गर्दी आकांत माझ्या
ओशाळणारे ओठ हलले,
ज्यांनी केले वार
शेवटी धीर देऊन गेले !
वादळातील शरीर माझे
पाहायला तमाशा आले,
केले चौकात उभे ज्यांनी
नजरा उंचावून गेले !
कारणे ऐकवण्या अपयशाची
समीक्षक ते होऊन आले,
देऊन धीर उसना
भुंग्यांनी वासे पोकळ केले !
हूल भरारीची देऊन
बळ वांझोटेच दिले,
माझ्या परस्परच त्यांनी आता
घरटे माझे हिरावून न्हेले !
फुंकर घालण्याचे नाटक
सोद्यांनी हुबेहूब वटवले,
उरात दडवल्या दुःखाची
शेवटी किंमत करून गेले !
श्री. साजीद यासीन पठाण
दह्यारी जिल्हा - सांगली
प्रतिक्रिया
1 Feb 2014 - 10:42 am | जेपी
*****
1 Feb 2014 - 11:04 am | अत्रुप्त आत्मा
वाहव्वा!
1 Feb 2014 - 2:37 pm | आयुर्हित
हूल भरारीची देऊन
बळ वांझोटेच दिले,
माझ्या परस्परच त्यांनी आता
घरटे माझे हिरावून न्हेले !
व्वा, क्या लिखते हो जनाब| बहोत खूब!!
अपेक्षा भंगाचे दु:ख खरोखरीच खूप मोठे असते.
मला तर नेहमीच वाटते:
"खुद को कर बुलंद इतना कि खुदा भी आकर पुछे, कि बता तेरी रजा क्या है?"
2 Feb 2014 - 9:09 am | निवेदिता-ताई
छान
2 Feb 2014 - 11:22 am | विवेकपटाईत
वा! क्या बात है