व्यक्ति आणि व्यक्ति

राधा's picture
राधा in जनातलं, मनातलं
14 Jul 2008 - 11:14 pm

सुरेश

''या घटनेतील सर्व पात्र काल्पनीक असुन त्यांचा जीवीत अथवा मॄत व्यक्तिशी कहीही संबंध नाही'' अस मी मुळीच म्हणणार नाही, काराण 'सुरेश' हे पात्र मी उघड्या डोळ्यांने बघीतल आहे.
तर सुरेश नरेश चामरेकर (नाव वाचताना गोपाल गणेश आगरकर अस sound होत ना अहो पण comparison नकोच त्या महान व्यक्तिशी). सुरेश हा आमच्या वेटाळात रहाणारा एक मुलगा. आता मुलगा म्हणावा की इसम ते तुम्ही नंतर ठरवा. सुरेशला मी लहानपणा (माझ्या)पासुन बघते आहे. म्हणजे मीच नाही आमचा वेटाळच त्याला बघतो आहे. आता सुरेश च्या family ची ओळख करुन द्यायची म्हणाल तर त्याला धरुन ते 'पाच भाऊ ' होते. आता तुम्ही विचारात पडले असाल की भावांना का inverted coma मधे टाकल, तर अहो ते कुटुंबच inverted coma मधे टाकण्यासारख आहे. असो. तर पांडवां सारखी ही भावंड अगदी सोबत रहाणारी, व्यवस्थीत टायमींग पाळणारी आणि एकच काम दिवसभर करणारी. हो नाही म्हणायला 'उनाडक्या करण' हे पण एक कामच नाही का??? हो पण ह पाचही भाऊ सारखे आहेत ह्याचा उलगडा मात्र खुप नंतर झाला हा. म्हणजे झाल अस की एकदा वेटाळातल्या महिला मंडळा ची एकदा meeting चालु होती (तस रोज फाटकात उभ राहुन अन् भिंती वरुन बोलण चालु असतच). आणि चामरेकर family चा विशय निघाला. आता विशय चालु झाला तो अम्हा मुली मधे एक झण म्हणाली ,' अग तो सुरेश आहे ना आम्ही शिकवणी ला जात असताना रोज त्या झादाखाली उभा असतो' या वक्तव्याला तिच्या सोबतच्या एकीने दुजोरा दिला.तेवढ्यात दुसरी म्हणाली , 'अव पन थ्याचा लहान भाउ तर आमच्या batch वर line मराले त्या झाडाखाली उभा रहाते?????????' यावर तिसरी बोलली , चवथी बोलली आणि मग अस लक्शात आल की ही भावंड आळी पाळीने प्रत्येक मुलींच्या batch वर line मारतात. आमचा हे हळुवार संभाषण सुरुच होत की भोयर काकु (ज्या इतका वेळ आमच बोलण चोरुन ऐकत होत्या) म्हणाल्या ' अग नवल काय त्यात त्यां चा बाप त्याच झाडाखाली उभा रहातो अन आम्हा बायकांवर................' वाक्य पुर्ण करायची गरजच पडली नाही काय ते अम्ही समजलो.
आता इतका जबरदस्त family background असल्यावर सुरेश मुलींच्या मागे लागण्यात 'पटाइत' झाला. लहान होता तेवा जरा आतोक्यात होता पण मोठा झाल्यावर विचारुच नका. 'आ..........समान मे टॅणॅणॅऊऊऊऊऊउ..........''(सरफरोश मुवी आठवा) असा ताचा गेटप असायचा. तसा दिसायला बरा होता. दहावी पर्यत चालढकल करत पास झाला पण दहावीचा मोठा 'गड्डा' समोर आला. पहील्या खेपेत सर्वाच्या अपेक्शा खर्‍या ठरवत सुरेश 'नापास' झाला. दुसर्‍या, तिसर्‍या............ अशा कितीतरी 'खेपा' लवल्या त्याने दहावी पास व्हायला. (नापास झालेली मुल स्वतालाच विचारु लागली 'क्या आप सुरेश से तेज है.....????') पण शेवटी तो पास झालाच. त्याची जिद्द बघुन सगळ्यानाच आश्चर्य वाटल. पण कॉलेज सुरु झाल आणि सुरेश ची ही 'जिद्द' का होती ते लगेच लक्शात आल. सुरेश तसा चतुर होता, म्हणज मुलीं ची छेड काढुनही मार खाल्ला नव्हता. पन 'नशीबाचा फेरा ' कुणाला चुकला म्हणा त्याचाही नंबर आलाच.........
झाल अस की त्याच्या ग्रुप मधल्या मुलांनी याला एकदा बम 'चढवला'.........
एक झण -' अबे सुर्‍या मानला लेका तुले का मस्त line मारत बे पोरीं वर हा......आमाले नाइ जमत.'
दुसरा - 'नाइ त का बे..........त्याच्या सारखी स्टाइल बी पाइजे तवा जमते......'
तिसरा- अबे झाडाखाली झुरन्याले (झुरणा= वात बघणा) काय्ची आली स्टाइल .........आ....... अरे थ्या पोरीच्या डोक्यातली क्लीप काढुन दाखवली तर मानीन त्याले
