १०६६) अकराव्या शतकाच्या मध्यात बांधले. हे तीन स्तरांच्या पर्वताकारात (पिरॅमिडसारखे) बांधलेले शिवमंदिर आहे. मंदिराला लागूनच राजप्रासाद आहे. ही १२० मीटर X १०० मीटर आकाराची इमारत पारंपारिक बाफून ख्मेर शैलीत बांधलेली आहे. तिची सद्याची उंची ३४ मीटर आहे आणि तिच्या (आता नष्ट झालेल्या) शिखरासकट अंदाजे ५० मीटर ऊंच असावी. ख्मेर दरबारातल्या चीन सम्राटाच्या वकिलाने त्या आता नष्ट झालेल्या कासे (ब्राँझ) वापरून बनवलेल्या चित्ताकर्षक शिखराचे वर्णन लिहून ठेवले आहे. शिखराच्या बुंध्यात दहा खोल्या होत्या, इतका तो मोठा होता. पंधराव्या शतकाच्या शेवटी हे मंदिर बुद्धमंदिरात रुपांतरीत करण्यात आले, पहुडलेल्या बुद्धाची मुर्ती बसविण्याकरिता ते शिखर तोडले असावा असा अंदाज आहे.


बाफून राजमंदिराच्या आवारात ०१

.


बाफून राजमंदिराच्या आवारात ०२

.


बाफून मंदिराच्या अर्ध्या उंचीवरून दिसणारे मदिराचे आवार आणि पूर्वे दिशेचे गोपूर

हे मंदिर रेतीने भरलेल्या जमीनीवर बांधलेले होते. त्यामुळे आणि त्या प्रचंड इमारतीच्या वजनाने तिची वारंवार बरीच पडझड झाली. शिवाय ख्मेर रूजच्या कालावधित झालेल्या लूटालूटीने १९९५ पर्यंत तिची अवस्था १० हेक्टर जमिनीवर विखुरलेले कोरीवकामाने भरलेले ३ लाख दगड अशी झाली होती. पण पुरातत्व शास्त्रज्ञांनी ते आव्हान स्विकारले आणि अपरिमित श्रम, ख्मेर स्थापत्यशैलीचा आधार आणि बर्‍या अवस्थेत असलेला इमारतीचा एक कोपरा यांच्या मदतिने हे प्राचीन मंदिर परत उभे करण्याचा चमत्कार करून दाखविला !


जानेवारी २०११ पर्यंत पुनस्थापित झालेले बाफून मंदिर ०१

.


जानेवारी २०११ पर्यंत पुनस्थापित झालेले बाफून मंदिर ०२

.


जानेवारी २०११ पर्यंत पुनस्थापित झालेले बाफून मंदिर ०३

एप्रिल २०११ पर्यंत पुनस्थापनेचे काम पुरे झाले आणि राजे नोरोदोम सिंहनूक यांनी फ्रेंच पंतप्रधान फ्रांस्वा फिलाँ यांच्याबरोबर ३ जुलै २०११ ला मंदिराचे उद्घाटन करून त्याची सफर केली.

मंदिराबाहेर पडलो आणि आजूबाजूला असलेल्या शेकडो वर्षे वयाच्या अनेक वृक्षराजांपैकी काहींच्या बरोबर फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही...

 ...
वृक्षराजांबरोबर फोटोसंधी

सुमारे हजार वर्षांपूर्वी बांधलेला प्राचीन स्थापत्यचमत्कार व त्याच्या विखुररेल्या ३ लाख दगडांतून तो परत उभा करण्याचा अर्वाचीन चमत्कार म्हणजे एकावर एक फुकट असे दोन चमत्कार पाहून आणि त्यांचे साक्षीदार असलेल्या दोन वयोवृद्ध वृक्षराजांशी संवाद करून आम्ही पुढच्या आकर्षणाकडे चालू लागलो.

(क्रमशः )

==================================================================

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...

==================================================================

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

1 Mar 2014 - 10:55 pm | खटपट्या

हाही भाग अप्रतिम

अजया's picture

2 Mar 2014 - 1:25 am | अजया

मस्तच ! पु.भा. प्र....

अविश्वसनीय वाटले असते पण फोटो पाहून तसे म्हणता येत नाही इतकेच!
विखुरलेल्या शिळा एकत्र करणे सोपे नसेल. कोरीव कामही आवडले.

मुक्त विहारि's picture

2 Mar 2014 - 8:46 am | मुक्त विहारि

आवडला.

चित्रगुप्त's picture

2 Mar 2014 - 8:54 am | चित्रगुप्त

वाचतो आहे....
अंगकोर मधे एक डायनोसोर चे शिल्प आहे, असे वाचले आहे. ते बघितलेत का?
असे जर खरेच असेल, तर हा एक चमत्कारच ठरावा.
.
n

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2014 - 6:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

आमच्या मार्गदर्शकाने आम्हाला हा स्टेगॅसॉरस दाखविला नाही :) पण तुमच्या या प्रतिसादानंतर जालावर तसे काही दावे सापडले... खरे खोटे देवराजा जाणे !

