'पालखी'
कुणी मोल केले, कुणी मापले
भल्या भाविकाने तुला कापले
घडावीत रांगेतुनी दर्शने
जरी चोरट्याने खिसे नापले
उठे ही सुखाची तुझी पालखी
उरे भर्जरी दुःख आपापले
तुझी आसवे लागली सार्थकी
तुझे त्याग नोटांवरी छापले
नसे आज चिंता तुझी जीवना
पहा दुःख हे छानसे रापले !
डॉ.सुनील अहिरराव