सुरेश स्वताची अशी 'तोहीन' ऐकुन ताडकन उठला ' अबे जा न उंदरा..........लेका क्लीपच नाइ तर पोरगी बी घेउन येतो..... लाव शर्यत...........बस तु हीतच......'
सुरेश उठला खरा पण जस जस त्या मुलीच्या जवळ तो येत होता त्याचे पाय लट्लट कापायला लागले. आता इथुनच पळुन जाव असही त्याला वाटल पण त्याच्या 'स्टेट्स' चा प्रश्ण होता. घबरतच तो त्या मुलीमागे गेला आणि इकडे -तिकडे बघुन त्याने तिच्या डोक्यातली क्लीप खसकन ओढली. ती मुलगी जोराने किंचाळली सगळे धावत आले काय झाला ते बघायला. तिने घडला ते सांगीतला त्यावर public खवळली. सुरेश ला शोधु लागली यात ते बेट लावणारेही होतेच 'लडकी का मामला है भाइ impression जम गया तो फिर क्या बात है.' सगळे सुरेश ल शोधत होते पण तो केवच पळाला पन किति पळणार सापडलाच शेवटी. आता आणखी काय होणार लोकानी त्याला चोपलाच . काही लाथा, काही बुक्क्या, काही उगाच आवाज करत होते........नको ते 'इल्जाम' त्याच्यावर लावत होते. शेवटी पोलीस मधे आली आणि त्याचे 'प्राण ' वाचवले.
काहीसा भुर्दड भरुन त्याने सुरेशला सोड्ले. बिचारा खुप दिवस अन्थरुणातच होता. सुदैवाने हाड शाबुत होती कालांतराने बरीही झाली पन एक ट्रॅ़जीडी झाली ती म्हणजे सुरेश चे वरचे साइडचे दोन दात तुट्ले.....
हा त्याच्या जिवनातला पहीला 'असा' मार खाण्याचा प्रसंग........ सगळ्याना वाटला आता तो ' सुधारेल्'..........पण या वेळी मात्र सगळ्याच्या अपेक्शा फोल ठरल्या.
सुरेश नव्या उमेदीने कामाला लागला. हा पण या प्रसंगा मुळे तो जरा सावध झाला. आता मुलीं ची छेड तो ' जरा बचके ' काढु लागला..... असेच दिवस पालटले. झाल गेला विसरुन मित्रही एक झाले. जुने मित्राअ जाउन नवे मित्रा आले. अस होणाअरच होत कारण सगळे कॉलेज मधुन पास होउन निघुन गेले , सुरेश थोडीच ' पास' व्हायला आला होता. तो आपला njoy करत होता. असच मित्रानी मळुन एकदा ट्रीप काढली........ सगळेच जोश मधे होते आणि नको तेवा त्यातल्या एकाचा 'होश' गेला आणि त्याचा accident झाला.
त्याच्या मागे सुरेश बसला होता. 'सुदैवाने' दोघना ही फार लागला नाही पण यावेळी सुरेश चे खालचे दोन दात पड्ले...........
पुन्हा सुरेश 'बिचारा' झाला. पण नाउमेद नाही झाला. 'दात बचेंगे तो और भि बोलें गे' अस तो म्हणु लागला. असेच १-२ प्रसंग झाले की जात 'सुदैवाने' बाकी काही झाल नाही पण सुरेश चे दात मात्र पड्ले. आता तर त्याच्या बोलण्यातही त्यामुळे फरक जाणवु लागला. पोरग काइ शिकत नाइ निदान धंद्याले तरी लावाव म्हणुन त्याचे बाबा त्याला दुकानावर घेउन जाउ लागले. पण त्याच कै मन रमल नाही. दुसरा उपाय म्हणुन लग्न करायच ठरवल तर मुलीचे बाप याला नाकारु लागले. कारण एव्हाना तुम्हाला कळल असेलच.
त्याची आई बिचारी सांगत फिरायची 'अव सगला बरोबर हाय व पन ह्यान तोंड उघडला का सार ब्रम्हान (ब्रम्हांड) दिसते ना व, तितस सम्दा जाते'. बरा दातांच्या डॉक्टर कडे जाउन कवळी बसवण्या इतके पैसे आणण त्याना कठीण होता. अशीच चाल -ढकल सुरु होती .
आता सुरेशही जरा नरमला होता. मुलीं ची छेड काढणा तर दुर बघतही नवता. हा एखादी 'worth watch' असेल तर एक नजर टाकयचा बस्स. देवही वरुन बघत होता.
