सैनिक

अमेय६३७७'s picture
अमेय६३७७ in जे न देखे रवी...
13 Jan 2014 - 8:13 pm

शाळा संपल्यावरही केबिनमध्ये 
दिवा जळता ठेवून 
योजना आखत राहणारे मुख्याध्यापक 

कलत्या दिवसावेळी दमून येऊनही
'पुस्तक हवे' म्हणल्यावर 
उत्साहाने सायकल काढणारे बाबा 

तापाने फणफणत असूनही 
थंडीत चार वाजता उठून 
अभ्यासाआधी चहा देणारी आई

स्वत:ची दिवाळी मनाआड टाकून 
माझ्यासारख्या अनेकांना 
उत्सवासाठी घरी नेणारा एसटीचालक

महायुद्धाच्या पटावरचे लक्षावधी छोटे सैनिक 
कदाचित असेच असतील नाही?… 
जीव विझू आला तरीही 
शेवटच्या श्वासापर्यंत…. 
मनापासून कर्तव्य बजावणारे ! 

-- अमेय

कविता

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

13 Jan 2014 - 10:17 pm | मुक्त विहारि

छान

कवितानागेश's picture

13 Jan 2014 - 11:11 pm | कवितानागेश

हम्म...

चाणक्य's picture

14 Jan 2014 - 6:56 am | चाणक्य

छान आहे. फक्त जरा घाई केल्यासारखी वाटलं. जरा फिनिशिंग टच द्यायला पाहिजे होता काय?

पैसा's picture

21 Jan 2014 - 2:44 pm | पैसा

कविता आवडली