कारवार- दांडेली भाग-२

पुतळाचैतन्याचा's picture
पुतळाचैतन्याचा in भटकंती
19 Nov 2013 - 3:27 pm

पहिल्या भागाच्या प्रतिसादानुसार जास्त वर्णन करायचा प्रयत्न केला आहे.
कारवार च्या समुद्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. असेच एका कोळियाने टाकलेल्या जाळ्यात काय काय घावलय बघूया:
Beach

Fish

Crab
Snake
इथे दिसणारा खेकडा हा प्रेग्नंट आहे असे कोळ्याने सांगितले. लाल भाग हा बीज दर्शवतो. या नंतर सहल संपली आणि विशेष काही बघायचे राहिले नाही अशी समजूत करून परत निघालो. परत येताना मुद्दाम येल्लापूर मार्गे न येता दांडेली चा रस्ता पकडला. फार पूर्वी लोकांकडून वर्णन ऐकले होते कि दांडेलीच्या जंगलात असा बराच भाग आहे जिथे सूर्यकिरण जमिनी पर्यंत पोचू शकत नाहीत. कारवार गाव सोडून दांडेलीचा रस्ता पकडला कि हळू हळू जंगल दाट होऊ लागते आणि घाटाला सुरुवात होते. जंगल इतके दाट होते कि फोटो पण काढता येत नाहीत पण या जंगलात कर्नाटक सरकार ने जागोजागी चौथरे उभे करून सिनिक स्पॉट बघायची सोय केली आहे. फक्त या स्पॉटला थांबले तरच लांबचे दिसू शकते अन्यथा जंगलात ५-५० फुटाच्या पलीकडे काही दिसत नाही.
जन्गलाचा दाट्नेस् :
Jungle

Jungle
या जंगलाचे २ भाग पडतात. पहिला अंशी नेशनल पार्क आणि दुसरा दांडेली अभयारण्य. गूगल नकाशा मध्ये गोव्याच्या बाजूला जे घनदाट जंगल दाखवले आहे त्याचा पश्चिम भाग हा अंशी नेशनल पार्क आहे आणि पूर्वेचा भागात दांडेली आहे. अंशी चे जंगल अतिशय दाट आहे. त्या मानाने दांडेली मध्ये घनता कमी आहे म्हणून सगळे जंगल कॅम्प हे दांडेली मध्ये होतात. माझी १० वि ची परीक्षा झाल्या नंतर दंडेलीचा जंगल कॅम्प केला होता. कोर एरिया मध्ये वाघासकट सगळे जंगली प्राणी नक्की दिसतात. तेव्हा वाघाने एक गवा मारून त्याला एका धबधब्याच्या गाळात रुतवून ठेवला होता आणि साहेब वरच्या दगडावर बसून आम्हाला खास दर्शन देत होते. गव्याच्या मानेतून रक्त पिवून मारला होता बाकी बोडी ला खरचटले सुद्धा नव्हते.
शहाण्या माणसाने अंशी च्या जंगलात जाऊ नये. दुरून डोंगर साजरे करावेत. तसेच संध्याकाळी ६ नंतर गाडीवरून जायचा विचार पण करू नये. इथे किंग कोब्रा पैशा पासरी आहे. वाटेत एक धबधबा लागला म्हणून थांबलो. तिथे उतरायच्या बेतात होतो पण वाटेत नागराज पहुडले होते.
Falls
Snake
वनखात्यची अनेक चेक पोस्त लागतात. या जंगलात आमच्या गाईड ने काळे वाघ पण पहिले आहेत. आंबोली, कोयना मध्येपण काळ्या वाघाचे दर्शन होते. एस. टी वाले रात्री गाडी नेतात म्हणून आपण पण जावे अशी परिस्तिथी नाही. शेवटी जो फोटो पाहून मला या ट्रीप ची भुरळ पडली होती तो स्पॉट आला.
Dam

तिथून पुढे अप्रतिम असे सीन मिळाले.
Jungle
Jungle

पुढे काळी नदीचे विस्तीर्ण पात्र लागले. याचा रंग खरच काळा आहे. मागे स्व. श्री. बाळासाहेब ठाकर्यांच्या एका पुस्तकात या नदीचा उल्लेख होता. यात कोयना नदी पेक्षा जास्त पाणी आहे आणि कारवार-बेळगाव भाग महाराष्ट्रला मिळाल्यास कोयने सारखेच वरदायिनी धरण बांधता येईल असे लिहिले होते. कर्नाटकने हे पाणी पूर्ण वापरले नाहीये असे वाटले. वाटेवरच एका बाजूला कैगा अणुभट्टी कडे जाणारा रस्ता लागतो.
Kali River

एवढ्या मस्त ट्रीप मध्ये काय कमी पडले होते तर पाउस. शेवटी तो हि आला आणि रस्ता भिजवून सलामी देऊन गेला.
Rains
दन्डेलिहुन परत जाताना सरळ बेलगाव मार्गे कोल्हापुरला जाता येते. कराड भागात दान्डेलिचे जन्गल माहित असणारे काहि वाटाडे(गाइड नव्हे "वाटाडे")आहेत. असे लोक बरोबर असतील तरच जन्गल पाहता येते. केवळ गाडितुन फिराल तर जास्त अपेक्शा ठेवु नका.