सुरेश च अस निरस जिवन कदाचित त्यालाही बघवला नाही. म्हणुन त्याने आपला १ डाव टाकला. आमच्या गावाला दर वर्षी जत्रा भरायची. त्यात आकाश पाळणे , खुप प्रकरचे खेळ, सर्कस वगैरे मजा असायची. असाच एकदा गावात प्रथमच 'मोत का कुवा' चा खेळ होणार होता. लोकाची खुप गर्दी. सुरेश ही गेला हा खेळ पहायला. त्याला सगळ्यात शेवटच्या खेळाची तिकिट मिळाली. सगल्याच्या तोंडुन कौतुक ऐकुन त्याची उत्सुकता वाढली. अखेर खेळ सुरु झाला. मोटारसायकल वर दोघा जण आपले कौशल्या दाखवु लागले. शिट्ट्या , टाळ्या.......... नुसता आवाज. सुरेश ही त्यात मागे नव्हता एकदम पहिलेच्या जोशात तो आनंद लुटत होता. काही जण पैसे फेकत होते . ते बघुन यालाही चेव आला , यानेही खिशातली १० ची नोट काढली. पण बाकिच्यां प्रमाणे फेकुन नाही का द्यायची या पठ्ठ्याने ती नोट आपल्या हातात धरली आणि वाकुन त्या मोटारसायकल चालवण्यार्‍याला दिली. अस एकदा नाही तर तिनदा केला. आणि नको ते झाल तिसर्‍या प्रयत्नात याचा तोल गेला आणि हा खाली पडला. लगेच खेळ थंबला , सगळी कडे गडबड झाली. लगेच सुरेश ल इस्पीतळात हलवल. त्याच्या घरचे आले. आत जायला कोणालाच परवानगी नव्हती. त्याची आई जेवा खोलीच्या बाहेर आली तेवा सगळे तिला बघु लागले,सगळ्याना ऊत्सुकता होती ती 'दातांना' काही झाला का याची. त्याची आई म्हाणाली ' वाचवला माझ्या लेकराला देवानी............सुदैवाने कहीही झाला नाही शरीराला............' अहो पण व्हयचा ते झालच सुरेश चे यावेळी समोरचेच दात गेले हो. सगळ्याना वाईट वाट्ल. बिचारा. त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी उपचाराला घेउन गेल्याच समजल. सगळे हळ्हळ व्यक्त करत होते. आणि मनातल्या मनात 'आता सुरेश कसा दिसत असेल.....???? ' याच चित्र तयार करत होते.
दोन दिवस उलटले आणि सुरेश त्याच्या आई- बाबा सोबत आला.तो पर्यन्त त्याच्या 'थोबडा'चे नक्शे मनात कढुन झाले होते. त्याला बघायला वेटाळातल्या लोकांची गर्दी झाली. बायकांच बाकी मधे बोलुन झाला होता ' चानगला हाय व लेकरु', ' देव बी एकेकाले कसे दिवस दाखवते बघा', 'अस नव्ता व्हाले पाईजे', ' अव आता कोन देइन व पोरगि त्याले'.............. असे एक ना अनेक वाक्य बोलली जात होती. गाडी घराजवळ येउन थांबली . पहीली आई उतरली , मग बाबा उतरले आणि एखाद्या हिरो सारखा हा शेवटी उतरला आणि आश्चर्य........ अहो सुरेश मस्त ' दातांसकट ' हसत -हसत बाहेर पडला. आता मात्र लोकांना काय बोलाव सुचत नव्हता. ते दात 'खोटे' आहेत हे तर नक्की होत, पण अचानक पैसे आले कुठुन. या गोष्टीचा खुलासा नन्तर झाला. या चामरेकर कुटुंबीयांनी त्या खेळाच्या मालकाला धमकावला की पैसे दे नाही तर तुमचा खेळ बंद पाडु.
बिचारा त्याच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता.
आता सुरेश पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागला. पण 'नशिबाचा फेरा ' आडवा आलाच. आता स्मार्ट झालेला पोरगा घेउन त्याचे बाबा आणि तो मुलगी बघायला गेले. पसंती वगैरे सगळी झाली आणि 'अघटीत' घडला. एव्हाना सुरेश ला 'कवळीची' सवय झाली होती हो पण त्या दिवशी माहीत नाही काय झाला ते. जेवण झाल न सगळे पान खात बसले. कोणी तरी जोक मारला अन सगळे जोरात हसले. जसा हा हसला अन 'भर्-सभेत' अहो पानासकट कवळी तोंडाबाहेर पडली. कोणाला काहीच कळत नव्हता. शेवटी हेही लग्न मोड्ला. आता आपल्या मुलाचा लग्न होइल ही आशा पन आई वडिलानी सोडली.
या घटने नंतर तर सुरेश 'कवळी' पण लपवु लागला. बोलणा कमी झाला पन त्यामुळे धंद्यात त्याच मन मात्र रमल. काही नाही तर पोरग 'सुधरल' याचच सगळ्याना समाधन होता. देवही बघत होता. ' somebody somwhere is made for you' अस म्हण्तात ना सुरेश च्या बाबतीत उशीरा का होइना हे खर झाल. एका कमी शिकलेल्या पण चतुर मुलीने त्याला 'कवळी' सकट स्विकारल. नशीबाचा फेरा यावेळी त्याच्या बाजुने फिरला............आणि तो त्याच्या गतीने फिरतोच आहे.

