डिनायल

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
24 Feb 2014 - 12:01 am

डिनायल (denial) या इंग्रजी शब्दाचा शब्दकोषातील अर्थ आहे काहितरी नाकारण्याची कृती. या शब्दाच्या अर्थाच्या जवळपास जाणारा मराठी शब्दप्रयोग आहे "कानावर हात ठेवणे".

आपल्यावरील प्रतिहल्ला परतवून लावणे ही कुठल्याही प्राण्याची उपजत प्रेरणा असते. त्यामुळे जेव्हा हल्ला करणार्‍याचा आपण सामना करु शकतो अशी खात्री त्या प्राण्याला पटली की तो पलटवाराला तयार होतो. किंवा आपण हल्ला करण्याचा सामना करु शकत नाही असं जर त्या प्राण्याला वाटलं तर तो हल्ला करणार्‍यापासून दूर पळून जातो. या वस्तूस्थितीला मानसशास्त्र "लढा किंवा पळा" (फाईट ऑर फ्लाईट) म्हणून ओळखते. लिहिताना मी हे जरी दोन वाक्यात लिहू शकलो तरी प्रत्यक्षात ही त्या क्षणी शरीरांतर्गत होणारी खुपच गुंतागुंतीची प्रक्रिया असते. यातील अजून गंमतीचा भाग असा की प्रत्येक वेळी त्या प्राण्यावर प्रत्यक्षात असा हल्ला झालेला असतोच असे नाही. काही वेळा त्या प्राण्याचा विविध कारणांमुळे हल्ला झालेला नसूनही हल्ला झाला आहे असा समज होतो. आणि मग हा प्राणी या न झालेल्या हल्ल्याविरोधात सावध होतो. आणि याला मनुष्यप्राणीही अपवाद नाही असो.

हे सारं झालं शारीरीक हल्ल्याच्या बाबतीत. हा हल्ला शाब्दिक असेल तर? हल्ल्याचं जाऊ दया. कुणी आपल्याला न रुचणारं, न आवडणारं काही ऐकवण्याचा प्रयत्न करत असेल तर? अशा वेळी काही माणसं ते ऐकवले जाणारे विचार बरेच वेळा वस्तूस्थिती असूनही माणसं ते विचार क्लेशदायक आहेत म्हणून त्यांना सामोरं जात नाहीत. ती वस्तूस्थिती नाकारतात. कानावर हात ठेवतात, ऐकून न ऐकल्यासारखं करतात. हा जणू काही त्यांच्यावरील विचारांचा हल्ला असतो आणि ते विचार नाकारणे हा एक प्रकारचा बचावात्मक पवित्रा (defence mechanisms) असतो.

काही वेळेला एखादं सुर्यप्रकाशाईतकं स्वच्छ वास्तव दिसत असताना एखादया व्यक्तीची त्या वास्तवाला सामोरं जायची तयारी नसते. आणि हे सारं अंतर्मानाच्या पातळीवर होत असतं. त्या व्यक्तीला आपण एखादं ढळढळीत सत्य नाकारत आहोत याची जाणिवही नसते. तो त्या व्यक्तीच्या मनाने घेतलेला बचावात्मक पवित्रा असतो जेणेकरुन त्या विचारांचा, वास्तवाचा त्या व्यक्तीला त्रास होणार नाही.

हा नकारात्मक पवित्रा व्यक्तीगणिक बदलतो. काही व्यक्ती सत्य ढळढळीतपणे नाकारतात. काही व्यक्ती अंशतः वस्तूस्थिती स्विकारतात. काही वस्तूस्थितीचा स्विकार जरी पुर्णपणे करतात मात्र त्या वस्तूस्थितीला ते तितकेसे गांभिर्याने घेत नाहीत. काही त्याची जबाबदारी दुसर्‍यावर ढकलतात. व्यक्ती तितक्या प्रकृती.

याची उदाहरणे जागोजागी आपल्या पाहण्यात येतात. एखाद्या घरातील कर्ता मुलगा दारुच्या व्यसनात ठार बुडून जातो. बायको-मुलांचे हाल होतात. म्हातारे आई-वडील हाय खातात. कुणी हे सारं त्या व्यसनी व्यक्तीस समजावण्याचा प्रयत्न केला तर तो कानावर हात तर ठेवतोच, अधिक "त्यांना काय झाले आहे, ते सारे मजेत आहेत. उलट त्यांच्यामुळेच तर मी दारुच्या नादी लागलो" असे समजावणार्‍यालाच सुनावतो. एखादा अहंमन्य, आत्मकेंद्री माणूस आयुष्यभर आपल्याच धूंदीत जगतो. आपल्यामागे इतरांची फरफट होतेय हे त्याच्या गावीही नसते. कुणी समजवायला गेले तर समजावणार्‍यालाच वेडयात काढतो.

आता प्रश्न हा आहे की अशी व्यक्ती आपल्या आजूबाजूला वावरत असल्यास काय करायचे? उत्तर सोपं नाही. समोरच्या व्यक्तीला काही समस्या असेल आणि ती व्यक्ती समस्या नाकारत असेल तर त्या व्यक्तीपर्यंत पोहचणे अवघड असते. वास्तव स्विकारण्याईतपत मनाची तयारी नसल्यामुळे एक अभेद्य भींत त्या व्यक्तीने आपल्यासमोर उभी केलेली असते.

अशावेळी मानसोपचार क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे, त्या व्यक्तीस *समुपदेशकाकडे घेऊन जाणे हा प्रभावी उपाय ठरतो.

* समस्याग्रस्त व्यक्तीस समुपदेशकाकडे घेऊन जाणे हे मुळ समस्येपेक्षा अधिक तापदायक प्रकार होऊ शकतो. निदान भारतात तरी. त्यावर पुन्हा कधी तरी. :)

जीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

24 Feb 2014 - 12:42 am | अत्रुप्त आत्मा

डिनायल'ला अत्यंत अचूक पकडलस धन्या!

यावरचा चांगला उपायः- अश्या व्यक्तिला सेल्फ सपोर्ट ग्रुप्समधे नेऊन सोडणे. (दुसरा काहिही उपाय नाही!)

मुक्त विहारि's picture

24 Feb 2014 - 8:29 am | मुक्त विहारि

मस्त सुरवात

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

माहितगार's picture

24 Feb 2014 - 3:13 pm | माहितगार

लेख छान लिहिला आहे अभिनंदन. सध्या इतरांची मते वाचतो आहे. सविस्तर प्रतिसाद चर्चा अजून जरा पुढे गेल्या नंतर देईन. धन्यवाद.

प्रचेतस's picture

24 Feb 2014 - 8:53 am | प्रचेतस

छान लिहिलंस रे.

पैसा's picture

24 Feb 2014 - 9:14 am | पैसा

डिनायलचा आणखी एक प्रकार म्हणजे मानसिक आजार असताना "मी ठीक आहे, प्रॉब्लेम लोकांतच आहे" किंवा "मला काही आजार नाहीच" असं म्हणणं हा. समस्याग्रस्त आणि समुपदेशक याबद्दलचं निरीक्षण बरोबर आहे. समुपदेशक आपल्याकडे एकतर फार कमी आहेत आणि सायकिअ‍ॅट्रिस्टकडे एखाद्या मनोरुग्णाला घेऊन गेलास तर ते समुपदेशनापेक्षा बरेचदा औषधांवर भर देतात हेही पाहिले आहे. अर्थात त्या त्या वेळी त्या रुग्णाला जास्त गरज कसली आहे हे एक डॉक्टर अधिक चांगल्या प्रकारे ठरवू शकतो, पण अनेकदा औषधांचे इतके त्रास असतात (अ‍ॅसिडिटी, झोप येणे इ. इ.) की मूळ रोग परवडला औषध नको अशी अवस्था होते.

वास्तव नाकारणे हे दुसर्‍या टोकाला जाऊन सतत आभासी जगात वावरणे, आपल्या भोवतीचे जग हे खरे नाही असं वाटणे असेही प्रकार होतात. याचं दुर्दैवी उदाहरण मिपावरच आपण सगळ्यांनी पाहिलं आहे.

म्हणून बहुतांश ठिकाणी याचा वापर मनोरंजन अथवा अंधश्रध्दापसरवणे यासाठीच होतो. थोडक्यात समुपदेशन वगैरे प्रकार बालमानसशास्त्रापुरते ते सुधा अमुक तमुक हा रोगच आहे आणखी कशाची परिणीती नाही याची निश्चीती करण्यापुरते उपयोगी म्हणता येइल. मग उरतो पर्याय सायकॅट्रिक्टचा. ज्यालाच फक्त मनोविकारांवर औषध लिहुन देण्याचा कायदेशीर अधिकार आहे.

यांची फिलॉसॉफी फार सोपी असते, आयुश्यात चढ उतार, आशा निराशेचा खेळ मनाची आंदोलने कायमच प्रत्येकात चालु असतात. पण कोणतीही व्यक्ती जी स्वतःला अन समाजाला हानी पोचवणारे वर्तन कोणत्याही परिस्थीतीत करत नाही ती ठाम निरोगी. आणी रोग बरा करणे म्हणजे व्यक्तीमधे वरील लक्षण निर्माण करणे होय. यासाठीच ते मेंदु "ड्ल" बनवणारी रसायने सर्वप्रथम शरीरात सोडतात.

