जरा सांगा कुठे जाऊ !

आनंदराव's picture
आनंदराव in भटकंती
9 Dec 2013 - 10:25 pm

मित्रनो आणि मैत्रिनिनो ,
४ दिवस मी आणि बायको फिरायला जाईन म्हणतोय. लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय हो.
आम्हाला स्वताच्या गाडीने फिरण्याची फार हौस अहे. ( खाज?)
आणि कोकण किनारपट्टी ला आमचे जाऊन झाले अहे. कोस्टल कर्नाटक पण झाले अहे. केरळ ४ दिवसात जाऊन होणार नहि. आणि कोलकत्ता वगैरे तर फारच लांब हो. म्हणजे आम्हाला कसे पाहिजे कि ट्रीप तर ४ दिवसाचीच झाली पाहिजे, पण ठिकाण पण बघून झाले पहिजे.
मध्य प्रदेश - म्हणजे इंदोर वगैरे ….
काय ?
जरा कुठे जाऊ ते ठरवायला मदत करा कि.
हक्काची विनंती आहे तुम्हाला .

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

9 Dec 2013 - 10:59 pm | मुक्त विहारि

जमल्यास खालील लिंक बघा.

http://misalpav.com/bhatkanti.html

इथे तुम्हाला काहीतरी नक्की मिळेल.

आनंदराव's picture

9 Dec 2013 - 11:06 pm | आनंदराव

बघितली . पण जमत नाही . म्हणून तर मदत मागतोय

आनंदराव's picture

9 Dec 2013 - 11:07 pm | आनंदराव

पुण्यात राहतो

मिनेश's picture

10 Dec 2013 - 9:06 am | मिनेश

बांधवगड चांगला पर्याय आहे.....मध्य प्रदेशात....

प्रभाकर पेठकर's picture

10 Dec 2013 - 11:45 am | प्रभाकर पेठकर

मस्तं थंडी आहे. महाबळेश्वर बेष्ट.

प्रसाद गोडबोले's picture

10 Dec 2013 - 3:04 pm | प्रसाद गोडबोले

+१

इथे सातार्‍यातच लई भारी थंडी आहे ...महाबलेश्वरात तर मज्जाच असेल आणि ४ दिवस असतील तर सगळे पॉईट्स ही नीट फिरुन पाहता येतील :)

मुक्त विहारि's picture

10 Dec 2013 - 12:07 pm | मुक्त विहारि

संभाजीनगर पासून ३ ठिकाणे करता येतात.

१. देवगिरी किल्ला आणि वेरूळची लेणी, ही एका दिवसात करता येतात.

२. संभाजी नगर मधली पाणचक्की.

३. अजंठा

४. शिवाय जवळच पैठण पण आहेच (आता लग्नाचा वाढदिवस आहे तर जरा पैठणला जावून या...होवू दे खर्च...)

अजून माहिती हवी असल्यास खालील लिंक बघा.

http://misalpav.com/comment/reply/25828/514423

नितीन पाठक's picture

10 Dec 2013 - 12:45 pm | नितीन पाठक

संभाजीनगर च्या जवळ आणखी देवगड (भगवान श्री गुरूदेव दत्तांचे अतिशय चांगले स्थान आहे. मंदिर सुरेख आहे. शांतता आहे.), शनिशिंगणापूर सुध्दा पाहता येईल. शिर्डी येतील साईबाबांचे दर्शन होउ शकते.

मुक्त विहारि's picture

10 Dec 2013 - 12:59 pm | मुक्त विहारि

की "देवगड" पण नक्की करीन.

मुक्त विहारि's picture

10 Dec 2013 - 12:57 pm | मुक्त विहारि

संभाजी नगरला आणि वेरूळ-अजिंठा करायचे असल्यास, वल्ली यांचा सल्ला जरूर घ्या.त्यांच्या इतकी माहिती फार कमी लोकांकडे असते.

(तसेही, वल्ली यांच्याकडून माहिती घेतल्या शिवाय प्रवासाला निघू नये.)

त्रिवेणी's picture

10 Dec 2013 - 3:09 pm | त्रिवेणी

तसेही, वल्ली यांच्याकडून माहिती घेतल्या शिवाय प्रवासाला निघू नये.>>>>+1
आणि ते लगेच मार्गदर्शनही करतात. मी पाटेश्वरला गेले होते त्यांचा पाटेश्वरवरील धागा वाचुन. तेव्हा त्यांना विचारले असता त्यांनी लगेच सर्व मार्गदर्शन केले होते.

मी-सौरभ's picture

11 Dec 2013 - 7:34 pm | मी-सौरभ

मिपाकरांचा दावा आहे. वल्ली भाऊ ** आहे

प्यारे१'s picture

12 Dec 2013 - 1:10 am | प्यारे१

छावा, रावा, गवा, भावा असे अनेक शब्द आठवले. :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Dec 2013 - 2:57 pm | राजेंद्र मेहेंदळे

>>> कोकण किनारपट्टी ला आमचे जाऊन झाले आहे>>> किनारपट्टी म्हणजे गणपतीपुळे आणि रत्नागिरी हेच असेल तर अजुन बरेच काही पाहायचे बाकी आहे कोकणात.

