फोल

आतिवास's picture
आतिवास in जे न देखे रवी...
12 Oct 2013 - 2:06 pm

आवर्तनात
भिरभिरताना
एका क्षणी
गेला तोल;

वेळ उथळ
तळ नाही
म्हणून जमेना
बुडी खोल;

कवच बापडे
गळून पडले
आत-बाहेर
उरले फोल.

कविता

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

12 Oct 2013 - 2:10 pm | आदूबाळ

ये बात!

काही काळाने मागे वळून बघताना वाटतं खरं असं...

यशोधरा's picture

12 Oct 2013 - 3:16 pm | यशोधरा

ह्म्म..

प्रचेतस's picture

12 Oct 2013 - 3:52 pm | प्रचेतस

सुरेख

अग्निकोल्हा's picture

12 Oct 2013 - 3:55 pm | अग्निकोल्हा

.

आतिवास's picture

13 Oct 2013 - 7:57 am | आतिवास

हं! असं होतं कधीकधी!

चाणक्य's picture

12 Oct 2013 - 11:04 pm | चाणक्य

आवडली. शब्दांवर जबरदस्त पकड आहे.

कोमल's picture

12 Oct 2013 - 11:31 pm | कोमल

:)

निवांत पोपट's picture

13 Oct 2013 - 12:24 am | निवांत पोपट

कमी्त कमी शब्दात अत्यंत नेमकी आणि समर्पक.. शेवटचे कडवे तत्वज्ञानाच्या,अध्यात्माच्या वरच्या पातळीला भिडणारे..कविता फारच आवडली. :)

चित्रगुप्त's picture

13 Oct 2013 - 1:01 am | चित्रगुप्त

कविता आवडली.
पण माझ्या काही चित्रांना लोक म्हणतात, चित्र बघायला आवडले पण कळले काही नाही, तसे झाले आहे.
याबद्दल काही लिहिता येईल का?

'एखादी कलाकृती आवडली; पण कळली नाही' असा अनुभव मलाही अनेकदा येतो.
बाकी कवी/लेखकाने/कलाकाराने कलाकृतीचा अर्थ वाचकांवर (ऐकणा-यावर/पाहणा-यावर) सोडून द्यावा, स्वतः स्पष्टीकरणं देत बसू नयेत असं मला वाटतं.

इथं आणखीही एक कारण आहे. कमी शब्दांचा प्रभाव नाही म्हणून जास्त शब्द वापरले तर ते कसे पोचतील. हे म्हणजे 'More is Better' होईल, नाही का? :-)

चित्रगुप्त काका. तुमची चित्रे लोकाना कळत नाहीत याचे कारण म्हणजे तुमचे नाव.
चित्र...... गुप्त.
गुप्त झालेले चित्रे कशी समजतील ;)

चित्रगुप्त's picture

13 Oct 2013 - 3:56 pm | चित्रगुप्त

कळणे-न कळणे यावरून एक जुनी कविता आठवली:
http://www.misalpav.com/node/19183

आतिवास's picture

13 Oct 2013 - 9:34 pm | आतिवास

रोचक चर्चा आहे आणि तुमचं विवेचनही.

प्रत्येकाला कधी ना कधी असा फोलपणाचा साक्षात्कार होतच असावा .
पण तो तात्पुरता... कारण परत जगणे चालू राहतेच.

कविता खूप आवडली.

आतिवास's picture

14 Oct 2013 - 8:01 am | आतिवास

'फोलपणा'चा 'फोल'पणा या अर्थाने पाहिलं आणि कवितेचा वेगळाच अर्थ समोर आला.
धन्यवाद - हा दृष्टिकोन दिल्याबद्दल.

आणि 'जगणे परत चालू राहतेच' या निरीक्षणाशी पूर्ण सहमत.

निवांत पोपट's picture

13 Oct 2013 - 7:23 pm | निवांत पोपट

<< स्वतः स्पष्टीकरणं देत बसू नयेत असं मला वाटतं.>>

तरीसुध्दा विचारावसं वाटतं की,

कवितेतल्या पहिल्या दोन कडव्यांमधून दिसणारी 'खंत' तिसर्‍या कडव्यात संपते,की चालूच राहते?

'फोल' ह्या शब्दाचा अर्थच तुम्ही बदलून टाकलात ह्या कवितेपुरता ! ग्रेट .. :)

पहिल्या दोन कडव्यांतही तसं पाहिलं तर खंत न दिसता 'मॅटर ऑफ फॅक्ट' टोनही जाणवू शकतो.
कदाचित तिस-या कडव्यातला स्वीकार जास्त स्पष्ट आलाय का? तो तसा वाटला तर 'खंत' संपली, नाहीतर आहेच मग ती अविरत...

प्रत्येक वाचकाला कविता वेगवेगळी कळते, त्यामुळे नवनवे अर्थ समोर येत राहतात - हे चांगलंच आहे :-)

निवांत पोपट's picture

13 Oct 2013 - 9:28 pm | निवांत पोपट

< पहिल्या दोन कडव्यांतही तसं पाहिलं तर खंत न दिसता 'मॅटर ऑफ फॅक्ट' टोनही जाणवू शकतो.>

मला ते ही 'खंत' हा शब्द लिहितानाच जाणवलं होतं तिन्ही कडव्यांतली अनुभूती कडव्यांच्या क्रमानुसार..(आधी टोचणी,मग निरास.. अशी ) सुटी सुटी मानायची की तिसर्‍या कडव्यातल्या वर्णन आलेल्या साक्षात्कारानंतर ही तिन्ही कडवी लिहिली गेलीत असं मानायचं, एवढाच प्रश्न होता. :)

मला कळालं नाही ते, हे की,
.............................................................. :)

आतिवास's picture

13 Oct 2013 - 9:33 pm | आतिवास

:-)

प्यारे१'s picture

13 Oct 2013 - 11:41 pm | प्यारे१

रोचक कविता. ;)

-आजचा शब्द रोचक :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Oct 2013 - 12:30 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अत्यंत समर्पक शब्दात बांधलेली रेखिव रचना.

psajid's picture

14 Oct 2013 - 12:44 pm | psajid

एक्दम छान

आतिवास's picture

15 Oct 2013 - 10:22 am | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.