मौजमजा

प्रतिक्रिया

शितल's picture

15 Jul 2008 - 4:11 am | शितल

राधे,
मस्त लिहिले आहेस
व्यक्ती वर्णन छानच जमले आहे.

(३२ दात असलेली )
अक्कल दाढा अजुन येत आहेत ;)
शितल.

रामदास's picture

15 Jul 2008 - 7:04 am | रामदास

विदर्भ एक्सप्रेस का काय?
या अगोदरची ढोकळ्याची आणि ही सुरेशची दोन्ही गोष्टी आवडल्या.

प्राजु's picture

15 Jul 2008 - 7:59 am | प्राजु

दोन्हि व्यक्ती वर्णनं आवडली
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

15 Jul 2008 - 8:00 am | यशोधरा

मस्त सांगितली आहेस गोष्ट राधा.
वेटाळात म्हणजे काय?

राधा's picture

15 Jul 2008 - 5:45 pm | राधा

वेटाळ = society

राधा's picture

15 Jul 2008 - 5:45 pm | राधा

वेटाळ = society

मदनबाण's picture

15 Jul 2008 - 8:22 am | मदनबाण

जसा हा हसला अन 'भर्-सभेत' अहो पानासकट कवळी तोंडाबाहेर पडली.
=)) =))
अवांतर :--त्याने दंत विमा काढुन ठेवाला हवा होता बराच फायदा झाला
असता !!!

मदनबाण.....

राधा's picture

15 Jul 2008 - 5:47 pm | राधा

हा हा हा............. सुरेश भेटला की त्याला हे नक्की सुचवेन........

kittu's picture

15 Jul 2008 - 9:23 am | kittu

एकदम झकास... :)
आसमानमे ... लाखो तारे टॉटॅणॅणॅऊऊऊऊऊउ =)) =))
अजुन येउ देत...

सहज's picture

15 Jul 2008 - 10:18 am | सहज

इंट्रेस्टिंग.

अजुन येउ द्या.

मस्त जमलय राधे .. सुरेश ची नौका पार झाली तर शेवटी ..

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jul 2008 - 11:51 am | बिपिन कार्यकर्ते

मजा आली वाचताना. और आने दो...

बिपिन.

विसोबा खेचर's picture

15 Jul 2008 - 12:08 pm | विसोबा खेचर

मजा आली वाचताना. और आने दो...

हेच म्हणतो..!

ऋषिकेश's picture

15 Jul 2008 - 1:40 pm | ऋषिकेश

कथा आवडली.. मस्तंय!
पण नाव व्यक्ती आणि व्यक्ती का?

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

राधा's picture

15 Jul 2008 - 5:55 pm | राधा

कारण 'व्यक्ति आणि वल्ली ' लिहीण्यासाठी मी पु. ल. इतकी महान नाही ना हो..........

प्रमोद देव's picture

15 Jul 2008 - 7:04 pm | प्रमोद देव

वा! राधे मस्त लिहिलं आहेस!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

साती's picture

15 Jul 2008 - 8:23 pm | साती

छान लिहीलेय्.विशेषतः बोलीभाषेतील संवाद.
साती

राधा's picture

15 Jul 2008 - 11:17 pm | राधा

आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद...........

आपल्या सगळ्यांच्या शाबसकीच्या व टिकेच्या प्रतिक्षेत,
राधा

अनिल हटेला's picture

16 Jul 2008 - 8:15 am | अनिल हटेला

धन्य हो राधे!!!

छान चित्रण उभे केलेयस अगदी डोळ्यासमोर आला सुरेश !!

अजुन येउ देत !!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~