एखादे वर्तन रोग आहे की प्रतिक्रीया याचे फक्त निदान व्हायला किमान ६-७ महिने जातात(अर्थात योग्य निदान झाल्यावर उपलब्ध ज्ञानानुसार फार व्यवस्थीत औषधे दिली जातात हे वास्तव आहे). होय उगा डाग्दर कडे गेलो सुजलेलं डोक दाखवलं औषध घेउन आलो हे या ठिकाणी शक्य नसते, अथवा कुठल्या मासिकात, संस्थळावर,एखादी केस स्टडी वाचुन अमुक तमुक व्यक्तीचे जिवन कसे डो़क्टरकडे आल्यावर बरबाद होण्यापासुन वाचले वगैरे लेख अतिशय सावध पणे बघावेत. ते वाचुन दोन दिवसात जादुची कांडी फिर्ल्याचा भास निर्माण होतो जो चुकीचा असतो. कोणताही गंभीर मानसविकार हा ६-७ महिन्याच्या सलग (रिगरस) चाचपणी शिवाय निश्चीत होत नसतो.

मुळतच मानस विकाराने संपुर्ण कुटुंबाचे मनस्वास्थ्य लयाला गेलेले असते व त्यात असे लेख वाचुन वा ऐकीव माहिती वरुन पि हळद हो गोरी या अपेक्षेने बहुतांश कूटुंबे डोक्टरकडे जातात. पण वर जो कालावधी नमुद केला आहे याची त्यांना कल्पना नसते. थोडक्यात खिषात मुबलक पैसा असेल तरच हा प्रकार अस्थानी ठरत नाही. म्हणुनच अशा विशयांवरील लेखांकडे अतिशय सावधपणे बग्घितले पाहिजे. की हे दिशाभुल करणारे अथवा अर्धवट माहिती तर पुरवत नाहीत ना ? अन्यथा पदरी आर्थिक सामाजीक मानसीक आणी शारीरीक कश्ट व अनेक दुखद प्रसंग सामोरे येतात.

लेखकाची यामधील आहर्ता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतोच तरीही समजा प्रख्यात मानसशास्त्रज्ञाने जरी एखादा लेख लिहला असेल व कोणी त्याचे भाषांतर करत असेल तर Throughout the history of psychology,
there has been a tendency to oversimplify complex behaviors हा मानसशास्त्राचा सर्वात मोठा ड्रॉबॅक कोणीही विसरु नये. हीच अपेक्षा असते.

आत्मशून्य's picture

24 Feb 2014 - 11:48 am | आत्मशून्य

प्रत्यक्षात मनोविकार बरे करताना काय अडचणी समोर येत असतात याचा उहापोह म्हणून लिहला आहे. तो भलेही प्रताधिकार मुक्त धाग्यावर लिहला नसेल तरीही तो माझाच व प्रताधीकार मुक्त आहे याची नोंद घ्यावी. या धाग्यावरील माझे सर्व प्रतिसाद तसेच गणले जावेत.

सुबोध खरे's picture

24 Feb 2014 - 12:34 pm | सुबोध खरे

"यासाठीच ते मेंदु "ड्ल" बनवणारी रसायने सर्वप्रथम शरीरात सोडतात." मनोविकार शास्त्र इतके सोपे असते असे मला वाटत नाही. मग मला सुद्धा मनोविकार तज्ञ म्हणून काम करता येईल( औषधे देण्याचा मला परवाना आहेच)
जर रुग्ण हिंसक असेल आणि स्वतःला( आत्महत्या) किंवा इतरांना इजा करण्याची शक्क्यता असेल तर त्याला झोपेचे किंवा शांत करण्याचे इंजेक्शन दिले जाते पण इतके सरसकटी करण जरा जास्त होते आहे असे माझे मत आहे
"एखादे वर्तन रोग आहे की प्रतिक्रीया याचे फक्त निदान व्हायला किमान ६-७ महिने जातात." कित्येक मनोविकार असे आहेत कि रुग्ण पाहिल्यावर ताबडतोब निदान होऊ शकते. बर्याच वेळेस रुग्णाला संशयाचा फायदा देण्यासाठी मनोविकार तज्ञ काही वेळ त्याला निरीक्षणा खाली ठेवतात.
"कोणताही गंभीर मानसविकार हा ६-७ महिन्याच्या सलग (रिगरस) चाचपणी शिवाय निश्चीत होत नसतो." हे केवळ पाच ते सहा टक्के रुग्णाच्या बाबतीत असे होत असावे.
"थोडक्यात खिषात मुबलक पैसा असेल तरच हा प्रकार अस्थानी ठरत नाही." आपण कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालात मनोविकार विभागात एक दिवस घालवून पाहावा.
बाकी सविस्तर प्रतिसाद नंतर

सविस्तर प्रतिसादाच्याच अपेक्षेत. आपल्या सर्व सुचना अनुसरायला उत्सुक.

स्पंदना's picture

25 Feb 2014 - 3:59 am | स्पंदना

यासाठीच ते मेंदु "ड्ल" बनवणारी रसायने सर्वप्रथम शरीरात सोडतात

याच एक अतिशय वाईट उदाहरण माझ्या मामांच्या बाबतीत घडल. मामांचा मुलगा भाजला होता. जवळ जवळ दोन वर्ष सगळे उपाय केले. त्या वेदना, ते दु:ख. जेंव्हा तो शेवटी गेला तेंव्हा मामा म्हणाले"सुटल माझ बाळ त्या वेदनांतुन." पण मोठे मामा समजुन बसले आता हा डिप्रेस होणार. उगा हा डोक्टर तो डॉक्टर. अन नुसत झोपवुन ठेवल त्यांना. ते सांगताहेत कुणी लक्षच नाही दिलं. :(

आत्मशून्य's picture

26 Feb 2014 - 4:55 pm | आत्मशून्य

बर्‍याच केसेसेमधे असाच अनुभव असतो. एखाद्यात तसा नसतो जो मोठ्या प्रमाणात जाहिरात केला जातो. पण एक गोष्ट आपण समजुन घेणेही आवश्यक आहेच की शारीरीक दुखण्याप्रमाणे मानसिक रोग हा दिसुन येत नाही. दोन वेगवेगळ्या भावनांची प्रतिक्रीयासुध्दा एकच (जसे सहीतले वाक्य) असु शकते त्यामुळे शास्त्राच्या द्रुष्टीकोनातुन खरे तर विचीत्रच गोंधळ उरतो. म्हणूनच मानसशास्त्र अनेक क्लिश्ट आणि गुंतागुंतीच्या विचार प्रक्रियांना अवास्तव सोपे समजायची चुकही करते.

आपण तुटलेला पाय घेउन खरे साहेबांकडे गेलो आणि सांगीतले की मला ताप आलाय बरे करा तर ते अर्थातच ठामपणे* बोलु शकतात की बाळा ताप न्हवे तुझा जो पाय तुटलाय तो जोडावा लागेल, म्हणून मी जे सांगतोय ते कर म्हणजे बरा होशील, इतकं सरळ आहे. पण मानसशास्त्रज्ञ ही गोष्ट करु शकत नाही उदा. जर रुग्ण थापा मारतोय लक्षात आले तर ते डिसॉर्डर मुळे की इतर काही कारणाने याचा शोध घ्यावा लागतो. तिथे अर्ध्या हळकुंडाच्या वाकड्ड्या शहाण्या प्रमाणे तुला अमुक तमुक डिसॉर्डर आहे अशी निदानाची सक्ती केली तर तो डॉक्टर कायदेशीर अडचणीमधेही फसु शकतो.(होय हे घडणे शक्य आहे).म्हणुनच हे लोक सगळ्यात सेफ बाजुने परिणामी मुंगीच्या पावलाने प्रगती करत असतात. भारत असो अथवा इतर कोणताही देश याला अपवाद नाही. आणी त्यांनाही आपण एक सामान्य माणुस या नजरेतुन बघितले की ते चुक तर अजिबात ठरत नाहीत.

कोणतेही मानसिक रोग हे पैसा, प्रेम, आरोग्य याच्याशी संबंधी प्रक्रियांमधे बिघाड झाल्याने निर्माण होतात व बळावतात.म्हणुन गाठिला पुरेसा पैसा, मनाचा अतिशय संयम, आरोग्य अथवा वेदनारहीतता व ज्याच्याकडुन इलाज घेत आहोत त्या डॉक्टरवर विश्वास या गोष्टी असतिल तरच एखादा मानोवीकार योग्य निदानानंतर नियंत्रीत्/बरा होउ शकतो यातील एकही गोष्ट अतीशय प्रतिकुल असेल तर हे घडल्याचे एकही उदाहरण आजतागायत या जगात घडलेले नाही. फक्त अमुक तमुकला वेड्यांच्या डोक्टरकडे न्हेले होते असे क्याटेगोराइज करायला इतर मात्र मोकळे होतील...!

एक सोपे अनुभवाचे, विवीध अभ्यासपुर्ण निरीक्षणांचे विधान करावेसे वाटते, कोणता व्यक्ती मनोरोग बरा होण्यायोग्य आहे हे बघायचे असेल तर त्याला विपश्यनेला पाठवा तो ती करु शकला तर बिंधास्त उपाय योजना सुरु करा १००% यश तुमचे आहे.

