काय वर्णन करू, त्या पामराचे
सदनी दारिद्र्य, अठरा विश्वाचे
जाहला गृहस्थ, पाश गरिबीचा
स्मरे परंतु मेळा, गोकुळाचा ll १ ll
दशा वाईट, भविष्य होय अंध
उदर भरण्या, रोजचा आक्रंद
स्मरणात तरी, होता गोपालवृंद
इच्छा पाहण्या, पुन्हा तो मुकुंद ll २ ll
करुनी विचार, निश्चय केलासे
मनोमनी स्मरण, माधवाचे
भेटस्वरूप काय, मित्रास न्यावे?
कल्लोळ मनी, त्यास काय आवडावे ll ३ ll
घरात नाही, एकही उपलब्ध दाणा
कृष्णाचा मित्र, उगीच का रे म्हणा !
शिळे पोहे पुरचुंडी, घेतली शेवटी
त्याच्या ठायी, तीच शक्य होती ll ४ ll
आला द्वारकेस, उपाशी थकलेला
काम टाकून, माधव भेटीस धावला
धरिले पाय, हतबल सुदाम्याने
तो सावळा मित्र, आलिंगन प्रेमाने ll ५ ll
बडदास्त मित्राची, कृष्ण करी जातीने
प्रेमात नाहला, विसरला सुदामा; मागणे
दिली भेट पोह्याची, जीवाच्या सख्यास
भेट पाहून उजाळा, जुन्या आठवणीस ll ६ ll
उचंबळे सुदामा, भरवून घास मित्रास
दोन घास पोटी, नीर कृष्ण लोचनास
भेट साधी, किंचित दुर्गंधी त्यास
मधुसूदन पाही, फक्त प्रेमभावास ll ७ ll
परतला पुन्हा सुदामा, सारे अनोळखी
कृष्ण-रुक्मिणी कृपा, काय हवे आणखी
जाऊन झोपडी, बदल प्रासादात
कुटुंब सारे, नाहले आनंदात ll ८ ll
मनोमन हर्षला; कृतार्थ झाला, इथे तो सुदामा
कृष्ण्हृदयी भाव तिकडे, मित्र सुदामा सुदामा ll ९ ll
- सार्थबोध
प्रतिक्रिया
29 Aug 2013 - 12:20 pm | प्रभाकर पेठकर
नविन कायद्यानुसार अंधश्रद्धा पसरविण्यास मनाई आहे. (हलकेच घेणे).