उदा. पुण्याहुन मुळशी ताम्हीणीमार्गे किंवा भोर-वरंधामार्गे किंवा कराड-पाटण्-कोयनानगर मार्गे कोकणात उतरा..चिपळुण बघुन पुढे दापोलीस जा. तिथे मुक्काम करा. दुसर्‍या दिवशी हर्णे-मुरुड (महर्षी कर्वे यांचे गाव) बघा. देवीचे सुंदर मंदीर,शांत समुद्र किनारा पहा. गारंबीच्या बापुची गारंबी पहा,आसुदचे केशवराज मंदीर,पन्हाळेकाजी लेणी,साने गुरुजींचे गाव बुरोंडी, लाटघरचे तामस्तीर्थ,दापोली कृषी विद्यापीठ्,आंजर्लेचा कड्यावरचा गणपती हे सगळे बघताना ४ दिवस कुठेच निघुन जातील.

मनिम्याऊ's picture

10 Dec 2013 - 3:15 pm | मनिम्याऊ

अगदी 'चारच' दिवस हातात असतील तर उडिशा/ ओडिसा जमतय का बघा. अत्यंत सुंदर आणि बराच स्वस्त असा हा प्रदेश आहे. भुवनेश्वरला मुककाम केलात तर कोणार्क, जगन्नाथपुरी, चिल्का सरोवर, कॅलिंग बौद्ध मंदिर, खन्डगिरी वग़ैरे बरीच प्रेक्षणीय स्थळे करता येतील.
मांसाहारी असाल तर चिल्का सरोवरातील ताजे चाविष्ट मासे खेकड़े अत्यंत स्वस्तात काठावरील होटेलमधे बनवून मिळतात. .
एकन्दरीत चार दिवसात परफ़ेक्ट बसणारी ट्रीप आहे ही.

मुक्त विहारि's picture

10 Dec 2013 - 3:51 pm | मुक्त विहारि

अंमळ कठीणच वाटत आहे.

रेफरन्स....(http://misalpav.com/node/25890)

(च्यायला ह्या बंड्यामुळे आम्ही भलतेच बिघडलो.)

आनंदराव's picture

10 Dec 2013 - 10:07 pm | आनंदराव

धन्यावाद आप्ल्या प्रतिसादान्बद्दल !

मृत्युन्जय's picture

10 Dec 2013 - 11:11 pm | मृत्युन्जय

दापोलीला जाउन ये की, लाडघर बीच रिसोर्टला रहायचे. एक दिवस वॉटर स्पॉर्ट्स खेळता येतील. एक दिवस असाच बीच वर. एक दिवस आसूदचे केशवराज मंदिर. एकदिवस आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती आणि तरीही वेळ उरलाच तर परत बीच आहेच,

आनंदराव's picture

10 Dec 2013 - 11:19 pm | आनंदराव

हे सगले बघुन झाले आहे. दिवेआगार पासुन ते शिरोदा ( वेन्गुर्ला) . सगले झाले आहे.

कपिलमुनी's picture

10 Dec 2013 - 11:21 pm | कपिलमुनी

dusara vicharch kashala ?

सुबोध खरे's picture

10 Dec 2013 - 11:32 pm | सुबोध खरे

+ १११११११११११११११११११११११११११११११११११
हिवाळ्यात बायको बरोबर गोवा. ते सोडून दुसरी जागा? विचार करूच नका

आनंदराव's picture

10 Dec 2013 - 11:26 pm | आनंदराव

कपिल्मुनि नाक्कि तुम्हाला काय म्हानाय्चे आहे?

ते तुम्हाला गोव्याला जाण्यास सुचवत आहेत. बघा पटते का?

विजुभाऊ's picture

11 Dec 2013 - 12:07 am | विजुभाऊ

हे सगळे करण्यापेक्षा सरळ आपण आत राहुन घराला बाहेरुन कुलूप घालून घ्यावे. शेजार्‍याना बाहेर चाललोय घराकडे लक्ष्य ठेवा म्हणून सांगावे. चार दिवस कुण्णी कुण्णी म्हणुन डिस्टर्ब करणार नाही..

प्रभाकर पेठकर's picture

11 Dec 2013 - 1:42 am | प्रभाकर पेठकर

शिवाय कोणी घरात नाही समजून एखादा चोर घरात शिरलाच तर त्याला रंगेहाथ पकडता येईल. (फक्त तो तुम्हाला रंगेहाथ पकडत नाही एवढी काळजी घ्यायची).

रुस्तम's picture

11 Dec 2013 - 3:02 am | रुस्तम

=)) :) =))

अरे चोरांनो असा प्रकार करता काय?

आनंदराव's picture

11 Dec 2013 - 8:22 am | आनंदराव

ख्या ख्या ख्या ;)

१)पुण्याहून कारने नाशिक धुळे मार्गे मांडू -माहेशवर -ओंकारेश्वर खांडवा मार्गे परत अंदाजे पंधराशे किमी होते .या जागा चांगल्या आहेत .
इंदौर आणखी दोनशे .उजैन थोडे खराब झाले आहे .