महत्वाचे : विपश्यना ही मनोविकार उपचार पध्दती अजिबात नाही हे समजुन घ्यावे. तुम्हाला बहुदा तिव्र मनोविकार असल्यास तिथे प्रवेश हमखास नाकारला जातो. मी स्व्तः जेंव्हा पहिल्यांदा त्यासाठीचा फॉर्म भरला तेंव्हा तिथे दिलेल्या मनोविकारांवर "होय" असे टिकमार्क केले होते. पण तिन मिनीटात त्यांच्या सेंटर मधुन फोन आला तुम्हाला हे (स्किझो आणी बायपोलर ) मनोविकार आहेत काय , मी होय म्हटल्यावर लगेच, "सर आपल्याला विपश्यनेची न्हवे मानसोपचारांची गरज आहे, तुम्ही विपश्यना करुच शकणार नाही" असे ठामपणे सुचवण्यात आले. मग अर्थातच कसेबसे ओशाळुन मी प्रांजळपणे त्यांना गंमत करत होतो व यामुळे मला काही तरी स्ट्राँग विपश्यना पध्दती दिली जाइल असा समज त्यामागे होता म्हणून तसे टिकमार्क केले होते हे सांगीतल्यावर अर्थातच हसत प्रवेश मिळाला :)

प्रकाश घाटपांडे's picture

24 Feb 2014 - 9:23 am | प्रकाश घाटपांडे

धन्या मस्त लेख. बर्‍याचदा हा डिनायल मोड वेगळ्या स्वरुपात आपल्याला पहायला मिळतो. माणस आपल्या चुकांचे समर्थन करताना दिसतात.वस्तुस्थिती नाकारण्याकडे त्यांचा कल जातो. कोग्निटिव्ह डिझोनन्स हा प्रकार मजेशीर आहे. आपल्याकडूनही अशा गोष्टी घडत असता. खोट बोल पण रेटून बोल असे प्रकार त्यातुनच घडत असावेत.

तुम्हाला सांगणे सोपे पडेल म्हणून सांगतो मानसशास्त्र हे अक्षरशः जोतिषशास्त्राप्रमाणे आहे...! ते शक्यता दर्शवते शाश्वती न्हवे.

जसे एखादा निवडणुक जिंकला की मी हे सांगितलेच होते म्हणनार्‍यात जसे हॉट-शॉट चिकनलॉर्ड स्वयंघोषीत ज्योतीषीही तावातावाने सहभागी होतात. अगदी तो च प्रकार एखाद्या घटनेनंतर (विषेशतः) दुख:द असेल तर मानसशात्र अभ्यासुकांच्या बाबतित घडतो. वाइट हे वाटते की विज्ञानाची कास धरतो म्हणताना हे लोक पराकोटीच्या अंधश्रध्दा छातीठोकपणे पसरवतात तो धोका कीमान ज्योतीषांकडुन आजच्या काळात नक्किच संभवत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

27 Feb 2014 - 12:22 pm | प्रसाद गोडबोले

मानसशास्त्र हे अक्षरशः जोतिषशास्त्राप्रमाणे आहे...! ते शक्यता दर्शवते शाश्वती न्हवे

.

मानसशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात जमीन आसमान चा फरक आहे ...

गेली पाचेक वर्षे हा प्रकार अनुभवत आहे. तुम्ही बोला मी ऐकतोय, पण तुम्ही बोलताय त्यातला एकही शब्द मी कृतीत आणणार नाही. चुकताय तुम्ही, बरोबर काय तो मीच आहे. अशा पद्धतीचे नमुने जेव्हा आपल्या अगदीच जवळ असतात तेव्हा त्यांना काहीही समजावणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं असतं. या दगडांवर त्याचा शष्प परिणाम होत नाही. डोकं फुटतं ते आपलं. मग आपलं ब्लड प्रेशर वाढवून घेण्यापेक्षा सरळ दुर्लक्ष करायचं हा एक पर्याय उरतो. पण या दुर्लक्ष करण्याने प्रकरण प्रचंड हाताबाहेर जातं आणि मग काही केल्या या व्यक्तींना ताळ्यावर आणणं कठीण होऊन बसतं. अशी व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मोठी असेल असेल तर आपल्या समजावण्याला, चिडचिडीलाही मर्यादा येतात.

स्पंदना's picture

25 Feb 2014 - 4:00 am | स्पंदना

मी म्हणतो तेच खर.

आत्मशून्य's picture

24 Feb 2014 - 12:07 pm | आत्मशून्य

आता आपण डिनायल्सच्या प्रत्यक्ष काही उदाहरणांचा/विचारांचा आढावा घेउयात...!

मुद्दाम गहन विचार करणार्‍यांची आम्हाला गरज नाही...!

सदरील वाक्य डिनायल मोडचे एक क्लासीक उदाहरण ठरावे. विशेषतः जर ती व्यक्ती आपण सुरेख लेखांचे कौतुक करण्यात विषेश उत्सुक असतो हे दाखवत असेल तर...!

I am allways right, not customor

हे सुधा एक मस्त उदाहरण आहे ज्याची किंमत स्वतःच स्थापन केलेल्या कंपनीमधुन अपमानास्पद हाकालपट्टी होण्यात स्टीव जॉब्स ला मोजावी लागली. अर्थात मुर्खांना डिनायल मोड पॉझीटीव्ह असतो याचेच मुळात आकलन नसल्याने कंपुबाजी करुन जर अधिकारी व्यक्तीला कंपनीतुन हद्दपार केल्यावर काय नामुश्की येते व ति नामुश्की जर तीच व्यक्ती कंपनीत परतली की कशी भयस्वप्नात बदलते याचे एक क्लासीक उदाहरण ठरावे.

इतर वाचकंनी सुधा कृपया या धाग्यावर आपले विचार मांडावेत/ इनपुट द्यावेत जेणे करुन लेखकांला त्यांच्याही मनाचा ठाव घेणारे लिखाण करणे सोपे होइल ही विनंती. व हा धागा एक कलेक्टीव इंटेलिजन्सचे रत्न ठरेल.

सुबोध खरे's picture

24 Feb 2014 - 1:37 pm | सुबोध खरे

डिनायल (नकार) - मला जेवढे समजते तेवढे असे
मनाच्या द्वंद्वात्मक अवस्थेत होणार्या त्रासापासून सुटका करण्यासाठी मनाने घेतलेली ढाल आहे.
एक टोकाचे उदाहरण म्हणजे एखाद्या स्त्रीवर एकांतात बलात्कार झाला तर तिचे मन तो(बलात्कार) झाला हे पूर्ण नाकारते. कारण बलात्कार झाला हे स्वीकारले तर त्या अन्याय विरुद्ध दाद मागावी लगेल. जर आपल्यावर बलात्कार झाला आहे असे समाजाला सांगितले तर समाजाकडून होणारी अवहेलना किंवा कलंकित झाल्याचा डाग स्वीकारावा लागेल. पोलिसात गेले तर होणारा मानसिक छळ आणि त्यानंतरच्या प्रक्रियेत होणारी कुतरओढ या सर्व प्रचंड कटकटपूर्ण जीवनाला सामोरे जाण्यापेक्षा आपल्यावर बलात्कार झाला हे नाकारणे मनाला जास्त सोपे जाते. शेवटी बलात्कार्याला शिक्षा करवून न्याय मिळवून निष्पन्न काय होणार तर मानसिक शांती. मग ती मुळ बलात्कार झाला हे नाकारण्याने मिळतेच म्हणून हा मनाने शोधलेला एक मार्ग आहे.
अशीच परिस्थिती बरेच लोक घरात/ दुकानात चोरी झाली तर नाकारताना दिसतात. पोलिसात तक्रार करून तेथे खेपा घालत राहणे आणि शेवटी मुद्देमाल मिळत नाहीच आणि मिळाला तर किचकट कायदेशीर प्रक्रिया करून तो अनेक वर्षांनी परत मिळवण्यापेक्षा चोरी झाली हे नाकारणे सोपे जाते.
अशी साधी उदाहरणे अनेक आहेत. दारू प्यायला आवडते पण घरच्यांना किंवा जवळच्या नातेवाईकांना मला ती आवडते असे सांगणे कठीण असते त्यापेक्षा पार्टीत दारू प्यावी लागते असे त्याचे समर्थन करणे सोपे असते.
दोन किंवा तीन मुली झाल्यावर आम्हाला मुलगीच हवी होती असे सांगितले कि अंतर्मनाचे द्वन्द्व शांत करता येते. कारण मनातून मुलगा हवा असतो आणि तो झाला नाही कि मनाला वाईट वाटते मग तसे वाईट वाटत राहण्यापेक्षा आणि लोकांचे सांत्वनपर शब्द ऐकण्यापेक्षा आम्हाला मुलगीच हवी होती हे सांगणे सोपे जाते. ( शिवाय पुरोगामी म्हणवता येते). अशी माणसे मुलापेक्षा मुलगीच चांगली कशी हे ठासून सांगताना आढळतात तेंव्हा ती डिनायल मध्ये असतात हे ओळखावे. ज्याला एक मुलगा आणि एक मुलगी असते तो असे ठासून सांगताना आढळत नाही.
माझ्या भावाचे उदाहरण देतो- त्याला विद्युत अभियांत्रिकीला प्रवेश मिळत नव्हता तेंव्हा तो सिव्हिलच कसे चांगले आणि विद्युत अभियांत्रिकीला साडे तीन वर्षे पर्यंत गणित शिकावे लागते ते सांगत होता( खरे तर तो स्वतःच्या मनाची समजूत घालत होता) माझ्या वडिलांनी त्याला सांगितले कि तुला विद्युत अभियांत्रिकीला प्रवेश मिळत असून जर सिव्हिल ला प्रवेश घेतलास तर या बोलण्याला अर्थ आहे. शेवटी त्याला विद्युत अभियांत्रिकीला प्रवेश मिळाल्यावर वरील बोलणे आपोआप थांबले अशी असंख्य उदाहरणे आपल्याला आपल्या आयुष्यात देता येतील. ज्यावेळी आपण या गोष्टी मुळापासून लक्षात घेऊ तेंव्हा आपल्याला आयुष्यात शब्दांचे बुडबुडे रचायची गरज पडणार नाही.
मी लष्करात देशप्रेमी आहे म्हणून गेलो नाही तर माझा मेडिकलचा मुंबईत प्रवेश २ गुणांनी हुकला आणि सुदैवाने मला ए एफ एम सी ला प्रवेश मिळाला म्हणून मी तेथे गेलो. आणि तेथे गेलो आणि नौदल मिळाले म्हणून मी नौदलात भरती झालो. हेच मुंबईची वैद्यकीय महाविद्यालये भिकार आहेत असे मी सांगत बसलो तर ते डिनायल होईल. माझा प्रवेश २ मार्कांनी हुकला नसता तर याच महाविद्यालयात शिकून मी डॉक्टर झालो असतो. पण ताकाला जाऊन भांडे लपवणे हा आपला स्थायीभाव आहे. मी स्वच्छ पणे मला मुंबईत प्रवेश मिळाला नाही म्हणून ए एफ एम सी ला गेलो हे सांगत असल्याने असे शब्दांचे बुडबुडे रचण्याची मला गरज पडली नाही.
आपल्या मुलाला सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही म्हणून सरकारी महाविद्यालयात आजकाल शिक्षणाचा दर्जा कसा खालावला आहे त्यापेक्षा खाजगी महाविद्यालयात शिक्षण कसे चांगले असते असे शब्दांचे बुडबुडे रचणारी किती माणसे आपल्याला आपल्या अवतीभवती दिसतात.
डिनायल हि एक मनाची अवस्था आहे हा मनोविकार नाही. याची करणे लक्षात घेऊन आपण आपले आयुष्य समृद्ध बनवणे आपल्या हातात आहे.
स्वच्छ पणे मला दारू आवडते म्हणून मी ती पितो असे म्हटले कि मानसिक द्वंद्व होत नाही. मग पार्टी नसताना पिताना लाजिरवाणे वाटत नाही.
किंवा स्वच्छपणे म्हणावे आमच्या मुलाला गुण कमी पडले म्हणून खाजगी महाविद्यालयात प्रवेश घेतला असे स्व्च्छपणे जग्लात तर आयुष्य जास्त सरळ सोपे आणि छान होते.