जेपी's picture

2 Mar 2014 - 10:24 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

अत्रुप्त आत्मा's picture

2 Mar 2014 - 12:16 pm | अत्रुप्त आत्मा

जबरदस्त................................!!! मंदिर पुनर्रचनाही बिनतोड!

प्रचेतस's picture

2 Mar 2014 - 12:47 pm | प्रचेतस

काय अफाट आणि अचाट काम आहे.
बहुत धन्यवाद ह्या भागासाठी.

आत्मशून्य's picture

2 Mar 2014 - 12:52 pm | आत्मशून्य

नो कमेंट्स.

सुहास झेले's picture

3 Mar 2014 - 9:39 am | सुहास झेले

अप्रतिम... शब्द नाहीत कौतुक करायला. आता पुढचा भाग कधी? :)

प्रमोद देर्देकर's picture

3 Mar 2014 - 9:51 am | प्रमोद देर्देकर

अप्रतिम ! अफलातुन माहिती मिळतेय.
पु.भा.प्र.

आपण आपलाच इतिहास एका वेगळ्या देशात पाहतोय. :) समुद्र मंथन्,वासुकी, मेरु पर्वत आणि देव-दानव.
पुनस्थापना करणार्‍यांचा अभ्यास,मेहनत,चिकाटी आणि प्रयत्न या सर्वांना अगदी मनापासुन सलाम! :)

वाचकांसाठी एक दुवा :- The Role of Astronomy at Angkor Wat

सूड's picture

3 Mar 2014 - 11:25 am | सूड

पु भा प्र

कुसुमावती's picture

3 Mar 2014 - 1:13 pm | कुसुमावती

पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2014 - 6:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

खटपट्या, अजया, रेवती, मुक्त विहारि, जेपी, अत्रुप्त आत्मा, वल्ली, आत्मशून्य, प्रमोद देर्देकर, मदनबाण, सूड आणि कुसुमावती : धन्यवाद !

बॅटमॅन's picture

3 Mar 2014 - 6:46 pm | बॅटमॅन

अप्रतिम!!!!! अजून फटू हवे होते असं दरवेळेस वाटत राहतं. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2014 - 12:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजून बरेच फोटो पुढे आहेत. काही मंदिरांत इतके फोटो काढले (म्हणजे काढावेच लागले) की त्यांतून लेखात टाकण्यासाठी फोटो निवडताना तारांबळ उडणार आहे !

सुधीर कांदळकर's picture

5 Mar 2014 - 10:06 am | सुधीर कांदळकर

सर्वात जास्त आवडला.

इतक्या संख्येने असलेली आणि दूरवरून दिसू शकणारी भव्य मुखे एक प्रकारचा गुढ मानसिक परिणाम करतात. तेराव्या-चौदाव्या शतकांत त्यांचा जनमानसावर आणि ख्मेर साम्राज्याच्या शत्रूंवर मानसिक प्रभाव नक्कीच पडला असणार.

हा अनुभव घ्यायला आता जावेच लागणार. भारतातील पर्यटनापेक्षा स्वस्त आहे की महाग? महाग असेलच बहुधा, किती प्रमाणात? ३स्टारची भाडी काय आहेत, कार प्रति किमी/दिवशी किती रु.? किंवा प्रतिदिवस राहणे स्थानिक प्रवास किती $ किंवा किती रु. खर्च येतो.?

बायोन मंदीर खासच आवडले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Mar 2014 - 1:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही तर नुसती सुरुवात आहे... "अंगकोर वट" ह्या प्रचंड आंतरराष्ट्रीय वट असणार्‍या मंदिरासकट इतर बरीच आकर्षक मंदिरे अजून बाकी आहेत !

मी हि सफर २०११ मध्ये केली. आता तिथले दर खूप बदलले असतील. मात्र त्या भागांतील कंबोडिया आणि व्हिएतनाम हे मलेशिया आणि बालीपेक्षा बरेच स्वस्त आहेत. सियाम रीप पर्यटनाच्या दृष्टीने सुधारलेले आहे. पण अंगकोरचा आवाका इतका मोठा आहे की मार्गदर्शकाशिवाय जाणे योग्य नाही... गडबडीत बरेच काही बघायचे राहून जाईल.

आंतरजालावर अनेक चांगल्या पॅकेज टूर कंपन्या आहेत. तारांकित पासून साध्या (पण स्वच्छ आणि निटनेटक्या) हॉटेल, सहल आणि मार्गदर्शकासकट ३-५-७ दिवसांचे बुकींग करू शकता. फक्त विमानाचे तिकीट आपण काढून इतर सर्व सहल (मार्गदर्शकासह) पॅकेजमध्ये घेणे जास्त सोईचे होईल.

या दुव्यावर बरेच पर्याय दिसतील.

विवेकपटाईत's picture

5 Mar 2014 - 7:49 pm | विवेकपटाईत

इतिहासाला जपण्याच्या सुंदर प्रयत्न. आपल्यालाही असा प्रयत्न केला पहिजे.

पैसा's picture

10 Mar 2014 - 4:11 pm | पैसा

क्लास अपार्ट!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Mar 2014 - 1:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

विवेकपटाईत आणि पैसा : धन्यवाद !