पाऊले चालती ठाकुर्लीची वाट
फेसबुक वॉलचा पाहूनिया थाट
हर्षुनिया भारी काहीही घडण्याने
दिसता रिकामा कमेंटचा बॉक्स
पाऊले चालती...
मित्र दोस्त सारे मिपाकर हो ते
करती लाईक पाहूनी स्टेटस
पाऊले चालती...
छापता तो कोट टायनी बुद्धाचा
कमेंट दारिद्र्याचा व्हावा नायनाट
पाऊले चालती...
थोडा वेळ जाता पुन्हा लागे ओढ
तसा घेई तो धाव चेपूच्या दारात
पाऊले चालती...
प्रतिक्रिया
25 Jan 2014 - 11:09 pm | प्रचेतस
हाहाहा =))
फेबुवर उठसूठ जिलब्या पाडणारे आमचे काही मित्र आठवले.
25 Jan 2014 - 11:13 pm | पैसा
कंपूबाजांनी, कंपूबाजांवर आणि कंपूबाजांसाठी काढलेला धागा वगैरे वगैरे... मीच म्हणून घेते.
चेपु स्टेटसवाल्यांसाठी माझा कालचा स्टेटस मेसेज.
25 Jan 2014 - 11:17 pm | धन्या
मी लाईक केला आहे.
कारण फेसबुक स्टेटस लाईक करायला काहीच लागत नाही. बस एक क्लिक काफी हैं. ;)
25 Jan 2014 - 11:30 pm | पैसा
स्टेटस लाईक केल्याबद्दल धन्या वाद! ठाकुर्लीकरांना नाही पण आणखी एका स्टेटसप्रिय 'चेपु मित्राला' "एक तास झाला अजून नवीन स्टेटस मेसेज कसा टाकला नाहीस" असे विचार्ल्याची आठवण आली हो!
25 Jan 2014 - 11:36 pm | धन्या
आम्ही आमच्या एका मित्राला "तुझ्याकडून सर्व प्रकारचे स्टेटस अपडेटस झालेत. आता तुझ्या वॉलवर फक्त आज बराच वेळ बसूनही झालीच नाही एव्हढंच वाचायचं उरलं आहे" असं म्हटलं होतं.
बाकी ते ठाकुर्लीकर निमित्तमात्र बरं का.
25 Jan 2014 - 11:40 pm | पैसा
=))
25 Jan 2014 - 11:16 pm | मुक्त विहारि
पोटशूळ म्हणावा काय?
आयला ठाकूर आळी (ठाकुर्ली) वर पण कविता...
ठाकुर्लीकर भलतेच ग्रेट दिसत आहेत...
(धन्या भाऊ , जरा हलकेच घ्या,,, नाही म्हटले तरी ठाकूर आळी काय आणि डोंब आळी (डोंबिवली) काय...
शेवटी आम्ही एकाच भागातले आहोत)
25 Jan 2014 - 11:19 pm | मुक्त विहारि
जुन्या जाणत्या आणि नेणत्यांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.
(आम्ही कुणाला जुने,जाणते आणि नेणते म्हणतो, ह्याचा खुलासा आधीच केला आहे.)
25 Jan 2014 - 11:35 pm | किसन शिंदे
किसना म्हणे गप्प बसावे, जो जे लिहील ते ते वाचावे. :-)
25 Jan 2014 - 11:50 pm | कवितानागेश
अतिशय सुंदर अभंग! ;)
26 Jan 2014 - 12:22 am | प्यारे१
'शाणे' करुनि 'सोडावे' सकळ जन!
स्स्स्स्स पांडुरंग पांडुरंग!
26 Jan 2014 - 12:33 am | अत्रुप्त आत्मा
@छापता तो कोट टायनी बुद्धाचा
कमेंट दारिद्र्याचा व्हावा नायनाट
पाऊले चालती...
थोडा वेळ जाता पुन्हा लागे ओढ
तसा घेई तो धाव चेपूच्या दारात
पाऊले चालती...>>> =)) बेक्कार! =))
26 Jan 2014 - 9:06 am | कंजूस
काही कळले नाही .
ठाकुर्लीची वाट भक्तजण का चालत आहेत .
