किनारा

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
30 Oct 2013 - 11:06 am

अज्ञाताचे पन्ख पसरुन
काळपक्षी सांद्र क्षितिजे खुणावतो
अन अस्वस्थ ललाटरेषा
श्रांत चांदण्याचे कवडसे मोजत
शोधत रहातात विसावा
अन्तराळाच्या कुशीत ...

तेव्हा रिकामे रस्तेही ...
शोधत सरपटतात
उद्याच्या प्रवासाची हरवलेली दिशा अन
प्रसववेणा देणारी पहाट शोधू पहाते
दिवसाच्या उजाडण्याचे कारण..

आणि आसमंताच्या नि:शब्द कूपात मी
चाचपडत असतो आणि शोधत रहातो..
.....फक्त एका कुशीचा किनारा

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Oct 2013 - 11:32 am | मिसळलेला काव्यप्रेमी

व्वाह... क्या बात!!

सार्थबोध's picture

30 Oct 2013 - 12:19 pm | सार्थबोध

लै भारी

सागरलहरी's picture

30 Oct 2013 - 6:06 pm | सागरलहरी

धन्यवाद

राघव's picture

27 Nov 2013 - 12:06 am | राघव

चांगलंय. :)

अवांतर:
मला मुक्तछंदापेक्षा छंदोबद्ध कविता जास्त आवडतात. किंचित गुणगुणता येत असल्या तरी छान.
अर्थात्‌ कल्पनेचा प्रभावीपणा कुठेच कमी होत नाही. पण आवड एकेकाची. :)