तुम्ही पहिली जी दोन उदाहरणे दिली, (विशेषतः दुसरे) ती 'डिनायल' समजावी? का जाणुनबुजुन निवडलेला (मनस्ताप टाळण्यासाठी ) सोयिस्कर मार्ग ?
आणि ती जर 'डिनायल' चीच उदाहरणे असतील तर ती चांगली, सकारात्मक समजावी का? कारण त्यामुळे संबंधित व्य्क्तींचा फायदा होताना दिसतो आहे. मग त्यांना डिनायल मोड मधेच राहू देणे उचित? कि कटु वास्तव स्विकारण्यास भाग पाडावे?

सुबोध खरे's picture

24 Feb 2014 - 3:20 pm | सुबोध खरे

दुसरे उदाहरण आपण म्हणता तसे डिनायल मध्ये मोडेल असे नाही कारण अशा परिस्थितीत हा विवेकी मानाने घेतलेला निर्णय पण असेल
माणसे जर आपल्याविरुद्ध विणलेल्या कोशात आनंदी असतील तर आपण त्यांना का दुः खी करावे. एखाद्या माणसाला कटू वास्तव स्वीकारायला लावून आपण साध्य काय करणार? तुमचा मुलगा हुशार नाही म्हणून त्याला सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही उगाच सरकारी महाविद्यालयाला नावे ठेवू नका आणि खाजगी महाविद्यालयाची भलामण करू नका हे सांगून आपण काय मिळवणार?
सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यम अपि अप्रियं न ब्रूयात

स्पंदना's picture

25 Feb 2014 - 4:12 am | स्पंदना

हो. मलाही ती दोन्ही उदाहरणे डिनायल नाही वाटली. तर लपवणे या प्रकारातली वाटली. पहिले उदाहरणतर ती व्यक्ती गुपचुप त्या अत्याचारीची वाट लागायची वाट पाहेल.

कवितानागेश's picture

24 Feb 2014 - 2:53 pm | कवितानागेश

जी उदहरणं दिली आहेत तशी खरोखरच सगळीकडे दिसतात. पण ती फारच mild आहेत. डिनायल असे स्पष्ट्पणे म्हणता येणार नाही.
साधारणपणे सगळीच माणसं मनानी हळवी असतात. (म्हणूनच त्यांना strength मिळवण्यची/ दाखवण्याची हौस असते. )
त्यामुळे ती कुठल्यातरी लहान्मोठ्या डिनायलला पकडूनच जगत असतात. त्यांना सगळ्यांना रुग्ण ठरवणं तिततकंस योग्य नाही.
आणि प्रत्येकवेळेस समुपदेशनाची गरजही नसते. परिस्थितीच काय तो शहाणपणा शिकवते.
माझ्या बघण्यातली काही mild उदाहरणं...
एका बाईंकडे निरांजनावरचे प्लेटिंग जाउन आतले तांबे स्वच्छ उघडे दिसत होतं. ते दाखवल्यावर पण त्या वाद घालत बसल्या, हे निरांजन 'आई'नी दिलंय. हे चान्दीच्चच्च आहे!
एका एन्ट्रन्स एग्झाममध्ये मला मैत्रिणीपेक्षा जास्त मार्क होते, ती कायम ती परीक्षा कशी 'भिकार होती याबद्दल तावातावानी बोलायची. ;)
एक मित्र गेलेल्या आजीबद्दल अजूनही आजी असं म्हणते, असं करते, तिला असं आवडतं... म्हणून सांगतो. कुणी विचारलं तर सांगतो की ती आता नाही. पण बोलताना मात्र कायम एकीकडे स्वतःला धीर द्यायला दुबळा प्रयत्न सुरु असतो, 'ती असं असं म्हणते...!'
या कुठल्याही केस्मध्ये समुपदेशनाचा उप्योग नाही, कारण ते कुणाचंही ऐकणार नाहीत.
औषधांचा प्रश्नच नाही.

तुम्ही म्हणताय तसं डिनायलच्या माईल्ड केसेस मध्ये समुपदेशनाची गरज नसते. अशा वेळी एखादा छोटासा धक्का माणसाला भानावर आणायला पुरेसा असतो.

मात्र टोकाच्या केसेसमध्ये समुपदेशनाची गरज असते. आजूबाजूच्यांनी सांगितलेली भल्याची गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत ती व्यक्ती नसते. आणि अनुभवातून येणारं शहाणपण कधी कधी खुप महागात पडू शकतं. अशा केसेसमध्ये समुपदेशकाकडे जाणंच भल्याचं असतं.

आत्मशून्य's picture

24 Feb 2014 - 4:16 pm | आत्मशून्य

नक्कि काय फायदा ?

आत्मशून्य's picture

24 Feb 2014 - 4:21 pm | आत्मशून्य

यामुळे आजुबाजुच्यांना नक्कि प्रॉब्लेम कोणाला आहे याचे ज्ञान होइल आणी उगाच समोर येइल त्या प्रत्येकाबाबत गैरसमज समुहाच्या पाठींब्यावर निर्माण करणे थांबवाची उपरती होइल हा हेतु असेल तर चांगला उद्देश आहे.

तुम्हाला केंव्हा न्यायचे ?

संजय क्षीरसागर's picture

25 Feb 2014 - 9:36 am | संजय क्षीरसागर

मायला, काय नामी प्रश्न आहे! घंटीचंदची आरती झाली की निघा.

आत्मशून्य's picture

25 Feb 2014 - 11:11 am | आत्मशून्य

फक्त तुमच्याशी साद प्रतिसाद करायला मला फार्फार आवडते. विचारा का ? कारण ते माझ्या मनात मी चक्क हुशार आहे असा (गैर)समज निर्माण करते.

विज्ञान वेळेचे अस्तित्व आहे असे मानते हे आपणास ठाउक आहे काय ?

सुबोध खरे's picture

24 Feb 2014 - 1:39 pm | सुबोध खरे

मुद्दाम गहन विचार करणार्‍यांची आम्हाला गरज नाही...!सदरील वाक्य डिनायल मोडचे एक क्लासीक उदाहरण ठरावे.
हे डिनायल कसे ते समजले नाही

आत्मशून्य's picture

24 Feb 2014 - 2:07 pm | आत्मशून्य

याचाशी समुळ फारकत घेणारे ते वाक्य असुन मुद्दाम गहन विचार या प्रक्रियेची मनावर बसलेली भिती/नकारभाव ते वाक्य दर्शवते, तिरकसपणे लिहले नसेल तर. तिरकसपणाने लिहले असेल तर इतर मनोवीकर शक्यताही लक्षात घ्यावा लागतात.

