"सहवास"

मनीषा's picture
मनीषा in जे न देखे रवी...
18 Jul 2008 - 3:42 pm

आयुष्याच्या रखरखीत वाळवंटात
एक ओऍसिस...... तुझा सहवास

तु आहेस चराचरामधे
तु आहेस कणाकणामधे

ता-यांतून पाहतो आहेस
वा-यातून जाणतो आहेस

पृथ्वीवर आहे तुझीच छाया
माझ्यातल्या 'मी' मधे सुध्धा...
तुच आहेस

अनंत काळाचा सोबती...
अजुनही चालतोच आहे

वादळे उठली.....
शांतही झाली
कितींची संगत सुटली
किती नाती तुटली

कोसळणा-या विश्वासाला
सावरत चालताना....

झाकोळलेल्या काळोख्या रात्री
वाट शोधताना...

सोबत आहे माझ्या
एक अश्वासक दिलासा....
तुझा सहवास......
फक्त तुझा सहवास

मुक्तक

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

18 Jul 2008 - 3:49 pm | अनिल हटेला

सोबत आहे माझ्या
एक अश्वासक दिलासा....
तुझा सहवास......
फक्त तुझा सहवास

छान लिहिलये ....

पन अस काय वाचल की .

स्वत :च एकटेपण खायला उठत....

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

आनंदयात्री's picture

18 Jul 2008 - 4:25 pm | आनंदयात्री

कविता छानच केलिये मनिषा.
कवितेत ज्याचा सहवास असे अभिप्रेत आहे तो म्हणजे परमेश्वर का ?

मनीषा's picture

19 Jul 2008 - 12:01 pm | मनीषा

मला तरी तोच अर्थ अभिप्रेत होता..

शितल's picture

18 Jul 2008 - 4:26 pm | शितल

कविता आवडली.

विसोबा खेचर's picture

18 Jul 2008 - 5:37 pm | विसोबा खेचर

सोबत आहे माझ्या
एक अश्वासक दिलासा....
तुझा सहवास......
फक्त तुझा सहवास

अतिशय सुरेख कविता...!

अभिनंदन..., अजूनही असेच उत्तम काव्य येऊ द्या!

तात्या.

बाजीरावाची मस्तानी's picture

18 Jul 2008 - 5:54 pm | बाजीरावाची मस्तानी

सद्द्ध्या..जास्त पाऊस्.नाहीये....म्हणुन..ठिक आहे..

पण्..मुसळधार पावसात...बाल्कनि मध्ये...जेव्हा आपण एकटेच असतो..जाईच्या कळ्या...उमलत असतात्...त्यन्च्या सुगन्धाने...नकळत कोणाची तरी आठवण येते...अशा..कोणाची तरी....जो..आपल्या खूप दूर असुनही.....आपण्...त्याच्या नेहमिच जवळ असतो....

तेव्हा.ही कविताच ........बनते...त्याला आणि..आपल्यला जोडणारा दुवा....

(खूप छान....बाजिरावाची आठवण आलि...लय भारी..)

मनीषा's picture

19 Jul 2008 - 12:04 pm | मनीषा

रस्ता चुकला..
पण प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

मनीषा's picture

19 Jul 2008 - 12:06 pm | मनीषा

सर्वांचे मनापासून आभार !!