सुखाच्या शोधात.....

गजानन५९'s picture
गजानन५९ in जे न देखे रवी...
26 Oct 2013 - 1:34 pm

सुखाच्या शोधात.....

चालताना वाटेत
लागतो विसावा
आयुष्याच्या संघर्षातही
लागतो ओलावा,

नात्यांच्या या गर्दीत
कोण आपला नि कोण परका
मुखवट्या मागील जेव्हा
कळतो खरा चेहरा,

स्वतःचा शोध घेताना
संपते आयुष्यही
जगायचेच राहून जाते
सुखाच्या शोधापरी

कविता

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

26 Oct 2013 - 1:44 pm | मुक्त विहारि

स्वतःचा शोध घेताना
संपते आयुष्यही
जगायचेच राहून जाते
सुखाच्या शोधापरी

झक्कास....

गजानन५९'s picture

26 Oct 2013 - 2:04 pm | गजानन५९

लयी हाभारी हाये. :)

खरे तर थोडे पाल्हाळीक होईल पण मनातले विचार सांगूनच टाकतो मी काही कोणी लेखक वगेरे नाहीये खरे तर, पण आयुष्यात बर्याचदा कठीण प्रसंग आले त्यातून जाताना आलेले अनुभव असे नकळत शब्द बध्ह करताना खरेच खूप मोकळे मोकळे वाटते.
त्याच प्रमाणे हे आपले अनुभव तुम्हा सर्वांसमोर मांडताना तितकाच आनंदही होतो.

मुक्त विहारि's picture

26 Oct 2013 - 2:32 pm | मुक्त विहारि

मजा करा..

चित्रगुप्त's picture

26 Oct 2013 - 2:52 pm | चित्रगुप्त

स्वतःचा शोध घेताना
संपते आयुष्यही
जगायचेच राहून जाते
सुखाच्या शोधापरी

या कडव्याच्या प्रथमार्धात 'शोध' हा 'स्वतःचा घेण्याबद्दल म्हटले आहे, तर उत्तरार्धात 'सुखाच्या शोधापरी' म्हटले आहे. हे दोन्ही शोध एकच की वेगवेगळे आहेत असे म्हणायचे आहे? सुखाच्या मागे लागण्यात स्वतःचा शोध घेणे राहून गेले म्हणायचे आहे का? जगायचे राहून गेले, म्हणजे नेमके काय राहून गेले?

मुखवट्या मागील जेव्हा
कळतो खरा चेहरा,

हे अपूर्ण वाटते. मुखवट्या मागील खरा चेहरा जेव्हा कळतो, तेंव्हा काय होते, हे सांगितलेले नाही.

ते सांगायला

काही शिल्लकच रहात नाही...

गजानन५९'s picture

26 Oct 2013 - 3:12 pm | गजानन५९

चित्रगुप्तजी

बरोबर आहात आपण थोडी अपूर्ण वाटते खरी,
पण
मी सुद्धा वाट पाहत आहे कि माझी हि कविता कधी पूर्ण होते आहे याची.

इन्दुसुता's picture

27 Oct 2013 - 8:56 am | इन्दुसुता

अपूर्ण कसे काय ?
नात्यांच्या या गर्दीत
कोण आपला नि कोण परका
मुखवट्या मागील जेव्हा
कळतो खरा चेहरा,
मुखवट्या मागील खरा चेहरा जेव्हा कळतो तेव्हा या नात्यांच्या गर्दीत कोण आपला नी कोण परका हे समजते / जाणवते/ कळते असा अर्थ मी घेतला....