जंजीर, डॉन, शोले, अग्निपथ, गोलमाल अशा सिनेम्यांचे रीमेक येऊन गेले. अजून काही येऊ घातले आहेत. सहज मनात विचार आला, मिसळपाव या संस्थळावर प्रतिभावान, धनवान इसमांची कमी नाही. आपणही एखादा रीमेक बनवू शकतो. सर्वात मोठा फायदा म्हणजे रीमेक कसा बनवायचा याची सखोल चर्चा आपल्याला इथे करता येईल. चर्चाप्रस्तावासाठी दोन शिणुमाम्यांची नावे समोर ठेवत आहे. त्यांचा एकदा फडशा पडला कि दुस-या नावांचाही विचार करता येईल. सर्वांना विनंती कि त्यांनी आपापले मौलिक विचार मांडावेत. या कार्यात आपल्या सर्वांचा हातभार लागावा ही अपेक्षा आहेच.
रीमेकसाठी विचारार्थ ओरीजिनल शिणेमे खालीलप्रमाणे :
१. रामगोपाल वर्मा कि आग
२. जय संतोषी मा
प्रतिक्रिया
11 Sep 2013 - 4:19 pm | पैसा
जय संतोषी मां आणि रागोव चे शोले याच्या रिमेक बद्दल तुम्ही काय विचार केलाय तो आधी सांगा बघू! मराठी कलाकार घ्यायचे आहेत का हिंदीच?
11 Sep 2013 - 4:51 pm | मी-सौरभ
बौद्धिक कुवत तोकडि पडते आहे :(
11 Sep 2013 - 5:02 pm | आशु जोग
विकी डोनर प्रत्येक दशकात बनलाच पाहीजे.
11 Sep 2013 - 8:05 pm | खटासि खट
गाळलेल्या जागा भरायच्यात का ?
12 Sep 2013 - 1:45 am | जेनी...
खट्टू काका पोष्टन्याधी थांबत जाओ :-/
11 Sep 2013 - 5:14 pm | मुक्त विहारि
जय इटालियन माँ
असे नविन शीर्षक असावे असे वाटत आहे..
11 Sep 2013 - 7:17 pm | खटासि खट
माझा पासतुम्हाला बीए पासचा रीमेक बनवायचा आहे का ? थेट पार्ट टू बनवा कि.. एमए पास (बा पास, मां पास )
मित्रहो
मराठी, हिंदी कसाही बनवा. आपण मागे राहता कामा नये. राम और शाम वरून सीता और गीता बनला तसाही चालेल. जय संतोषी मा वरून जय आसाराम बापू बनला तरी चालेल. रीमेक बनाना तो बनता है..
11 Sep 2013 - 7:40 pm | मी-सौरभ
रीमेक म्हंजे फक्त नावाच यमक जुळवायच का??
त्यात काय एवढं
11 Sep 2013 - 8:07 pm | विजुभाऊ
शोले चा मराठी रीमेक प्रमुख पात्रे
बसन्ती : आशा काळे
वीरु : महेश कोठारे
ठाकुर : शरद तळवलकर
जय : लक्ष्या बेर्डे
ठाकुरची सून : प्रिया बेर्डे
गब्बर : निळू फुले
चाचा(ए के हनगल) = श्रीराम लागू
सांबा = जितेन्द्र जोशी
मौसी = भारती आचरेकर
रामलाल = ( जागा भरणे आहे)
कालीया = भरत जाधव
जेलर = विजय पाटकर
सूरमा भोपाली = रवी पटवर्धन
जलाल आगा( मेहबुबा चा नाच्या) = महागुरु सचिन पिळगावकर
जेलमधील लोक, गाववाले,व इतर या गाळलेल्या जागा भरा.
11 Sep 2013 - 8:11 pm | पैसा
:ROFL:
12 Sep 2013 - 1:51 am | जेनी...
:( सासुबै केवढं लोळताय ... बरं दिस्तं का ते :-/
12 Sep 2013 - 9:16 am | पैसा
मला कै शोभतं ते मला चांगलंच म्हैत आहे. तूच जरा शिकून घेतलंस तर बरं! चार लोकांत हिला न्यायची सोय म्हणून नै!
