पुन्हा सुखे परतून न येती पानांवर जैसे दंव मोती
ओघळल्या स्वप्नांचे अंती व्रण कांचेचे उरती
परा शरांचे ढंग निराळे छटा उमलुनिया वावरती
विमल कोवळे पराग गंधित माल्य फुलांवर लवलवती
परम अलौकिक सण नियतीचे दरवळती वाटेवरती
क्षणभंगुर वैभव हे पण अस्वाद कुणी घेती ना घेती
पसा असू दे याचकसम आमंत्रक सदा नयन भरती
आसपास चिर अनंत कोटी अमृतमय कण भिरभिरती
धुंद सरोवर कुंद सभोवर शकुनांचे मेणे अवती
माया ईश वराची अवघी चराचरावर ओघवती
……………… अज्ञात