आनन्दा's picture

25 Feb 2014 - 5:49 pm | आनन्दा

माझ्या मते हे वाक्य जरा वेगळ्या कोटीत बसते.. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये समोरच्या व्यक्तीबरोबर वाद घालून झाल्यावर, जेव्हा असे समजले, की ती व्यक्ती स्वतः डिनायल मोड मध्ये आहे आणि तिला आपले म्हणणे समजून घेण्यात काहीही रस नसून केवळ स्वतःचे म्हणणे पुढे दामटण्यात रस आहे... पुढे जाऊन जर ती व्यक्ती स्वतःला उन्मत्त किंवा गहनविचारी मानत असेल, तर त्यांना उत्तरे देण्यापासून स्वतःला मुक्त करण्यासाठी हे वाक्य आहे.. मागच्या २ महिन्यातील मिपावरील घडामोडी पाहिल्यास आपल्याला सहज कळेल.
बादवे, हल्ली मुद्दाम गहन विचार करणारे फारसे कुठे दिसत नाहीत.. दमले काय हो?

आणि,
डिनायल ला खालील म्हणी लागू होतात का?
१. नावडतीचे मीठ अळणी
२. कोल्ह्याला द्रक्षे आंबट
आणखीनही काही असल्यास सांगा.

आत्मशून्य's picture

26 Feb 2014 - 10:54 pm | आत्मशून्य

पुढे जाऊन जर ती व्यक्ती स्वतःला उन्मत्त
किंवा गहनविचारी मानत असेल, तर त्यांना उत्तरे देण्यापासून
स्वतःला मुक्त करण्यासाठी हे वाक्य आहे..

असेल असेल...! आता गीता वाचत बसत नाही. इत्यलम.

सुबोध खरे's picture

24 Feb 2014 - 1:41 pm | सुबोध खरे

हे वाक्य डिनायल चे वाटत नसून अहंमन्यतेचे उदाहरण वाटते (megalomania)

आणी प्रचलीत समजुतिंना संपुर्ण डिनायलही आहे. ते जेनेरिक विधान आहे म्हटलेले नाही कारण मी स्वतःच "स्टीव" या स्पेसिफीक व्यक्तीबाबत बोललो आहे. आणी हे तो जेंव्हा कंपनी सोडुन गेला आणी अ‍ॅपल बॅकरप्सीच्या उंबरठ्यावर पोचले तेंव्हा आपोआपच सिध्द झाले.

पण आपल्या या विधानामुळे आता लक्षात येउ लागले असेलच की मनाच्या एकसमान प्रतिक्रीया या अतिशय विवीध कारणानेही घडतच असतात त्याला साच्यात बसवणे कठिण असते. म्हणूनच निष्णात तज्ञ रोग निदानासाठी इतका वेळ ट्रायल एरर करत घेतो/लागतो.

राजेश घासकडवी's picture

24 Feb 2014 - 2:13 pm | राजेश घासकडवी

डिनायल? हे काय असतं बुवा? मला कधीच कोणीच डिनायलमध्ये जाताना दिसलेलं नाही. ही सगळी तुमची आधुनिक मंडळींची थेरं आहेत! चांगलं ब्रह्मचर्य पाळावं, उगाच भलतंसलतं खाऊ नये, चटईवर झोपावं म्हणजे काहीही प्रॉब्लेम कोण्णालाही येत नाहीत!

आत्मशून्य's picture

24 Feb 2014 - 2:27 pm | आत्मशून्य

वेलकम टु दी कॉनवरसेशन. :)

तुमचे विशेष कौतुक आहे.

आत्मशून्य's picture

24 Feb 2014 - 2:37 pm | आत्मशून्य

डिनायल नाकारणारी अजुन एक जमात आहे. सासरी गेल्यावर माहेर जास्त आवडु लागणारे त्यात मोडतात.

तुमच्या वाक्याचा अर्थ ०% कळला .

शक्यं असल्यास सविस्तर, सोदाहरण स्पष्टीकरण करावे.

इतरांसाठी त्यात इशारासुधा न्हवता हे स्पष्ट केलेच आहे नसेल तर आता समजुन घ्यावे. आता आपण त्यांच्या पुढील प्रतिसाद, धागा, खेळीची वाट बघुया म्हणजे आपणास शंकासमाधान आपोआप लाभेल याची खात्री आहे.

मनीषा's picture

24 Feb 2014 - 2:55 pm | मनीषा

हो का सॉरी !

आणि असो ...

आत्मशून्य's picture

24 Feb 2014 - 3:13 pm | आत्मशून्य

तरीही एक गोष्ट स्पश्ट करतो. सासर माहेर हा शब्द बहुतांश स्त्रियां संदर्भात वापरला जास्त जातो मान्य आहे, पण ते पुरुषांनाही असते. तसेही मी शक्यतो स्त्रियांबाबत नीसंधीग्ध विधाने वा प्रतिसाद लिहायच्या प्रयत्नात असतो. तेंव्हा जर या धाग्यावर अनावधानाने माझ्याकडुन जर काही स्त्रियांना समोर ठेउन लिहलेले "असे" आढळल्यास मला क्षमा करावी व निदर्शनासही आणुन द्यावे चुक दुरुस्त करेन. गैरसमजाबाबत दिलगीर आहे.

डिनायलचा प्रैक्टिकल अनुभव अभ्यास आणि विशलेषहनाला हात घातला नाही :(

होय बरोबर इश्वर वा मंत्र शक्तीचे अस्तित्व नाकार्णे उत्कृष्ट डिनायल एगजाम्प्ले आहे. खरा इश्वर भक्त विद्न्यान नाकारायाचा कोते पणा करत नाही.

मंत्र शक्ती बद्दल मला वाटते वि.का.राजवाड्यांचा एक लेख वाचल्याच आठवल तो त्यांच्याच शब्दात वाचावयास हवा असा होता कुणी तो ऑन लाईन उपलब्ध करून देऊ शकल तर स्वागत असेल. बाकी सोबत आमच्या मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ? तूनळीचे दुवे आहेत त्यात या विषयाचा जरासा उहापोह आहे.

डिनायलचा प्रैक्टिकल अनुभव अभ्यास आणि विशलेषहनाला हात घातला नाही>>हम्म आम्हीही वाचतो आहोत

मदनबाण's picture

25 Feb 2014 - 10:19 am | मदनबाण

खरा इश्वर भक्त विद्न्यान नाकारायाचा कोते पणा करत नाही.
या विधानाशी सहमत.
हे विधान वाचल्यावर मला उगाच अथर्वशीर्षातली एक ओळ आठवली :- त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि

@ माहितगार
मंत्र शक्ती बद्दल मला वाटते वि.का.राजवाड्यांचा एक लेख वाचल्याच आठवल
मलाही तो लेख,त्यांची मतं वाचायला आवडतील्,त्यात त्यांचा या विषयावर विचार काय होता ? म्हणजे त्यांच मत ?
जालावर राजवाडे यांच्या बद्धल शोधताना मला खालील ब्लॉग मिळाला.
दुवा :- इतिहासाचार्य वि. का. राजवाडे…
सुहास झेले यांचा हा ब्लॉग आहे.

मला वाटतय डिनायल अन अंगचोरपणा अथवा स्वतःचीच लाल यांचा घोळ झालाय.
निदान थोडी माहीती तरी वाचायला मिळेल.
आणखी चांगल्या प्रतिसादांच्या अपेक्षेत.

मला वाटतय डिनायल अन अंगचोरपणा अथवा स्वतःचीच लाल यांचा घोळ झालाय.

अंगचोरपणा करणार्‍या व्यक्तीला आपण काय करतोय याचं भान असतं. एखादया गोष्टीची जबाबदारी नाकारायची असेल तर माणूस जाणून बुजून अपण त्या गावचेच नाही, आपल्याला त्यातलं काही कळत नाही असा आव आणून जबाबदारी नाकारतो.

आयटी मध्ये याची उदाहरणं रोज पाहायला मिळतात. जो प्रामाणिकपणे काम करतो, मेहनत घेतो त्याला अधिकाधिक काम देत राहायचं आणि जो कामचोरपणा करतो त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं हा आयटी मॅनेजर्सचा फंडा असतो. हे असं दोन तीन वेळा झालं की काही प्रामाणिकपणे काम करणारेही "शहाणे" होतात. ते ही कानावर हात ठेवून मग "अरे मैने वो पेहले कभी किया नही, मेरे पास और भी दो टास्क हैं" असे बहाणे करत काम टाळू लागतात. येडा बनके पेढा खाऊ लागतात. मला वाटतं हे उदाहरण अंगचोरपणाचं ठरावं.

स्वतःचीच लाल हे नार्सिसिझमचे एक प्रमुख गुणवैशिष्ठ्य आहे. त्याची अनेक उदाहरणे आपल्या आजू बाजूला असतात.

डिनायलमध्ये एखादी गोष्ट नाकारणार्‍या व्यक्तीने त्या गोष्टीच्या बाबतीत सारासार विचार केलेला नसतो. किंबहूना त्या व्यक्तीला निदान तेव्हढया गोष्टीपुरतं तरी काय चांगलं, काय वाईट याचं भान नसतं. कटू वास्तवापासून दूर पळण्यासाठी त्या व्यक्तीच्या अंतर्मनाने घेतलेला तो बचावात्मक पवित्रा असतो.