12 Sep 2013 - 12:26 pm | खटासि खट
:biggrin:
13 Sep 2013 - 10:41 pm | जेनी...
खट्टु काका लय मजा वाटतेय कै
सासुसुनांची भांडणं बघायल्ल??? :-/
13 Sep 2013 - 10:39 pm | जेनी...
:-/
11 Sep 2013 - 9:20 pm | मुक्त विहारि
भारी..
11 Sep 2013 - 11:58 pm | टवाळ कार्टा
जय - अंकुश चौधरी
ठाकुर - विक्रम गोखले
12 Sep 2013 - 12:11 am | अत्रुप्त आत्मा
show ले!
@रामलाल = ( जागा भरणे आहे) >> जयंत सावरकर.. चालतील का? :)
12 Sep 2013 - 12:29 pm | खटासि खट
रामलाल ही अत्यंत जबाबदारीची पोस्ट आहे. दोन्ही हात नसल्याने ठाकूरसाहेबांचा जो काही खोळंबा झाला असेल त्याचा निपटारा करण्याची धमक रामलाल मध्ये हवी.
अवांतर : सुहास भालेकरांना विसरू नका हो.
12 Sep 2013 - 2:23 pm | यसवायजी
हीच तर शोलेची सगळ्यात मोठी ट्रॅजेडी आहे..
साले डायरेक्टरने उसके बीबीको मार डाला.. और हात भी काट डाले.. :))
;)
12 Sep 2013 - 12:11 am | यसवायजी
मेहबुबा चा नाच्या = महागुरु सचिन पिळगावकर
हे लै आवडलं.. :))
12 Sep 2013 - 11:50 am | विटेकर
हा म्हागुरु हल्ली इत्का डोक्यात जातो.. निव्वळ नाच्या आहे.
12 Sep 2013 - 1:35 am | ब्रिटिश टिंग्या
रामलाल = मकरंद अनासपुरे!
12 Sep 2013 - 1:49 am | जेनी...
=))
गलबलुन आलं बै मला तं अगदी =))
12 Sep 2013 - 2:12 am | विजुभाऊ
अरे बापरे. चाटणं घे गं ...... सुतशेखर मात्रा विडंगारीष्ट. वावडिंग. हळीव .
12 Sep 2013 - 2:13 am | विजुभाऊ
मकरम्द अनासपुरे = हरीराम नाई......... ( जेलर चा जासूस)
12 Sep 2013 - 2:14 am | विजुभाऊ
"धन्नो" चा रोल कोणाला द्यायचा?
12 Sep 2013 - 2:17 am | अरुण मनोहर
अरे कोणी तरी टारझनची रिमेक बनवा रे!
--वॉरझोन
12 Sep 2013 - 12:41 pm | बॅटमॅन
टारझनचा रिमेक? नक्की कुठला टारझन अभिप्रेत आहे आपल्याला ;) ;) =)) =))
(चिकित्सक) बॅटमॅन.
12 Sep 2013 - 2:27 pm | अग्निकोल्हा
:D :D :D
12 Sep 2013 - 4:34 pm | प्रसाद गोडबोले
टारझन हा माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे !
पहिल्यांदा तो एक नंबरला होता आता १ नंबरची जागा पायरेट्स ने पटकावली आहे ;)
12 Sep 2013 - 7:36 pm | अग्निकोल्हा
पण टारझनचे अॅनिमेशन "जर्कि" वाटायचे, त्यापेक्षा जॉब्सच्या पिक्सारचा "सिंदबाद" मस्त होता. पण ते हि डिस्नेने विकत घेतल्याने आता रिमेक कसा बनेल माहित नाही.
12 Sep 2013 - 3:04 pm | आशु जोग
बा द वे झी आणि ई मराठीच्या कौटुंबिक मालिकांचा रीमेक बनवण्याची आयडीया कशी वाटते !
तू तिथं मी
बाजीराव मस्तानी
काटा रुते...
चार दिवस सासूचे
दामिनी
स्वामिनी
मानिनी
असंभव
सारेगमप - लिटल चँप (पल्लवी जोशी अॅंकर)
12 Sep 2013 - 6:26 pm | खबो जाप
आपल्याला सिनेमा ३ तासात संपवायचा असतो....
12 Sep 2013 - 5:40 pm | निश
अरे मनोज कुमाच्या चित्रपटांचे मराठी रीमेक बनवा रे कोणी? व तो त्याला नेऊन दाखवा. परत कधी तो स्वताचे चित्रपट बघणार नाहीत.