26 Jan 2014 - 9:43 am | धन्या
ठाकुर्लीला एक आधुनिक संत राहतात जे फेसबुक वॉलच्या माध्यमातून समाजजागृती करतात. आयुष्य उस्फुर्तपणे कसं जगावं हे त्या आपल्या छोटया छोट्या स्टेटसमधून सांगत असतात. "जे जे आपणासी ठावे" ही उक्ती ते शब्दशः जगतात.
त्यांनी दाखवलेल्या मार्गावरुन चालणारा एक भक्त नुकताच आमच्या पाहण्यात आला आणि हे काव्य आम्हाला सुचले.
26 Jan 2014 - 9:50 am | यशोधरा
धन्या, कु.पणाचा कहर हो! :D
27 Jan 2014 - 9:26 am | प्रचेतस
छ्या...त्यांच्या स्पष्टवक्तेपणाला तुम्ही चक्क कु.पणा म्हणताय. =))
26 Jan 2014 - 3:50 pm | प्यारे१
>>>>त्यांनी दाखवलेल्या मार्गावरुन चालणारा एक भक्त
बूकींग सुरु झाली? किती झाले आत्तापत्तुर?
26 Jan 2014 - 10:27 am | कंजूस
आले लक्षात .
आम्ही त्यांच्या फेसबुकवडाच्या सावलीत अगोदरच आहोत पण पारंब्यांकडे पाहिलेच नव्हते .
जाता जाता
आमच्या डोंबिवली नामदेवपथावरील साईमंदिराची शिरडीवारी ३ फेब्रु दुपारी बाराला निघणार आहे (३ ते ९ फेब्रु) असा फलक लागला आहे .
26 Jan 2014 - 1:33 pm | सूड
मीटर, यमक सगळंच हुकलंय !!
26 Jan 2014 - 3:34 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तुम आम खाओ रे बाबा, वेड्यावाकड्या फांद्या कायको मोजताय ???
26 Jan 2014 - 9:18 pm | अत्रुप्त आत्मा
@वेड्यावाकड्या फांद्या कायको मोजताय???>>>


27 Jan 2014 - 10:00 am | प्रमोद देर्देकर
जाऊ द्या हो त्यांचे नावा प्रमाणे म्हणजे सुड आयडि प्रमाणे ते वागताहेत, शिवाया राहातातही बदलापुरला मग तर काय प्रश्नच नको.
27 Jan 2014 - 10:11 pm | सूड
>>जाऊ द्या हो त्यांचे नावा प्रमाणे म्हणजे सुड आयडि प्रमाणे ते वागताहेत, शिवाया राहातातही बदलापुरला मग तर काय प्रश्नच नको.
हे बाकी लाख बोल्लात !! बाकी ते सूड आणि बदलापूर आहे. पुढल्या वेळी लिहीताना लक्षात ठेवा म्हणजे झालं. ;)
28 Jan 2014 - 9:05 am | यशोधरा
आयडी राहिलं रे. ;)
29 Jan 2014 - 1:00 am | कवितानागेश
आणि शिवाया काय खिरीत घालायच्या का??
29 Jan 2014 - 9:19 am | यशोधरा
झालं! केली का खिरीची आठवण! बनवून आण आता माझ्यासाठी! ;)
28 Jan 2014 - 12:09 pm | अत्रुप्त आत्मा
आलेच नाहीत ते,ज्यांच्यावर केली कविता
मूळ-पात्रच नाट्यात (येत) नाही..या हो या! तोंड का लपविता??? =))
28 Jan 2014 - 3:22 pm | बॅटमॅन
=))
29 Jan 2014 - 1:52 pm | अत्रुप्त आत्मा
29 Jan 2014 - 12:55 pm | नंदन
मस्तच!
29 Jan 2014 - 1:28 pm | चौकटराजा
बरेच विंगलीश पिच्चर पायल्यान आमाला स्वय लागली काय कळ्ळं नाय तरी हासायची ! म्हून हा हा हा खी: खी: !!
हा पिच्चर आमाला काय कळला नाय पन यितर हासत्यात मंग आपल्याला बी हासाय पायजेल !