अलेक्साच अधिकृत वाहतूक दर्जा Extension आपल्याला अलेक्सा वाहतूक क्रमांकाची माहिती फक्त एका टिचकीवर पुरवते.

विनोद निंबाळकर's picture
विनोद निंबाळकर in जनातलं, मनातलं
27 Aug 2013 - 11:05 am

गुगल क्रोम आपल्याला अलेक्सा वाहतूक दर्जा विस्तारची सेवा विनामुल्य देतो, आणि हे एकमेव विस्तार (Extension) आहे, ज्यामध्ये अलेक्सा रहदारी पॅनेल सामाविष्ट आहे.

आपला ब्राउझिंगचा प्रवास खंडीत न करता, आपण ज्या संकेतस्थळास भेट देत आहात त्या संकेतस्थळाची माहिती सहजतेने पुरवतो.

KideGiri.Com
किडेगिरी.कॉम | Alexa Traffic Rank

किडेगिरी.कॉमचा अलेक्सा क्रमांक पाहण्यासाठी येथे टिचकी द्या.

Misalpav.Com

मिसळपाव.कॉमचा अलेक्सा क्रमांक पाहण्यासाठी येथे टिचकी द्या.

अलेक्सा वाहतूक दर्जा आपल्याला प्रत्येक संकेतस्थळाची माहिती, आपण पाहत असलेल्या संकेतस्थळाला इतर संकेतस्थळान बरोबर तुलना करण्याची परवानगी देतो, तसेच आपण भेट देणाऱ्या प्रत्येक संकेतस्थळाचा दररोज, आठवड्याचा किंवा वार्षिक यश, अपयश, चढउतार पाहू शकतो.
अलेक्साच्या http://www.alexa.com/topsites या दुव्यावर आपण सर्वात जास्त वाहतूक असणारे जगातील मुख्य ५०० संकेतस्थळ पाहू शकता.
सर्वात जास्त वाहतूक असणारे जगातील १५ संकेतस्थळांची माहिती खाली दिलेली आहे. (गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१३ / श्रावण शु. ९, शके १९३५ च्या पाहणीनुसार)

१. Google | google.com जगातील सर्वात जास्त वाहतूक असणारे, तसेच शोध प्रक्रियेसाठी जगभरातील लोकांकडून भेट दिले जाणारे लोकप्रिय संकेतस्थळ.

२. Facebook | facebook.com फेसबुक हे सोशल नेटवर्क संकेतस्थळ आहे. ह्या संकेतस्थळाचा उपयोग मित्र-मैत्रीण निर्माण करण्यासाठी तसेच आपले विचार, छायाचित्र, विडेव्हो व इतर गोष्टींची देवाण-घेवाण करण्यासाठी केला जातो.

३. YouTube | youtube.com ह्या संकेतस्थळाचा उपयोग आपण विडेव्होची देवाण-घेवाण करण्यासाठी केला जातो.

४. Yahoo! | yahoo.com ह्या संकेतस्थळाचा उपयोग गुगल प्रमाणेच शोध प्रक्रियेसाठी केला जातो.

५. Baidu.com | baidu.com ह्या संकेतस्थळाचा उपयोग मुख्यतः चीनमध्ये शोध प्रक्रियेसाठी केला जातो.

६. Wikipedia | wikipedia.org हे संकेतस्थळ आपल्याला जगभरातील वेगवेगळे ज्ञान विनामुल्य पुरवते.

७. QQ.COM | qq.com Tencent कंपनीच्या मालकीचे असलेले हे चीन मधील लोकप्रिय पोर्टल संकेतस्थळ आहे.

८. Amazon.com | amazon.com ह्या संकेतस्थळाचा उपयोग इ-खरेदी साठी केला जातो.

९. LinkedIn | linkedin.com नोकरी शोधणारे उमेदवार आणि नोकरी प्रदान करणाऱ्या कंपनी यामधील सोशल नेटवर्क संकेतस्थळ आहे.

१०. Windows Live | live.com नामांकित माक्रोसॉफ्टच्या मालकीच हे शोध संकेतस्थळ आहे.

११. Twitter | twitter.com कमी शब्दात (१४० शब्द) आपले मत व्यक्त करण्यासाठी हे संकेतस्थळ वापरले जाते.

१२. Blogspot.com | blogspot.com ह्या संकेतस्थळाचा उपयोग आपले विचार आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो.

१३. Taobao.com | taobao.com Amazon प्रमाणे चीनमध्ये ह्या संकेतस्थळाचा उपयोग इ-खरेदी साठी केला जातो.

१४. Google India | google.co.in भारतातील शोध प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारेसर्वात लोकप्रिय संकेतस्थळ.

१५. Bing | bing.com नामांकित माक्रोसॉफ्टच्या मालकीच हे शोध संकेतस्थळ आहे.

वरीलप्रमाणे भारतातील सर्वात जास्त वाहतूक असणारे ५०० संकेतस्थळ आपण http://www.alexa.com/topsites/countries/IN या दुव्यावर पाहू शकता.
आपण अलेक्साच्या वेबसाइटवर अधिक माहिती मिळवू शकता: http://alexa.com/toolbar

तंत्रमाहिती