.....आणि बाकी शून्यात ...........!!

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
22 Aug 2013 - 12:01 pm

तुझे एकेक विचार
जपलेत मनांत,
तूच दिलेले श्वास
आज पिंजऱ्यात......!!

आज पिंजऱ्यात
जन्मा जन्माची साथ,
तन बंबाळ जखमांनी
अन वाट पायात......!!

वाट पायांत अन
आग दही दिशात,
होरफळत चाललो मी
तुझ्या एका वचनात......!!

तुझ्या त्या वचनात
प्रेम बलिदानात,
हृदय घायाळ पण
हसं डोळ्यात.......!!

हसं डोळ्यात
वाराही शांत,
थकून गेलो मी
शेवटच्या सहवासात........!!

तुझ्या शेवटच्या सहवासात
अनोळखी क्षणात,
पानगळीच जगणं
आणि बाकी शून्यात ...........!!
.....आणि बाकी शून्यात ...........!!

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

22 Aug 2013 - 3:35 pm | स्पंदना

सु रे ख!
निव्वळ अप्रतिम!

psajid's picture

23 Aug 2013 - 11:42 am | psajid

तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहे. अश्या प्रोत्साहनपर शब्दांनी लिहण्याचा नवीन उत्साह येतो. पुन्हा एकदा धन्यवाद !

निरन्जन वहालेकर's picture

24 Aug 2013 - 9:14 am | निरन्जन वहालेकर

सुन्दर ! खुप आवडली ! ! !

किसन शिंदे's picture

24 Aug 2013 - 9:33 am | किसन शिंदे

फारच सुरेख लिहलीये कविता.

पैसा's picture

24 Aug 2013 - 5:35 pm | पैसा

रचनेतला वेगळेपणा आवडला.

सुधीर's picture

25 Aug 2013 - 10:27 pm | सुधीर

आवडली कविता.