तुमको देखा तो ये खयाल आया …

निमिष ध.'s picture
निमिष ध. in जनातलं, मनातलं
28 Dec 2013 - 10:25 pm

एक गरीब मध्यममार्गी विद्यार्थी, आपले एम ए चे शिक्षण घेणारा. छंद म्हणून शायरी करणारा. आपल्या घरापासून दूर कॉलेज असणाऱ्या शहरात राहणारा. नेहमी चहासाठी कॅन्टीन मध्ये दोस्तांबरोबर गप्पा मारत बसणारा. त्या नायाकामध्ये आणि आमच्यात खूप साधर्म्य होते कॉलेज जीवनात त्यामुळे की काय पण इतर बी ए पास आणि नुसत्या गाड्या उडवणाऱ्या हिंदी चित्रपट नायकांपेक्षा तो खूप जवळचा वाटायचा. जरी त्याच्या चित्रपटांत आणि आमच्या कॉलेज जीवनात एक-दीड पिढीचे अंतर होते तरीही तो जणू आपले प्रतिनिधित्व करतो आहे हे पाहून बरे वाटायचे. असा नायक साकारला होता फारुख शेख नी.

मुंबई मधील एका वकिलाचा तरुण मुलगा ज्याने स्वतः कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि वकिली सुरु केली. पण त्या काज्ज्या खटल्यांमध्ये याचे कलाकारी मन काही रमेना. कॉलेज जीवनात भरपूर नाटके केल्यामुळे तशा ओळखी होत्या आणि अनुभवही होता. त्या अनुभवावर त्याला 'गर्म हवा' मध्ये एक पात्र मिळाले. त्या चित्रपटातील त्याचा अनुभव पाहून सत्यजीत रायनी त्याला त्यांच्या 'शतरंज के खिलाडी' मध्ये घेतले. ज्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये समांतर चित्रपट चळवळ सुरु होती तो त्याचा उदयाचा काळ ठरला.

त्यानी ७० आणि ८० च्या दशकांत बरेच सामान्य माणसाला जवळचे वाटणारे चित्रपट केले त्यात आम्हाला तो जवळचा वाटला तो 'साथ साथ' मध्ये आणि 'चष्मेबद्दूर' मध्ये. यापैकी साथ साथ मध्ये त्यांनी लग्नानंतर जवाबदारीने माणूस कसा बदलतो आणि मग त्याला त्याची हाव अजून खाली खेटते हे अत्यंत परिणामकारक रीतीने दाखवले. चष्मेबद्दूर मध्ये तीन कॉलेज कुमार असताना हा त्यातला एक साधा सरळ सज्जन मुलगा होता. मुलीला भेटल्यानंतरचा सुरवातीचा नवखेपणा आणि नंतर भांडणानंतरचे नैराश्य त्याने उत्तमरीतीने साकारले. त्याची खर्या जीवनातील सहचारिणी त्याला कॉलेज मध्ये नाटकातच भेटली त्यामुळे बहुतेक त्याला ते साकारणे अवघड गेले नाही.

नंतरच्या काळातही तो सतत कार्यमग्न राहिला. 'जी मंत्रीजी' ही मंत्री आणि त्यांच्या सचिवांवर आधारित विनोदी मालिका केली. त्याचबरोबर 'जीना इसिका नाम हैं' हा मुलाखतींचा कार्यक्रम ही केला. २००९ मध्येच त्याला 'लाहोर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. त्यामुळे तो अजूनही उमेदीतच होता असे मी म्हणेन. त्याचे असे अचानक जाणे म्हणजे आपल्या कॉलेज जीवनातील एक मित्र सोडून जाण्यासारखे वाटते आहे.

त्याचे गाणे ...

तुमको देखा ..

कलाप्रकटन

प्रतिक्रिया

फारूक शेख़ यांना श्रद्धांजली.

काही नटांत माणूस स्वतःला शोधायला जातो. हा त्यांच्यापैकी एक होता.

मैत्र's picture

29 Dec 2013 - 9:40 pm | मैत्र

आणि त्यामुळेच काहीतरी हरवल्याची / रितेपणाची भावना आहे..

मारवा's picture

29 Dec 2013 - 7:43 pm | मारवा

अगदी माझ्या मनातलं बोललात !
फारुक शेख ला कधी विसरु शकणार नाही खास करुन त्याच्या तहजीब साठी !

जेपी's picture

29 Dec 2013 - 8:14 pm | जेपी

फारुख शेख यांचे चित्रपट फारशे पाहिले नाहित पण सिरीयल्स बघीतल्या आहेत . त्यांच्या ' जी मंत्रीजी ', 'जीना इसीका नाम हे ' , एक फराह खान सोबतची आणी एक बहिर्याची (नाव आठवत नाही )
जाम आवडत होती .

जुइ's picture

30 Dec 2013 - 7:52 am | जुइ

फारुख शेख यांना श्रद्धांजली. त्यांचा साथ साथ चित्रपट खुप आवडला.

सुहास झेले's picture

30 Dec 2013 - 1:37 pm | सुहास झेले

मनापासून आदरांजली... !!

ह्यावर्षी आलेला ये जवानी हैं दिवानी मधला त्यांचा छोटासा रोल पण पार चटका लावून गेला. एका लहरी मुलाचा बाप अगदी सहजरीत्या पडद्यावर उभा केलेला !!

इरसाल's picture

30 Dec 2013 - 1:48 pm | इरसाल

चमत्कार
त्यात फारुखला बहिरा दाखवला होता.
जाम भारी सिरीयल होती.