एक सरासरी पुस्तकी हुशार (book smart) मुलगा. लहानपणापासून अंगकाठीने बारीक. त्यामुळे घरच्यांनी त्याला "तू नाजूक आहेस, तुला हे जमणार नाही, तुला ते जमणार नाही." असं म्हणत त्याला मनानेही नाजूक केले. पुढे बारावीला अगदी जेमतेम गुण मिळाले. याची तितकीशी बौद्धिक कुवत नसताना, तसेच घरच्यांची आर्थिक कुवत नसताना केवळ याच्या अट्टाहासापोटी एका महागडया व्यवसाय शिक्षणाच्या पेमेंट सीटला प्रवेश घेतला. तो अभ्यासक्रम मात्र त्याने सरासरी गुणांनी सहजरीत्या पुर्ण केला. बाहेरच्या जगात पडला आणि त्याची खरी कसोटी सुरु झाली. जे जे करेल त्यात सपाटून मार खाऊ लागला. घरच्यांना वेठीला धरुन पैसे घेऊन नव नविन अपयश पदरी बांधू लागला. दुनियेला नावं ठेऊ लागला. मात्र आपला आत्मविश्वास,आणि चिकाटी कमी पडतेय, आपण जगाला समजायला कमी पडतोय हे मात्र तो मान्य करायला तयार नव्हता. त्याच्या दृष्टीने त्याचे काहीच चुकत नव्हते. जो काही प्रॉब्लेम होता तो बाहेर होता. हे डिनायलचं एक उदाहरण.

स्पंदना's picture

25 Feb 2014 - 10:02 am | स्पंदना

मी तुम्ही लेखात दिलेली उदाहरणांबद्दल बोलतेय. डिनायल असत. पण मला वाटतय उदाहरण चुकताहेत.
तुम्ही ज्या मुलाबद्दल बोलताहात तो तसाच वाढवला गेला ती त्याची धारणा झाली. म्हणजे रोपट जर वाकड तिकडे आकार देत वाढवल तर जस होइल तस.
मला वाटतय डिनायल हे अचानक समोर आलेल्या गोष्टीला नाकारणे, बाहेरच्यांसाठी नाही तर स्वतःच्या अंतरमनात सुद्धा. टेन्थ सर्कल नावाचा एक पिक्चर आहे. त्यात बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी एक शाळकरी मुलगी त्याला सेड्युस करुन मग त्याच्यावर रेपचा आरोप करते. स्वतःलाच बुचकळ्यात पाडणार तिच वागण कदाचित डिनायल होउ शकत. एकदा एका कामवालीला मारहाण करत असताना पाह्यल्यावर असे कसे वागतात लोक अस म्हणणारी एक जवळची व्यक्ती स्वतः त्यांच्या घरातल्या कामवालीला तडाखे दिल्याशिवाय हलतच नाही अस म्हणत असे.
बाहेर फार सुशिक्षीत वागणारी माणसे घरात तद्दन खोटी बार्बेरिक वागतात. ही उदाहरणे डिनायलची होउ शकतील. कारण त्यांच्या मनात मी तसा नाहीच आहे हे ञ्ठसलेले असते.

आत्मशून्य's picture

25 Feb 2014 - 4:44 pm | आत्मशून्य

डिनायल नेमके कशाला म्हणायचे ह्यावर नेमके मार्गदर्शक भाष्य आहे.

मदनबाण's picture

25 Feb 2014 - 4:58 pm | मदनबाण

डिनायल मोड आणि दुटप्पीपणा यांचा संबंध आहे का ? डिनायल मोड मधल्या व्यक्तींच्या वर्तनात दुटप्पीपणा असतो का ?

आत्मशून्य's picture

26 Feb 2014 - 5:01 pm | आत्मशून्य

दुटप्पीपणा हे तसे जेनेरिक बिहेवियर आहे डिनायल मोड आणि इतर अनेक बाबतीतही याची व्याप्ती असते. त्यामुळे हा मुद्दा घेतला तर डिनायलच्या ४०पट लेखा एव्हडा प्रतिसाद लिहावा लागेल. तरीही दोन शब्दात होय हे ठामपणे म्हणता येइल. :)

पैसा's picture

25 Feb 2014 - 9:55 am | पैसा

माझ्या माहितीच्या एका महिलेला ३ वर्षांपूर्वी टीबी झाल्याचे निदान डॉक्टर्सनी केले आणि ट्रीटमेंट चालू केली. त्याचा उपयोग होतो आहे असे दिसले पण हिचे जेवणखाण यथातथाच होते. आणि मला कसा टीबी होईल? डॉक्टर चुकले असतील असं म्हणत तिने शेवट ट्रीटमेंट पूर्ण केली नाही.

मुंबईत रहाणार्‍या बर्‍याच जणांना बर्‍याच कारणांनी टीबी होऊ शकतो. पण तिने ती वस्तुस्थिती पूर्ण नाकारली. दुर्दैवाने तिच्या जवळच्या कोणीच तिच्यावर दबाव आणून ट्रीटमेंट पुरी करायला लावली नाही. गेली ३ वर्षे अक्षरशः झिजत जाऊन तिचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. घरच्यांनी वेळीच हालचाल केली असती तर ती सहज बरी झाली असती.

आता विचार करता तिचा डिनायल घालवण्यासाठी तिच्या नवर्‍याने काहीच केलं नाही, म्हणजे तिच्या मृत्यूला तोही अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे असं वाटतंय.

माहितगार's picture

25 Feb 2014 - 11:06 am | माहितगार

तिचा डिनायल घालवण्यासाठी तिच्या नवर्‍याने काहीच केलं नाही,>> तूमचा मुद्दा चांगला आहे. एकतर जवळची व्यक्ती स्वतः डिनायल मध्ये असून नये लागते. आजूबाजूच्या भावनिक परिघातील व्यक्ती डिनायल मध्ये असू नये लागतात. आणि समजा स्वतः डिनायल मध्ये नसतील तरीही डिनायल घालवण प्रत्येकवेळी प्रत्येकाच्या हातचा मळ असू शकतो का असा एक प्रश्न उद्भवतो. डिनायल मधील व्यक्ती भावनेच्या खूपच आहारी गेलेल्या असतील तर त्यातून बाहेर काढण जवळच्यांनाही शक्य होतच अस नाही. अगदी तुम्ही मानसशास्त्राचे चांगले अभ्यासक असला; तर्कशास्त्रावर तुमची कमांड असली ऑब्जेक्शन हँडलींग तुम्हाला उपज असून वर त्याचे ट्रेनिंगही आहे तरीही डिनायल घालवण सोप जात का हा प्रश्न शिल्लक राह्तोच. फ्रँकलि चर्चा वृद्धींगत व्हावी म्हणून सध्या मी उत्तर देत नाही आहे प्रश्न किंवा उलट प्रश्न विचारतो आहे किंवा जस्ट वाचतो आहे.

आनन्दा's picture

25 Feb 2014 - 6:03 pm | आनन्दा

मला पर्सनली असे वाटते की डिनायल घालवणे हे तेव्हढे सोपे नाही. कारण माझ्या माहितीनुसार डिनायल म्हणजे अंतर्मनाने वास्तव स्वीकारायला दिलेला नकार. उदा.. जेव्हा माझी आई गेली, तेव्हा माझ्या अंतर्मनाने ते स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे मला आई गेल्याचे काहीच दु:ख झाले नाही. उलट मी जवळजवळ १ वर्ष, "आई कुठेतरी जवळच गेली आहे, आणि कधीतरी अचानक परत येइल" म्हणून वाट बघत बसलो. आता हे एक प्रकारचे डिनायलच आहे, पण या समजूतीमुळे मी आई गेल्याचे दु:ख हळू हळू पचवू शकलो. त्यामुळे डिनायलवर उपचार करताना त्या व्यक्तीने ते सत्य "लॉजिकल" पातळीवर किती स्वीकारले आहे हे पाहणे देखील महत्वाचे ठरावे.
तसेच आत्यंतिक नकारत्मक भूमिकेत गेलेल्या व्यक्ती/ नैराश्याच्या आहारी गेलेल्या व्यक्ती या देखील डिनायल असतात का?

मूलतः डिनायल जाण्यासाठी त्या व्यक्तीने लॉजिकल स्तरावर वास्तव स्वीकारणे आवश्यक आहे असे मला वाटते, अंतर्मन हळूहळू सनजून घेईलच.

बॅटमॅन's picture

25 Feb 2014 - 6:09 pm | बॅटमॅन

न्यूनगंडग्रस्त लोकही डिनायल मोडमध्ये असतात का?

माहितगार's picture

25 Feb 2014 - 6:14 pm | माहितगार

प्रश्न विषयाला धरून वाटला आवांतर वाटत नाही

पैसा's picture

25 Feb 2014 - 8:46 pm | पैसा

डिनायल मधून बाहेर काढणे एवढे कठीण आहे का? मी वर दिलेल्या उदाहरणातील महिलेच्या नवर्‍याने तिला समुपदेशकाकडे नेणे, निसर्गोपचार केंद्रात पाठवणे इ. काही केले नाही. कधीही बोलणे झाले तर "ती ऐकत नाही, मी काय करू?" असं म्हणायचा. खरं सांगायचं तर हा माणूस ऑफिसमधून पिऊन घरी यायचा आणि मग संवाद अशक्यच. सकाळी उठून परत ऑफिसात. अशा वेळी तिला कोण मदत करू शकणार होते? की हा नवराच स्वतः डिनायल मोडमधे गेला होता? स्वतः डिनायल मोडमधे असलेला माणूस तर काही करण्याच्या पलिकडे असतो, त्याच्यासोबत रहाणारे जर हे समजत नसतील तर ती परिस्थिती जास्त घातक म्हणावी लागेल.

