गाभा:
लेखाची प्रेरणा....http://misalpav.com/node/26546
१. मोठे झालो की, नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते.
२. लग्न झाले, की बायको पाय चेपते,डोक्याचे मॉलीश करते.
३. ताजा पेपर वाचायला मिळतो.
आणि सगळ्यात महत्वाचे...
४. रविवारी सकाळी ११ पर्यंत झोपायला मिळते.
(अतिसामान्य माणूस असल्याने, ह्यापेक्षा जास्त काही मागणे न्हवते हो..पण....जावू दे...घरोघर तीच कहाणी आणि तेच रडगाणे)
प्रतिक्रिया
26 Dec 2013 - 4:27 pm | प्रकाश घाटपांडे
आपल्याला या अंधश्रद्धा जगायला मिळो ही शुभेच्छा!
26 Dec 2013 - 4:45 pm | ज्ञानव
अंधश्रद्धा..... बळी द्या काही तरी....साडी,गाडी, बंगला वगैरे
26 Dec 2013 - 4:57 pm | arunjoshi123
मागच्या काळातल्या समाजव्यवस्थेत जॉबगॅरंटी होती. आज तुम्ही चार वर्षांनी काय करत असाल तेच सांगता येत नाही, मुल काय करेल आणि कुठे असेल ते तर नाहीच नाही. तरीही आजची व्यवस्था 'याही निकषावर' श्रेष्ठ!
26 Dec 2013 - 5:19 pm | परिंदा
अजुन एक अंधश्रद्धा!
नोकरी लागली की ऑफिसला सकाळी ९ ला जायचे आणि संध्याकाळी ६ ला घरी यायचे. एवढे केले तरी पगार मिळतो.
26 Dec 2013 - 6:09 pm | पैसा
सौ. मुवि बरेच दिवसांत मिपावर आलेल्या दिसल्या नाहीत! आणू का बोलावून?
26 Dec 2013 - 7:51 pm | यसवायजी
अजुन १ अंधश्रद्धा- लोकशाही.
26 Dec 2013 - 9:08 pm | जयनीत
असल्या गोड अंधश्रद्धांचे निर्मुलन आपोआपच का होते ह्यावर वैज्ञानिक संशोधन कर्नारा हाय का रं कुनी मायचा लाल?
26 Dec 2013 - 11:20 pm | अत्रुप्त आत्मा
मुळात हा धागा हीच १ अंधःश्रद्धा आहे. =))
26 Dec 2013 - 11:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
१. मोठे झालो की, नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते.
हे चुकून१. मोठे झालो की, सरकारी नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते.
असे वाचले :)
27 Dec 2013 - 9:56 am | आनंद घारे
कशी कोणास ठाऊक पण मिपावरील मंडळी माझे लिखाण वाचतात अशी एक अंधश्रद्धा माझ्या मनात उत्पन्न झाली होती. तिचे निर्मूलन व्हायला फारसा वेळ लागला नाही.
27 Dec 2013 - 10:14 am | धन्या
अफलातून प्रतिक्रिया काका. स्वतःवर हसायला धाडस लागतं. :)
27 Dec 2013 - 6:45 pm | राही
प्रतिसाद आणि उपप्रतिसाद दोन्ही आवडले.
27 Dec 2013 - 10:19 am | सुबोध खरे
मोठा झालो सरकारी नोकरी पण लागली पण हवे तेंव्हा खायला मिळाले नाही( भर समुद्रात कसले हो काय? मेस मध्ये खाल्लेले पोटात टिकले तर नशीब ).
लग्न झाले पण बायको पाय चेपते , डोक्याचे मॉलीश करते हे घडू शकतं ? यावर मुळात विश्वास नव्हताच
27 Dec 2013 - 11:01 am | खटपट्या
सुंदर, गृहकृत्यदक्ष, आपले नेहमी ऐकणारी बायको - एक तुफान घोर अंधश्रद्धा
27 Dec 2013 - 11:24 am | स्पा
काय मूवी
खरच वेळ जात नाहीये का ?
27 Dec 2013 - 12:02 pm | विश्वनाथ मेहेंदळे
होय ना, खरेच वेळ जात नसेल तर काहीतरी constructive करा. उदा, दोन चार डु आयडी काढा, धागे कसले काढताय?
27 Dec 2013 - 6:26 pm | चौकटराजा
आमची एक - डोंबिवलीकर एकजात प्रेमळ असतात.
27 Dec 2013 - 6:48 pm | बॅटमॅन
ऊठसूट इतरांवर जळणार्यांकडून इनो घेण्याची अपेक्षा करणे.
27 Dec 2013 - 9:03 pm | जेपी
मिपावर स्वंतत्र पुरुष विभाग होईल .
27 Dec 2013 - 9:06 pm | आदूबाळ
अप्रायजल डिस्कशन आणि पगारवाढ/बोनस यात काही संबंध असतो.
27 Dec 2013 - 11:23 pm | arunjoshi123
निसर्ग सम्यक नाही. नशिब म्हणून आहोत नि जगताहोत.
28 Dec 2013 - 7:31 am | इन्दुसुता
वर स्पा आणि विमेंनी विचारलेच आहे... मुवि वेळ जात नाहीये का...
जा बघू आणि सौ. मुविंचे पाय चेपून द्या, डोके चेपून द्या, केस विंचरुन द्या.... तुमच्या अंधश्रद्धा असतिल हो, त्यांच्या कुठायेत? :)