कविता माझी वाच, कथा माझी वाच
लेख नक्की वाच, लेखकु म्हणे
आपुली जी रिक्षा, दुसर्याची ती भिक्षा
जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी
ध्यान असता सुंदर, लेखनास मान निरंतर
टीका वाटे जंतरमंतर, लेखकासि
आव पिडीताचा, सात्विक संतापाचा
वळवी ओघ सहानुभूतीचा, लेखकु तो
वाढुनी ठेवता ताट, स्तुती करतो भाट
इतरांची लावू वाट, दिसता क्षणी
ओलावले डोळे, भारावले मन
शब्द की ग्लिसरीन, वाचकु म्हणे
दर तेरावा प्रतिसाद, देई धन्यवाद
वर आणण्याचा नाद, लेखनाला
इकडेतिकडे देतो कान, पाहुनी इतरांचा सन्मान
काढी फेसबुकी पान, स्वत:चे
नित्य गुळ लावित, झाला अखेर प्रस्थापित
सदैव तरी दिवाभीत, लेखकु हा ||
-----------------------------------------------
नारबाची वाडी पाहून नारो म्हणेच्या धर्तीवर लिहायचे होते.
अचानक लिहीता लिहीता हेच लिहून झाले.
ही काहीच्या काही कविता आहे. त्याच अर्थाने घ्यावी.
कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही. धन्यवाद.
-----------------------------------------------
प्रतिक्रिया
18 Dec 2013 - 6:08 pm | पैसा
मस्त आहे!! लेखकांना इम्युनिटी असलीच पायजे!!! ;)
18 Dec 2013 - 6:44 pm | जेपी
आवडल .
18 Dec 2013 - 7:31 pm | चाणक्य
जमलय की चांगलच
18 Dec 2013 - 10:11 pm | मुक्त विहारि
आवडले..
18 Dec 2013 - 10:44 pm | कवितानागेश
हे हे हे!