searchingforlaugh उर्फ "आन्याची फाटकि पासोडी " इतका अप्रतिम मराठी ब्लॉग दुसरा असल्यास सुचवा ही विनंती.

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
8 Oct 2013 - 12:42 pm

मित्रांनो
मी तसा मराठी ब्लॉग च्या दुनीयेत नवीन च आहे. माझ्या आतापर्यंत च्या शोधात मला इतका सुंदर ब्लॉग दुसरा सापडला नाही."searchingforlaugh.blogspot.in" हा ब्लॉग आपण जरुर वाचा. आणी या सारखेच इतर काही सुंदर इतर ब्लॉग तुम्हाला माहीत असतील तर मला जरुर कळवा.
या ब्लॉग बद्द्ल मला जे आवडले ते असे की
१- या मध्ये मी कधीही बघीतलि नव्हति इतकी सुंदर व्यंगचित्रे, अतिशय दुर्मीळ अशी छायाचित्रे आहेत.जी अतिशय महान कलाकरांची आहेत.
२- या मधील विषयांचे वैविध्य अफाट आहे जसे मर्ढेकर ते साल्वादोर दाली ते तत्वज्ञान ते मस्तानी ,मस्तक गरगरुन जाइल असा विषयांचा आवाका आहे.
३- हा तसा मराठी/इंग्रजी असा द्विभाषीक ब्लॉग आहे. पण एका अस्सल मराठी माणसाचा आहे.आणी वैश्विक भान असणार्‍या मराठी माणसाचा आहे.
४-या ची निव्वळ सांखिकीय माहीती बघीतली तर हे एका माणसाचे ( मराठी) काम आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.
एकुण ८ वर्षे अव्याहतपणे हा ब्लॉग सुरु आहे आणी एक हजार (१,०००) हुन अधीक पोस्ट आजपर्यंत झालेल्या आहेत.
५-आणी एव्हढी संख्या आहे तर दर्जा खालावला असेल अस वाटत तर अजीबात नाही उलट वाढत चाललेला आहे.
६-या वरचा जमा झालेला एवज हा एक अप्रतिम असा ठेवा आहे असे माझे मत आहे.
७-आणि मला असे मनापासुन वाट्ते की इतरांनी सुधा याचा आनंद लूटावा आणी अनिरुध कुलकणीं चा हा ब्लॉग लोकांना माहीत व्हावा.
८- श्री कुलकर्णि कधीही या ब्लॉग चा फारसा स्वताहुन प्रचार करीत नाही या बाबत ते दुसर्‍या एका कुलकर्णि g.a.kulkarni
सारखे आहेत.
९- या च्या जुन्या पोस्ट जरुर जरुर बघाव्यात. नुस्त्या एखादया पोस्ट वरुन अंदाज अजिबात येणार नाही.
१०- या ब्लॉग बद्द्ल एक सुंदर लेख लोकसत्ता मध्ये पुर्वि आला होता तो जरुर येथे वाचा
http://www.loksatta.com/sampadkiya-news/blogspot-searchingforlaugh-26372
११- या कुलकर्णी यांनी काही सुंदर नोंदी देखील विकीपिडिया वर केलेल्या आहेत जसे की म. वा. धोंड ,वसंत सरवटे यांची कला इत्यादी
आणी शेवटी परत एकदा विनंती की असे या दर्जा चे काही इतर सुंदर ब्लॉग माहीत असल्यास जरुर जरुर कळवीणॅ.
मला मराठी लीहीणे जमत नाही पण माझा आनंद तुमच्या बरोब्रर शेअर करता यावा म्हणुन फकत हा खटाटोप केला काही चुकल्यास अगोदर च क्षमा मागुन घेतो .

मांडणीशिफारस

प्रतिक्रिया

मीही या ब्लॉगचा ५ वर फिरणारा पंखा आहे. या ब्लॉगरशी ओळख असल्याचा अभिमान वाटतो.

मारवा's picture

8 Oct 2013 - 2:29 pm | मारवा

श्री ब्याट्मन आपण हा ब्लॉग वाचता हे वाचुन आनंद झाला. असे सर्व ब्लॉग प्रकाशात यायला हवेत असे मनापासुन वाटते,

आपण उल्लेखलेल्या ब्लॉगवर विपुल, दर्जेदार आणि अप्रतिम नोंदी आहेत. लेखकाची शैली खिळवून ठेवणारी आहे आणि त्याच्याकडे माहितीही भरपूर आहे.