माहेश्वरला फक्त थंडीत मोठाले पौष्टिक लाडू (सहा प्रकारचे ) मिळतात .
इंदुरची रबडि अधिक बुंदी खास .बाफेला लड़डू याने डालबाटी आहेच .

या ट्रिपमध्ये मजा येईल .एक शहर +ऐतिहासिक +धार्मिक +विरंगुळा +खाणे
आहे .शिवाय वारंवार गेलो तरी कंटाळा येत नाही .चांगल्या मूडमध्ये आणतात .

२)हैदराबाद अधिक वारंगळ .

३)सोलापूर -विजापूर- बदामि -ऐहोळे -इल्कल मार्गे होस्पेट(=हम्पि)- लखुंडि -हुबळी ,धारवाड ,कोल्हापूरमार्गे परत .

वरील ठिकाणांच्या रस्ते आणि अंतरांची /लागणाऱ्या वेळेची खात्री करून घ्या कारण मला रेल्वेचे माहित आहे .

नीलकांत's picture

11 Dec 2013 - 6:54 pm | नीलकांत

इंदोर, उज्जैन, मांडवगड, महेश्वर, जमल्यास ओंकारेश्वर असा चार दिवसांचा छान प्रवास होऊ शकतो. सध्या थंडीमुळे इंदोर शहरात खाण्यापिण्याची मौज असते. तिळापासून बनलेल्या गजकची दुकाने चौका चौकात लागलेली असतात. फक्त इंदोर बघण्यासाठी एक दिवस लागेल.
एक दिवस मांडवगड व महेश्वरसाठी लागेल
उज्जैनला धार्मीक महत्व खुप आहे. एक दिवस सहज जाईल.

- नीलकांत

जानेवारी दुसरा आठवडा शक्य असेल तर गुजरातला जावा...

"उत्तरायण"

गुजरातमधली संक्रांत अनुभवण्यासारखी असते. इंटरनॅशनल काईट फेस्टीवल याच वेळी असतो. बुकींग आणि प्रवास आधी प्लॅन करावा लागतो. आत्ताही तसा उशीरच झाला आहे परंतु ट्राय करायला हरकत नाही

तेथे राहणारी एखादी गुजराथी फॅमीली ओळखीची असेल तर आणखी मजा!!

आनंदराव's picture

12 Dec 2013 - 8:03 am | आनंदराव

कन्जुस, नीलकान्त ,मोदाक - जाहीर आभार !

कंजूस's picture

12 Dec 2013 - 8:24 am | कंजूस

गमती जमती लिहा .

पहाटवारा's picture

12 Dec 2013 - 8:53 am | पहाटवारा

लोनावळा खंडाळा .. कोल्हापूर्चा पन्हाळा .. बेंग्लुर गोवा नी काश्मीर ला ..
कुठं कुठं जायाचं ....

देशपांडे विनायक's picture

12 Dec 2013 - 9:21 am | देशपांडे विनायक

' लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय हो.''
कितवा ?
म्हणजे किती '' मोकाट '' सुटावयाचे आहे ?

सुहास..'s picture

12 Dec 2013 - 4:49 pm | सुहास..

मराठवाड्याकडे गेलात तर :)

http://misalpav.com/node/20637

टीप : सदरहु लिंक आमच्या लेखनाची जाहीरात नसुन , सल्ला आहे , वरील स्पॉट सोबत , गौताळा अभयारण्य आणि पितळ खोरा लेणी करता येतात :)

धन्यवाद ..

कपिलमुनी's picture

24 Dec 2013 - 6:00 pm | कपिलमुनी

जरा कुठे जाऊ ते ठरवायला मदत करा कि.
हक्काची विनंती आहे तुम्हाला .

मिपाकरांचा ( फुकाचा) सल्ला घेतलात ओ !
पण गेला का नाही कुठे ?

नाही ओ नाही. असे नका म्हणू हो.
जाउन आलोय. पण लिहायला वेळच झाला नाहीये.
थोडा वेळ द्या.

वेल्लाभट's picture

28 Dec 2013 - 1:00 pm | वेल्लाभट

कोल्हापूर ला जाऊन या....
मी आत्ताच गेलेलो फिरायला. Detailed व्रुत्तांत लिहीनच ४ दिवसात

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Jan 2014 - 8:16 am | कैलासवासी सोन्याबापु

कुठे गेला नसाल अजुन तर मध्यप्रदेशात "पचमढी" ला जावा देवा!!!!, निव्वळ अप्रतिम जागा!!!, पांडव गुफा, बी फॉल, डचेस फॉल, बायसन लॉज बायलॉजिकल म्युझियम, बडा महादेव इत्यादी ठीकाणं आहे, प्रस्थापित थंड हवे चे ठीकाण असल्याच्याने सोई सुविधा पण उत्तम आहेत. आवडेल आपणास

कबीरा's picture

10 Jan 2014 - 7:07 pm | कबीरा

नाशिक ला भेट देऊन पुढे सापुतारा पर्वतरांग बघा… उत्तम trip होईल