>>'डिनायल घालवणे हे तेव्हढे सोपे नाही.' अस सरसकट विधान करत असेन तर मी स्वतः डिनायल मध्ये असू शकतो. >>डिनायल मधून बाहेर काढणे एवढे कठीण आहे का? हे वाक्य 'डिनायल मधून बाहेर काढणे अजिबात कठीण नाही' असे असेल तर आपणही डिनायल मध्ये असू शकता. हे एवढही सहज असतं तर आपल्या सहीत Don't waste your time with explanations: people only hear what they want to hear - Paulo Coelho हे आल असत का या बद्दल मी साशंक आहे? मानवी सहसंबंध आणि संवाद १+१ = २ असे गणिती असतील आणि अभियांत्रीकी पद्धतीने त्यांची सोडवणूक शक्य आहे का या बद्दल मी जरासा साशंक आहे.

मला वाटते मी वरच त्याचे उत्तर दिले आहे.

डिनायल जाण्यासाठी त्या व्यक्तीने लॉजिकल स्तरावर वास्तव स्वीकारणे आवश्यक आहे

एकदा बौद्धिक स्तरावर ते स्वीकारले की मग ते आतपर्यन्त हळू हळू झिरपत जातेच. मग ते वास्तव कोणतेही असेल, अगदी

मी डिनायल मध्ये

आहे असे देखील.

माहितगार's picture

26 Feb 2014 - 5:43 pm | माहितगार

सहमत. सध्या इतरत्रही व्यस्त असल्याने प्रतिसाद देण्यात विलंब होत आहेत त्या बद्दल क्षमस्व.

आणि प्रतिसादाकरीता धन्यवाद.

मी वर दिलेल्या उदाहरणातील महिलेच्या नवर्‍याने तिला समुपदेशकाकडे नेणे, निसर्गोपचार केंद्रात पाठवणे इ. काही केले नाही. ........ खरं सांगायचं तर हा माणूस ऑफिसमधून पिऊन घरी यायचा आणि मग संवाद अशक्यच. सकाळी उठून परत ऑफिसात.

एक काळ समस्या निवारणाकरता मांत्रिक तांत्रिक गुरु ते अगदी देवी अंगात येण्यावर आवलंबून होतो ते अपेक्षीत समुपदेशन दर्जाची खात्री नसली तरी व्यावसायिक समुपदेशन तज्ञ उपलब्ध होऊ लागले आहेत ह्या प्रगतीची सकारात्मक नोंद घेण्यास हरकत नाही. सक्षम व्यावसायिक समुपदेशका कडे पोहोचवे पर्यंत किंवा न पोहोचवताही समुपदेशनाचे काम संबंधीत व्यक्तीच्या भावविश्वातील जिवलगांना अथवा आसपासच्या मंडळींना करण्याची वेळ केव्हाही येऊ शकते. भावना असतात म्हणूनच आपण भावविश्वात असतो; हे खरे असले तरी समुपदेशनाचे कार्य करताना संवेदनशीलता कायम ठेवतानाच; भावना योग्यवेळी डिटॅच नाही केल्या तर; आपले स्वतःचे बायस आपल्या स्वतःला डिनायल मध्ये नेऊ शकते.

ज्या व्यक्तींशी संवाद साधण्याची गरज आहे त्यांच्यावर संवाद साधण्यापुर्वीच आपल्या बायसने लेबलींग होत नाही आहे ना ? people only hear what they want to hear या मध्ये माझा सुद्धा अंतर्भाव असून; मी समोरच्या व्यक्तीशी संवाद साधू पाहीन तर संवाद कितपत साधला जाईल? कितपत अपेक्षीत परीणाम मिळेल? या बाबत साशंकता वाटते. मला काय हवे ते मिळवण्याच्या यशाकरता; 'तुम्हाला काय हवे ?' या प्रश्नाच्या शिडीने चढणे सोपे आणि व्यावहारीक जाते; असे मला वाटते.

मराठी माणसाकडे याचे आजीबात कौशल्य नाही असे नाही; पण सांस्कृतीक दृष्ट्या आपण (सर्व मराठी) ते वापरण्यास 'लष्कराची भाकरी ह्या हाफहर्टेडनेसने' कमी पडत नाही ना ? म्हणून 'मला काय हवे?' ते सांगण्याची घाईत; प्रत्येक मराठी माणूस जुंपलेलातर नाही ना? असे बर्‍याचदा वाटते. मराठी संस्कृतीने श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती (यू अ‍ॅटीट्यूड) बानवण्याकरता अधिक प्रयास करण्यास जागा आहे का? हे अभ्यासावयास हवे असे वाटते.

प्रतिसाद भाग १ आणि भाग २ अधिक जनरल होते पण त्या पायर्‍या न करता आपल्या मुख्य उदाहरणावर येणे कदाचित विषयाला न्याय देणारे नसते म्हणून तो प्रपंच. जवळच्या माणसांना समजणे कठीण असते; माहित नसलेल्या उदाहरणावर भाष्य करणे अतीशयोक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु या विषयाची चर्चा होणे महत्वाचे आहे त्यामुळे मला जमेल तेवढा यथाशक्ती प्रयत्न करतो.

१) प्रथम दर्शनी टिबी झालाच नाही अशा भ्रमातलेच डिनायल होते का याची खात्री करण्याची गरज होती असे वाटते. आपण दिलेल्या उदाहरणात पती पत्नीचे कौटुंबिक संबंध आर्थीक स्थिती इत्यादी माहितीचा अभाव आहे. व्यक्तीगत तणावांनी अथवा आर्थीक समतोल साधण्यातील अपयशाने आलेली दीर्घ कालीन निराशेच रुपांतरण आता राहून तरी काय करायच या डिनायल मध्ये झाल आहे का ? (डिनायलची इतरही कारण असू शकतात आयूष्य भर शुश्रुषा करणार्‍या एका नर्सने (मराठीच) आयूष्याच्या शेवटच्या काळात कोणतेही औषधपाणी इंजेक्शन घेण्यास नकार दिला तेही डिनायल होत पण वेगळ्या कारणानीं आलेल असाव)

२) नवरा डिनायल मधून बाहेर येतो की नाही हे बघण्या पेक्षा सर्वात जवळचा व्यावहारीक मार्ग अशावेळी जवळच्या दुसर्‍या व्यक्तींनी/च्या त्यांच्या घरी जा/नेऊन शुश्रूशेची जबाबदारी उचलणे हा झाला. पण भावविश्वात एवढ्या जवळची व्यक्तीच नसणे स्वतःला भार म्हणून बघण्याच्या डिनायल असू शकत तस आपलीच अंगचोरणारी मडळी असू शकतात; संबंधीत व्यक्तीने स्वतः पुर्वी अंगचोरपणा केला अशी कारण असू शकतात ते सर्वच नाते वाई़क मुंबईत असतील तर त्यांच्याकडे जागेचा अभावही असू शकतो.

३) या प्रकरणात सिरीयस अल्कोह्लीझम करता आधी नवर्‍याला अल्कोहोलीक अ‍ॅनॉनिमस सारख्या सेल्फहेल्प ग्रूप मध्ये कदाचित पाठवण्याची गरज असूही शकते ते नाकारता येत नाही. हेही शक्य नाही झाल तर (सिरीयस अल्कोह्लीझम खाली असलेया व्यक्तीस फंडे द्यायचेच झालेतर नियंत्रीतपणे घेऊ शकणार्‍या व्यक्तीनी सोबत बसून कमी पिलेल्या अवस्थेत द्यावेत असा ही एक प्रवाद ऐकुन आहे.) आणि त्याही पेक्षा केवळ दारू पितो म्हणून वाईटपणाचा भल्याबुर्‍याचा शिक्का मारून कुटूंबीयही एका ऑदरवाईज चांगल्या व्यक्तीला नाकारत असू शकतात. जी व्यक्ती स्वतःच नाकारली जाती आहे ती सहकार्य करण्यास उत्साही असण्याची शक्यता कमी असू शकते. असे असेलच असे नाही पण प्रत्येक शक्यता तपासून पहावी लागते.

३) यात अजून एक महत्वाचा मार्ग यु अ‍ॅटीट्यूडचा तुम्हाला काय हव आहे हे विचारा? बिनधास्त व्यवहारी रहा ? गरज भासलीचतर हातात एक विदेशी रंगीत पाण्याची बाटली गिफ्ट म्हणून ठेऊन बोलण्यास सुरू करा काय केल्याने तुम्हाला हवीती कृती करून मिळेल हे स्पष्ट विचारणे. नवरा बायकोत तणाव असेलतर आधी झालेल्या चांगल्या प्रसंगांचा आणि भावी चांगल्या शक्यतांचा वास्ता देणे.

अर्थात व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात. जुन्या हिंदी चित्रपटात एक बावर्ची नावाचा चित्रपट होता त्यात एका समस्याग्रस्त कुटूंबात एक नवा आचारी नौकरीस येतो आपल्या स्वभावाने सर्वांची मनेही जिंकतो आणि छूमंतर म्हणावे तसे सगळे कुटूंब एकत्र येते. अशी हॅपी एंडींग स्टोरी प्रत्यक्षात सगळी कडे होत नाही.

