दिवा आणि ती

अमेय६३७७'s picture
अमेय६३७७ in जे न देखे रवी...
11 Dec 2013 - 4:15 pm

सजतानाही थिजलेली ती 
रोज मनाचे द्वंद्व मनाशी 
भिंतीवरती बापुडवाणा 
दिवा एकटा जळे स्वतःशी 

बोथटलेली जुनी वेदना 
जशी काजळी दिसे दिव्याची
जळता अवचित विझून जाणे 
हीच वंचना जन्मभराची 

अशा तमातुन प्रकाश कोठे 
कुणी कुणाचा ना कैवारी
दिवा जळो वा शील, सुखाचे   
मोल सारखे त्या बाजारी 

तिजला ठावे दैव स्वतःचे 
आयुष्याच्या सरत्या वाती  
जोवर आहे तेल वाहते 
दाह सोसणे उरले हाती 

-- अमेय

कविता

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

11 Dec 2013 - 4:51 pm | कवितानागेश

नेमक्या शब्दातली अभिव्यक्ती. .... बोचतेय. :(

सांजसंध्या's picture

14 Dec 2013 - 12:53 am | सांजसंध्या

+१
आवडेश.

राघव's picture

11 Dec 2013 - 7:45 pm | राघव

खूप सुंदर लेखन. येऊ देत अजून.

अवांतरः

छळ मांडलाय या माणसानं.. अरे किती भिडणारं लिहिशील?
तू कविता करून मोकळा आणि आम्ही विचार करून सर्द! :)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Dec 2013 - 2:44 pm | अत्रुप्त आत्मा

राघवाशी पूर्ण सहमत!

@छळ मांडलाय या माणसानं.. अरे किती भिडणारं लिहिशील?
तू कविता करून मोकळा आणि आम्ही विचार करून सर्द! Smile >>> तंतोतंत!

नेहमीप्रमाणेच सुरेख आणि लयबद्ध!!

आदूबाळ's picture

12 Dec 2013 - 12:35 pm | आदूबाळ

काय छान कविता!

आतिवास's picture

12 Dec 2013 - 2:52 pm | आतिवास

हळवा मूड आणि जगण्याची अपरिहार्यता अचूक व्यक्त करणारे शब्द ....

प्यारे१'s picture

12 Dec 2013 - 9:48 pm | प्यारे१

जबरदस्त!

भावना थेट काळजात नेऊन भिडवतो हा माणूस. टोपी काढली आहे.

लीमाउजेट शी संपूर्ण सहमत

प्रसाद गोडबोले's picture

13 Dec 2013 - 3:59 pm | प्रसाद गोडबोले

अमेयराव , सुंदर कविता लिहित आहात आपण !!

अप्रतिम !!

संजय क्षीरसागर's picture

13 Dec 2013 - 5:38 pm | संजय क्षीरसागर

कमी शब्दात कमाल आशय व्यक्त केलायंस!

सुधीर's picture

13 Dec 2013 - 10:16 pm | सुधीर

_/\_

पैसा's picture

13 Dec 2013 - 10:26 pm | पैसा

अचूक शब्दात व्यक्त केलेलं दाहक वास्तव!

यशोधरा's picture

13 Dec 2013 - 10:47 pm | यशोधरा

वा!