दुखः माझे एकट्याचे एकलाच भोगतो मी …
रात्रीस चांदण्यांसवे एकटाच जागतो मी …
मी दिले तुला माझे आकाश चांदण्यांचे …
कैफात निखळले जे रुपेरी तारे मोजतो मी ….
माझ्या ओल्या जाणिवांची खुलीच होती कवाडे …
आठवून तुझे धुमारे एकटाच लाजतो मी ….
मकरंद तुझ्या ओष्टीचा अजुनी ओठांस आहे …
ओलावल्या आठवांत एकटाच भिजतो मी …
घनभार तुझ्या केसांची ती किरमिजी संध्याकाळ …
प्राक्तनात माझ्या फुले वेचतो मी ….
जगलो एकच पहाट जी तुझ्या मिठीत उगवली ….
ओथंबल्या दवांत एकटाच नाचतो मी …
प्रतिक्रिया
22 Oct 2013 - 7:00 pm | निरन्जन वहालेकर
छान ! आवडली! !
23 Oct 2013 - 10:40 am | घन निल
धन्यवाद !