झडली तुझी जीभ
गेली तुझी वाचा
होउ दे रे खाचा
डोळ्यांचिया
पडतील रे पाने
कुणी लावीना शेपूट
राहशील असाच
राणीविना
वेचशील कागद
मागशील भीक
मारुनिया झाडू
राहशील
झालं रे वाटोळं
तुझा वळला संगाड
टोचतील कावळे
बसुनिया
फळवशील रांडा
महारोग होईल
पडतील कीडे
अंगावरी
अशी शापवाणी
कानाला सवय
वाढले ते वय
मन नाही
प्रतिक्रिया
30 Oct 2013 - 7:42 pm | प्यारे१
>>>वाढले ते वय मन नाही
___/\___
नतमस्तक!
30 Oct 2013 - 8:01 pm | बलि
कोण्या एका स्त्री ने एखाद्या लंपट पुरुषाला दिलेल्या शिव्या आहेत बहुदा :)
30 Oct 2013 - 8:27 pm | सूड
शिसारी आली वाचून !!
30 Oct 2013 - 9:56 pm | प्रचेतस
काय बे धन्या.
30 Oct 2013 - 10:11 pm | यशोधरा
:(
30 Oct 2013 - 10:15 pm | पैसा
हे काय रे!
30 Oct 2013 - 11:28 pm | कवितानागेश
धन्या, थोडे दिवस 'लॉरेल अॅन्ड हार्डी' बघ बाबा. बरं वाटेल.
30 Oct 2013 - 11:47 pm | सुहास झेले
...!!
30 Oct 2013 - 11:55 pm | अत्रुप्त आत्मा
व्हाट ह्यापंड माय फ्रेंड? :)
31 Oct 2013 - 12:05 am | अग्निकोल्हा
पण मित्रा मला तू नेहमिच द्वंद्वामाधे दिसतोस...सगळे असून नसल्यासारखे हे मी अधिसुध्दा म्हटले आहे.
पण बास, आता ती वेळ आली आहे मस्त पैकी व्ही आर एस घेउन टाक, करिअर ओरिएंटेड नसलेल्या मुलीशी लग्न कर अन मोकला हो. बस फ़क्त जग. आणि मग ज्यात रस आहे तेच क्षेत्र करिअर म्हणून निवड गरज म्हणून न्हवे
31 Oct 2013 - 12:07 am | बॅटमॅन
वाढले ते वय, मन नाही >> कुठेतरी कैतरी आत जळतंय बहुधा. असो, लिहून मोकळे झालात हे महत्त्वाचं. तेवढंच बरं वाटेल.
31 Oct 2013 - 3:59 am | स्पंदना
कष्ट! कष्ट!! कष्ट!!!
करताना कसं म्हणतात?
यश येइल हो! कष्टाचे फळ मिळेल हो!
पण संघर्ष काही संपत नाही.
कष्टाने जेथवर पोहोचले तेथे तर न कष्टणारेही ठाण मांडुन बसलेत?
मग वैचारिक संघर्ष!
अर्थात जुनाच...आहे रे अन नाही रे वाल्यांचा!
सुटका?
विचाराल तर ....नाही!
परिणाम?
अर्थात मनाविरुद्ध!
तरीही मागच्यांनी खाल्लेल्या खस्ता आठवायच्या.
स्वतः खाल्लेल्या खस्तासुद्धा आपणच आठवायच्या.
वर्तुळाबाहेर तेव्हढच पडायच, जेव्हढ गरजेचे आहे...
नाहीतर वर्तुळालाच अखंड पृथ्वी मानून
सुखी रहायच.
नजर......
आत वळवा...
काऽऽही गरज नाही, विशाल दृष्टीकोणाची.
आरसा पाहताना स्वतः स्वच्छ आहोत ना एव्हढच बास.
जग साफ करुन आलोय का? हे कशाला ?
बघा जमल तर..
__/\__!!
7 Nov 2013 - 10:13 pm | सूड
हे आवडलं !!
31 Oct 2013 - 7:13 am | किसन शिंदे
:(
कानाला सवय झालीये तर मेल्या लक्ष कशाला देतोस या शापवाणीकडे.
3 Nov 2013 - 8:39 pm | चौकटराजा
काही आतलं जळत नाही नि काही नाही. कवि मंगेश पाडगावकर व संदीप खरे रे दोघेही नेहमी म्हणतात कविचे खाजगी आयुष्य व त्यांच्या कवितेतील कंटेन्न्ट यांचा काही संबंध नसतो.
( एरवी ढेरेपोटे सुरेश भट " मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे हे का लिहिते झाले असते ?)
4 Nov 2013 - 12:21 am | अग्निकोल्हा
अन आप्त ्स्वकियांच्या अवास्तव अपेक्सा पुर्न न केल्याबद्दलाचे शिव्याशाप यात फरक असतो असे माजे निर्व्याज नसलेले मन ठामपणे सांगते!
4 Nov 2013 - 12:28 am | प्यारे१
अग्नि, तू का बेशुद्धलेखनाची प्रॅक्टीस करायला का काय ?
'काही विवक्षित' सदस्यांना उत्तर देताना अग्ग्गदी सु...द्द असते की लेखण! ;)
7 Nov 2013 - 11:30 pm | अत्रुप्त आत्मा
@अग्ग्गदी सु...द्द असते की लेखण! >>> =))
8 Nov 2013 - 12:28 am | अग्निकोल्हा
काही कारणाने गेले काही दिवस निव्वळ मोबैल अक्सेस उपलब्ध (राहणार)आहे सबब शुध्द लेखनाला फाटा दिला आहे.
10 Nov 2013 - 3:11 pm | सुहास..
बेक्कार शाप ..
इतका राग ??
10 Nov 2013 - 6:39 pm | रमताराम
एकदम शापबिप दिऊन र्हायलाय्स? आल इज वेल?
10 Nov 2013 - 8:58 pm | मनीषा
हे म्हणायला सोपे, परंतु अशी शापवाणी तोंडी येई पर्यंत त्या व्यक्तीने काय भोगले असेल? ते एक देवच जाणे!
म्हणतात ना, --- "जावे त्यांच्या वंशा - तेव्हा कळे".
27 Nov 2013 - 12:11 am | राघव
का कुणास ठाऊक.. हे वाचून चर्पटपंजरिकेतला एक श्लोक आठवला -
यावत् वित्तोपार्जनसक्तस्तावन् निजपरिवारे रक्तः।
पश्चाज्जर्जर भूते देहे वार्ता कोऽपि न पृच्छति गेहे।
27 Nov 2013 - 7:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यासेठ ऑल इज वेल दिसत नाय....!
बाकी, रचना वृत्तात थोडी गंडली आहे पण एवढं तेवढं चालायचंच. अभ्यासासाठी आमच्या धोंडोपंताचा देवद्वार छंद
(काय हे प्राडॉ. धन्याच्या मनात काय चाल्लंय आणि तुम्ही पेपर तपासताय)
-दिलीप बिरुटे