पैसा's picture

2 Mar 2014 - 8:33 pm | पैसा

एका तिर्‍हाईत परिचिताच्या दृष्टीकोनातून त्या नवरा बायकोचे संबंध वरकरणी सर्वसामान्य दिसत होते. आतून काही जास्तीचे तणाव असल्यास माहित नाही. आर्थिक स्थिती उत्तमच म्हणावी लागेल.

मात्र कौटुंबिक परिस्थिती तिला कोणी मदत करण्यासारखी नव्हती. एक भाऊ स्वतःही मानसोपचार घेत आहे. बहीण यथातथा आर्थिक परिस्थितीत आणि आईवडील स्वतःच अतिशय वृद्ध. नवर्‍याकडच्या मंडळीना तिने खूपच मदत केली होती पण शेवट त्यापैकी कोणीच मदतीला आले नाहीत.

मला वाटतं की नवरा मुलंबाळं हे कुटुंब एखाद्या व्यक्तीच्या सर्वात जवळचं. त्यानंतर भाऊ-बहिणी, आईवडील दुसर्‍या वर्तुळात. परिचित आणि अन्य नातेवाईक तिसर्‍या वर्तुळात आणि संबंध नसलेला समाज त्या परिघाबाहेर. मदत करण्याची/करू शकण्याची शक्यता जसे केंद्रापासून दूर जावे तशी कमी होत जाते. शिवाय मला काय त्याचे अशी अ‍ॅटिट्यूड नसेल तरी परिचित माणूस मधे पडणे सहसा टाळतोच, कारण काही कौटुंबिक वाद असतील तर शेवट जरा दूरचा असा माणूस खापर फोडण्यासाठी उत्तम टार्गेट ठरतो.

माहितगार's picture

3 Mar 2014 - 11:51 am | माहितगार

@पैसा सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक धाग्यावर
Response Options
हा दुवा दिलेला या कडे आपल कदाचित लक्ष गेल असाव. वाचल्यावर प्रतिसाद/मत द्यावे विनंती

पैसा's picture

3 Mar 2014 - 12:20 pm | पैसा

मी एक उदाहरण दिलं आणि त्याबद्दल माझी मतं दिली. मला कोणाचेही गिनीपिग व्हायची इच्छा नाही आणि तेवढा वेळही नाही. माझे सर्व प्रतिसाद तुम्ही रद्द समजू शकता.

माहितगार's picture

3 Mar 2014 - 1:14 pm | माहितगार

>>मला कोणाचेही गिनीपिग व्हायची इच्छा नाही>>
नाही हो कोणालाही गिनीपिग करता यावे अथवा परीक्षा घ्यावी दुखवावे अशी आम्हाला कवडी मात्र इच्छा नाही.

आम्हाला स्वतःला माहित/ज्ञान नाही किंवा आमच्या पेक्षा अधिक व्यवस्थीत सांगतात अशा इतरत्रच्या दुव्यावर दिसलेले माहिती/ज्ञान ते शेअर करावे या विषयाच्या इतर वाचकांसही शेअर होते आपला अभिप्राय मिळाल्यास आमच्याही माहितीत भर पडते पलिकडे हेतु नाही. तरीही आपली तशी इच्छा नसेल तर राहीले. अनवधान होऊन दुखावले असल्यास क्षमस्व.

पैसा's picture

4 Mar 2014 - 4:21 pm | पैसा

माझा प्रतिसाद तुम्हाला कदाचित नी-जर्क प्रकारचा वाटला असेल तर क्षमस्व. पण मला काहीही प्रॉब्लेम आला तर मी नक्कीच डॉक्टरकडे जाणे पसंत करीन. अशी ऑनलाईन माहिती, सर्व्हे यातून फार काही साध्य होतं असं वाटत नाही. जालावर सर्व्हे घेणारे स्वतः कोण असतात, त्यांचे क्वालिफिकेशन काय किंवा इतर गोष्टी, अगदी माहितीचा लेख असेल तरी १००% विश्वासार्ह असेल असं वाटत नाही. प्रश्नावलीची उत्तरेही अनेकदा होय/नाही अशा कॅटेगरीत देणे अवघडच असते. त्यामुळे अशा ऑनलाईन माहिती/सर्व्हे यापासून मी तरी लांबच रहाते.

माहितगार's picture

4 Mar 2014 - 6:35 pm | माहितगार

आपले म्हणणे बरोबर आहे याच विषयावर मी लावलेल्या धाग्यात डिस्क्लेमर लावण्याची काळजी घेतली आणि तुम्ही म्हणता तसे
"
खासकरून मानसशास्त्रीय; वैद्यकीय आणि विधीक्षेत्रातील माहिती चूकीची आणि शिळी माहिती असू शकते. कोणत्याही प्रकारचा सल्ला घेण्यासाठी आम्ही आपणास मान्यताप्राप्त व्यावसायिक तज्ञांचाच सल्ला घेण्यास सूचवतो.
"

असे विशेष करून नोंदवण्याची काळजी घेतली आहे.

हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन..

दिलाला बळंच ऑल इज वेल सांगत राहणे.. आजुबाजूला अनवेल काही चालू आहे हे स्वत:शीही अमान्य करणे.. झटकणे.

सर्वात common उदाहरणांपैकी एक अल्कोहोल किंवा अन्य व्यसनांची ठराविक स्टेज.

शारिरीक,मानसिक,सोशल , व्यावसायिक असे सर्व दुष्परिणाम सुरु व्हायला लागलेले दिसत असूनही.. व्यसनाचे वाढलेले प्रमाण दिसत असूनही (स्वत: अन जवळच्याना).. आपला कंट्रोल उरलेला नाही हे जाणून घ्यायचे ठरवले तर ढळढळीत दिसत असतानाही...

आपल्याला अल्कोहोलिझम हा प्रकार अजिबात झालेला नसून आपण फुल्ल कंट्रोलमधे आहोत आणि कुटुंब / मित्र/ हितचिंतकाना ते पटत नसून ते उगीच त्रास करुन घेतात अशी स्वत:ची ठाम समजूत.. हे वेल डिफाईंड डिनायल आहे आणि तो सर्व व्यसनी.च्या सुटकेत सर्वोच्च मोठ्या आकाराचा धोंडा असतो. डिनायल सुटले तर बाकीचे सर्व तुलनेत ..तुलनेतच..खूप सोपे.

राजेश घासकडवी's picture

26 Feb 2014 - 1:08 am | राजेश घासकडवी

ऑल इज वेल - हा स्वतःला संदेश देणं एका विशिष्ट पातळीपर्यंत फायदेशीर असतं. दारूसारखंच, अगदी मर्यादित प्रमाणात घेतलं तर फायदेच असतात. मात्र ती रेषा कधी ओलांडली जाते हे ठरवणं कठीण असतं. अल्कोहोलिझमच्या बाबतीत हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे.

अनुप ढेरे's picture

26 Feb 2014 - 2:45 pm | अनुप ढेरे

दारूसारखंच, अगदी मर्यादित प्रमाणात घेतलं तर फायदेच असतात.

हे सगळ्या दारवांबद्दल ('दारू'च अनेकवचन) खरं असतं का? मला वाटायचं की फक्तं वाईन चांगली असते.

माहितगार's picture

25 Feb 2014 - 7:54 pm | माहितगार

हो गई है पीर पर्वत / दुष्यंत कुमार

हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए

आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी
शर्त थी लेकिन कि ये बुनियाद हिलनी चाहिए

हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गाँव में
हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए

संपत's picture

25 Feb 2014 - 9:49 pm | संपत

बहोत खूब

इरसाल's picture

26 Feb 2014 - 5:54 pm | इरसाल

तु ठीक आहेस पण मी ठीक नाही
तु ठीक आहेस आणी मी पण ठीक आहे
तु ठीक नाहीस पण मी ठीक आहे
तु ठीक नाहीस आणी मी पण ठीक नाही.

धन्या's picture

26 Feb 2014 - 6:37 pm | धन्या

ही डॉ. एरिक बर्न यांच्या सुप्रसिद्ध गेम्स पीपल प्ले या पुस्तकातील ट्रान्झॅक्शनल अ‍ॅनालिसिस मॉडेलवर आधारीत डॉ. थॉमस हॅरिस यांची संकल्पना आहे.

इरसाल's picture

27 Feb 2014 - 9:43 am | इरसाल

ट्रान्झॅक्शनल अ‍ॅनालिसिस मॉडेल हेच म्हणायचे होते.

याचा प्रॅक्टीकल उपयोग कसा केला जातो ?

सस्नेह's picture

26 Feb 2014 - 10:33 pm | सस्नेह

आपणा सर्वांची खात्री आहे, आपण काहीच 'डिनाय' करत नाही याच्याबद्दल ...?

कवितानागेश's picture

26 Feb 2014 - 11:48 pm | कवितानागेश

मला आहे की!! =))

माहितगार's picture

27 Feb 2014 - 10:29 am | माहितगार

अगदी सहज उदाहरण :)

या बाबतीत अल्कोहोलिक एनानिमस चे कार्य आणि कार्यपद्धती वाखाण्याजोगी आहे.