आज पुन्हा उडावेसे वाटले

पल्लवी मिंड's picture
पल्लवी मिंड in जे न देखे रवी...
7 Oct 2013 - 8:20 pm

आज पुन्हा उडावेसे वाटले
पंखाना जरा विहारावेसे वाटले
दगदग काय रोजचीच
आज उसंतीला चाखावेसे वाटले

घोटभर शांततेसाठी
हे मायाजाल हटवावेसे वाटले
आज पुन्हा उडावेसे वाटले
आकाशात हरवावेसे वाटले

धावपळीत विरघळलेल्या मला
अलगद ओढावेसे वाटले
आज पुन्हा उडावेसे वाटले
नभीचे तरंग वेचावेसे वाटले

विस्मृतित गेलेल्या बालपनाला
परत जगावेसे वाटले
त्या निरगसतेत
झोकून द्यावेसे वाटले

उंचावरच्या जगात
मला आजमावेसे वाटले
अंहपणाचा जप सोडून
आज पुन्हा उडावेसे वाटले

फार झाली आता
अस्तित्वाची लढाई
त्या गोड पाखरसारखे
आज जगावेसे वाटले.....
जगावेसे वाटले.......

कविता

प्रतिक्रिया

सुजित पवार's picture

7 Oct 2013 - 9:36 pm | सुजित पवार

छान जमलि आहे...

पल्लवी मिंड's picture

10 Oct 2013 - 12:33 pm | पल्लवी मिंड

खरच खूप आभार

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Oct 2013 - 9:42 am | ज्ञानोबाचे पैजार

मुळ कविता चांगली असल्या मुळे आम्हालाही प्रेरणा मिळाली :)

आज मला कपडे बदलावेसे वाटले
मोजेही जरा धुवावेसे वाटले
अंगावरची जीन्स रोजचीच
बर्‍याच दिवसानी तीला काढावेसे वाटले

घोटभर चहासाठी
कप विसळावेसे वाटले
चहाचे भांडेही धुवावेसे वाटले
झुरळांचा खडु फिरवावेसे वाटले

बेडवरच्या मळलेल्या चादरीला
अलगद ओढावेसे वाटले
उशांचे अभ्रेही बदलावेसे वाटले
भिंतीवरची जळमटेही काढावेसे वाटले

दारा मागचे तसले फोटो
फाडुन टाकावेसे वाटले ( पण खरच फाडले नाही हं.... फक्त वाटले :) )
त्या जागी देवादिकांचे फोटो
लावावेसे वाटले

टेरेस वरुन रोजच तुला पहातो
आज तुझ्या समोर येउन
एकदाच काय तो फैसला
करावेसे वाटले

फार झाले आता एकाकी जगणं
तुझ्या सारखे गोडपाखरु
आयुष्यात यावे असे वाटले......

त्याचमुळे.....

आज मला कपडे बदलावेसे वाटले

प्रचेतस's picture

8 Oct 2013 - 10:05 am | प्रचेतस

=))

पल्लवी मिंड's picture

10 Oct 2013 - 12:34 pm | पल्लवी मिंड

मस्त जमलय विडंबन ...

अत्रुप्त आत्मा's picture

10 Oct 2013 - 10:23 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ही ह्ही ह्ही!!! =))

क्रेझी's picture

8 Oct 2013 - 10:40 am | क्रेझी

पल्लवीजी तुमची कविता खूप आवडली :)
आणि ज्ञानोबांनी केलेलं विडंबनही छान आहे पण वेगळा धागा काढून ते डकवलं असतं तर बरं वाटलं असतं.

पल्लवी मिंड's picture

10 Oct 2013 - 12:35 pm | पल्लवी मिंड

खूप आभारी आहे...

निवेदिता-ताई's picture

10 Oct 2013 - 10:36 pm | निवेदिता-ताई

+१ दोन्हीही

पैसा's picture

10 Oct 2013 - 10:39 pm | पैसा

आवडली.

इतकच काय,
धने, मिरे, मिरच्या ,
तिळगुळ, शेंगदाणे, अन साखरफुटाणेही वाटले,
असे वाटले... म्हणूनही वाटले असे वाटले!