पण या ब्लॉगवरील मराठी नोंदी इतक्या कमी आहेत की त्याला मराठी ब्लॉग म्हणता येईल का? - असा प्रश्न पडतो. लेखकही त्याला 'द्वैभाषिक ब्लॉग' म्हणतो आहे. अर्थात इंग्रजीतून मराठी साहित्याविषयी बरेच काही लिहिले आहे आणि ते अत्यंत वाचनीय आहे; याबाबत दुमत नाही.

याच्याइतका दुसरा अप्रतिम ब्लॉग - हे किंचित मनोरंजक वाटलं! एका जगात एकच चांगली गोष्ट असू शकते; दुसरी नाही - हे मत, हा दृष्टिकोन मला तरी समजत नाही. शिवाय 'अप्रतिम' साहित्य (किंवा खरं तर कोणतीही गोष्ट) ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष असते. पण ते असो.

आपल्याला हा ब्लॉग माहिती आहे तर 'रेघ'ही माहिती असेलच.

मारवा's picture

8 Oct 2013 - 5:51 pm | मारवा

एका जगात अनेक चांगल्या गोष्टी निश्चित च असु शकतात ( including blog) असे च माझे ही मत आहे. याच्याइतका दुसरा अप्रतिम ब्लॉग असे म्हणतांना फक्त या सारखा दुसरा असे म्हणायचे होते. या हुन ही सुंदर असतील आणि त्यांचाच तर शोध घेत आहे.
बाकी एक अशा प्रकारची आणखि एक शोध मोहीम लता मंगेशकर वर येउन थांबली आहे पुढे जात च नाही काही केल्या,

रेघ हा जरा "शिष्ठ" ब्लॉग आहे असं माझं एक (गरीब) मत आहे...

aniruddha g. kulkarni's picture

9 Oct 2013 - 12:49 pm | aniruddha g. ku...

I have already thanked Marva for his/her kind words for my blog. I just wish to comment what I felt reading Aaativas's comments above.

I have always wondered what "Marathi blog" is...Does it have to be written in Marathi? What if its ethos is Marathi but is written in Tamil? (btw- Is Thanjavur Marathi acceptable Marathi? Believe me, I have sat though a few conversations where T.M was spoken and I did not understand a word!)

I don't know how many of Misalpav.com's writers/readers have read Vidyadhar Date's excellent reporting on "Marathi culture" in The Times of India of yesteryears? For me, it is as much 'Marathi' as any Marathi I have come across.

Arun Kolatkar's 'Jejuri' is written in English. Is it any less Marathi than poetry of Tukaram? (I am probably being arrogant invoking Kolatkar in my defence.).

A lot of us now use Marathi interspersed with English rather freely at home/ office/ social media etc.

Misalpav.com is a pathbreaking website dedicated to Marathi culture/ way of life and I am grateful that one day in October 2013 my tiny blog rode it to reach a lot of people it would never have otherwise.

best, Aniruddha G. Kulkarni

सुमीत भातखंडे's picture

9 Oct 2013 - 1:33 pm | सुमीत भातखंडे

मस्त आहे ब्लॉग.
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

मारवा's picture

9 Oct 2013 - 4:09 pm | मारवा

Thank You Sumit I suggest you to explore it,s older posts they are simply superb the more you will explore more pearls you will find in it.

पैसा's picture

9 Oct 2013 - 8:45 pm | पैसा

एका चांगल्या आणि सातत्याने लिहिल्या गेलेल्या ब्लॉगची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! मात्र ब्लॉग लेखकांनी इथे आपले उत्तर मराठीत लिहिले असते तर जास्त आवडले असते. आणि त्यांचा लेखनाचा अनुभव लक्षात घेता ते नक्कीच मराठीतून लिहू शकले असते!

सुहास झेले's picture

10 Oct 2013 - 2:36 pm | सुहास झेले

यप्प.... अगदी अगदी :) :)

मारवा's picture

9 Oct 2013 - 8:55 pm | मारवा

मनापासुन धन्यवाद !

aniruddha g. kulkarni's picture

10 Oct 2013 - 7:22 am | aniruddha g. ku...

ज्योती-जी- प्लीज माफ करा...

पैसा's picture

10 Oct 2013 - 9:15 am | पैसा

बाकी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ब्लॉग इंग्लिशमधे लिहिलात तर तो अमराठी भाषिक लोकांपर्यंत सुद्धा पोचेल याची कल्पना आहे, पण हे संस्थळ विशेषत्वाने मराठीत लिहिण्यासाठी आहे, त्यामुळे इथे तुम्ही बिनधास्त मराठी लिहू शकता, कारण मराठी न समजणारे इथे कोणीही नाही!

मिपावर स्वागत! यापुढे तुमचे मराठी लिखाण इथेही प्रसिद्ध करत चला. शुभेच्छा!

थन्क्स...मी निष्चित प्रयत्न करेन.