प्रतिक्रिया

पुतळाचैतन्याचा's picture

19 Nov 2013 - 5:50 pm | पुतळाचैतन्याचा

तिकडे सापाविशयी चे १२ भाग जोरत चालु आहेत. या बिन्-विशारी पाण्-सापा बद्दल माहिती द्यावी.

जिन्क्स's picture

19 Nov 2013 - 10:52 pm | जिन्क्स

मला वाटतं ती/तो धामण आहे. कॉलींग जॅक डॅनियल भाऊ.

रुस्तम's picture

19 Nov 2013 - 11:12 pm | रुस्तम

मस्त...........

हा भागही आवडला .छान फोटो .केवळ रस्त्याने अंशी दांडेली जाणयासाठी परमिट वगैरे घ्यावे लागले का ?

पुतळाचैतन्याचा's picture

20 Nov 2013 - 7:33 pm | पुतळाचैतन्याचा

जन्गलाच्या मधुन सरळ स्टेट हायवे आहे. तिथे काहि परमिट लागत नाही. जन्गलाच्या आत असणार्या मातिच्या रस्त्यावर फिरायला सफारी आहेत. बाहेरुन आलेल्या खाजगि वाहनाचे नियम नक्कि सान्गता येनार नाहित. खाजगि वाहनाना कोर एरिया मधे नक्कि सोड्त नाहीत पण कोर एरिया पर्यन्त जाता यायला हरकत नसावी.

स्पंदना's picture

20 Nov 2013 - 4:39 am | स्पंदना

काळी नदीत व्हाईट वॉटर सर्फींगची सोय आहे. ते नाही केलं तुम्ही?
त्या काळी नदीत खूप सगळ्या मगरी आहेत, पण त्या मासे खाऊन सुस्ताडलेल्या असल्याने जास्त धोकादायक नाहीत.
बाकी "दाटनेस" आवडला.

पुतळाचैतन्याचा's picture

20 Nov 2013 - 7:40 pm | पुतळाचैतन्याचा

एकतर विथ फॅमिली गेल तर करता येत नाही आणि त्या जन्गलाच्या एका बाजुला ही सुविधा आहे जिकडे आम्ही गेलो नाही.

सौंदाळा's picture

20 Nov 2013 - 10:01 am | सौंदाळा

दुसर्‍या फोटोतला माकुळ (स्क्विड्/कलामारी) बघुन तोंडाला पाणी सुटले आहे.
रविवारी स्क्विड रिंग्ज करेन म्हणतो जेवताना ;)
बाकी लेख आणि फोटो छान.

स्पंदना's picture

21 Nov 2013 - 7:40 am | स्पंदना

स्क्विड?
मला चावुन चावुन कंटाळा येतो त्यांना.
म्हणतात खोबर्‍यासारखे लागतात म्हणुन पण मला काय त्याची चव कळली नाही. सिंगापुरात फार असायचे हे हॉटेलच्या जेवणात. नको व्हायच.

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 5:07 pm | बॅटमॅन

वैताग असतो. एकतर चरबट असतात, सारखे चावावे लागतात, शिवाय एक प्रकारचा वास असतो अन चव कै खास आजिबात नसते. एकदाच खाल्ले अन पुन्हा कधी खाणार नै असे मनोमनी ठरवले.

प्रभाकर पेठकर's picture

20 Nov 2013 - 10:46 am | प्रभाकर पेठकर

सुंदर वर्णन आणि छायाचित्रं. निसर्ग आणि मत्स्यप्रेमी असल्याकारणाने ही सहल करायचीच असे पक्के ठरवले आहे.

लय म्हणजे लय म्हणजे लय भारी !!

हा भाग पण मस्त

पैसा's picture

20 Nov 2013 - 8:04 pm | पैसा

हा पण भाग आवडला!

काळे वाघ हे काय प्रकरण असतं??

जिन्क्स's picture

21 Nov 2013 - 8:35 pm | जिन्क्स

काळे वाघ म्हणजे काळे बिबटे (जंगल बूक पुस्तकामधला बघिरा). काळे बिबटे दांडेली परिसरात मुबलक आहेत. कही दिवसांपुर्वी काही ट्रेकर मंडळींना अंबोली परिसरात असलेल्या मनसंतोशगडा वर काळा बिबटा दिसला होता.

http://www.punemirror.in/article/2/2009061420090614041939555d3c3cb0/Black-panther-spotted.html

जिन्क्स's picture

21 Nov 2013 - 8:35 pm | जिन्क्स

काळे वाघ म्हणजे काळे बिबटे (जंगल बूक पुस्तकामधला बघिरा). काळे बिबटे दांडेली परिसरात मुबलक आहेत. कही दिवसांपुर्वी काही ट्रेकर मंडळींना अंबोली परिसरात असलेल्या मनसंतोशगडा वर काळा बिबटा दिसला होता.

http://www.punemirror.in/article/2/2009061420090614041939555d3c3cb0/Black-panther-spotted.html

त्रिवेणी's picture

22 Nov 2013 - 1:11 pm | त्रिवेणी

दोन्ही भाग आवडले.
या दंडेलीच्या रस्त्यावर ट्रॅफिक नाही का जास्त. म्हणजे कमी लोक्स असतील तर काही धोका नाही ना

पुतळाचैतन्याचा's picture

22 Nov 2013 - 1:51 pm | पुतळाचैतन्याचा

ट्रेफीक कमी आहे पण भिती नाही...रात्रीचा भरोसा नाही.