शिवबाचि तलवार

kalpana joshi's picture
kalpana joshi in जे न देखे रवी...
16 Sep 2013 - 1:55 pm

शिवरायांची भवानी तलवार चाले -
जिने हिंदुधर्माचे रक्षण केले ,
निराधार प्रजेला संरक्षण दिले
निष्पाप प्रजेला भयमुक्त केले.
बलाढ्य औरंगजेबाला भयग्रस्त केले ,
अशी ही शिवरायाची भवानी तलवार चाले .
मोगलाई बरखास्त झाली,
स्थापला महाराष्ट्र धर्म ,
लोकशाहीची तुतार फुंकली ,
सरंजामशाहीच्या अन्याया विरुद्ध बंड पुकारले ,
अशी ही शिवरायाची भिवानी तलवार चाले .
बलाढ्य अफजल खानाचा वध झाला,झाले शीर धडा वेगळे ,
प्रराक्रमी किती ते शिवराय अन मावळे ,
किती एक गड किल्ले काबीज केले.
अशी ही शिवरायांची भवानी तलवार चाले .
स्थापिले स्वराज्य झाला शिवबाला राज्याभिषेक,
डोळ्याचे पारणे फिटले जिजाईचे ,अन आशीर्वाद
लाभले भवानी मातेचे ,
अशी ही शिवरायाची भवानी तलवार असे.

कविता

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

16 Sep 2013 - 7:14 pm | चित्रगुप्त

भवानी तलवारीबद्दलः
http://shivsankalp.wordpress.com/2012/10/17/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%...

संजय क्षीरसागर's picture

17 Sep 2013 - 12:02 am | संजय क्षीरसागर

ही वाक्य एकापुढे एक लिहीली की गद्य पॅरा होईल.

वेल्लाभट's picture

18 Sep 2013 - 9:29 am | वेल्लाभट

:प!

हा कवितेचा आधुनिक प्रकार आहे.

स्पंदना's picture

17 Sep 2013 - 6:58 am | स्पंदना

शिर्षक धरुन पंच्च्याण्णव शब्दकथा!!

संजय क्षीरसागर's picture

17 Sep 2013 - 10:29 am | संजय क्षीरसागर

मग शहाण्णव तरी करायचे.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Sep 2013 - 5:57 am | अत्रुप्त आत्मा

:-D

बॅटमॅन's picture

18 Sep 2013 - 2:47 pm | बॅटमॅन

अगागागागागा =)) =))

या ओळी कुणी लिहिल्या आहेत?

वेल्लाभट's picture

18 Sep 2013 - 9:32 am | वेल्लाभट

तलवारीबद्दल आणि त्याप्रत तुमच्या भावनेबद्दल मनापासून आदर!
पण तलवार कशी अशी खच्च कन एक घाव दोन तुकडे करते ना; तसं झालं नाही वाचून. या कवितेत बारीक बारीक तुकड्यांचं सॅलड झालंय असं वाटलं!

दादा कोंडके's picture

18 Sep 2013 - 10:18 am | दादा कोंडके

कवितेत शिवरायांपेक्षा भवानी तलवारीचच कौतिक आहे की.

यावरून आठवलं. त्या अलिफ लैला मधला कर्तुत्वशुन्य लठ्ठ हिरो 'नेक बंदा' असल्यामुळे कुठलाही व्हिलन आला की वर आभाळाकडे बघून हात पसरून 'या अल्ला, कर मदत' म्हणत असे. आणि मग कुठल्यातरी 'तिलिस्मी ताकदीमुळे' तो त्यातून सहिसलामत सुटत असे.

स्पंदना's picture

18 Sep 2013 - 12:42 pm | स्पंदना

:))

वेल्लाभट's picture

18 Sep 2013 - 1:00 pm | वेल्लाभट

आणि हो, शीर्षकातील 'चि' दुसरी असायला हवी.

उद्दाम's picture

18 Sep 2013 - 1:06 pm | उद्दाम

बलाढ्य खानाचा वध म्हाराजानीच केला. पण शीर वेगळे मात्र मावळ्यानी नंतर केले. ( बरोबर ना? )

अशी ही शिवरायाची भवानी तलवार असे.

ते 'असे' वाचून बाँड / वकिली नोटिसा लिवणार्‍यांची आठवण आली. म्हणून नोटीस दिली असे. शेवटी असे लिहितात.

संजय क्षीरसागर's picture

19 Sep 2013 - 11:57 pm | संजय क्षीरसागर

महाराज मावळ्यांना नोटीस देतायंत.... असं म्हणायचंय का कवियत्रीला?