असणे नसणे

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
22 Aug 2013 - 11:20 am

जगण्यात उगिच सजते असणे
अक्षरांत झिंगवते नसणे
असणे नसणे ओसांडे मन
हसण्यात सदा किण किण श्रावण

आभास सदा पथदूर कुठे
शोधासा कठिण पडते कोडे
मेघावळ पिंजुन एकांती
धड धड करते काळिज वेडे

आकाश; खोल पोकळ वासा
आवेग; न ठावे थांग जसा
पवनासाहि ना कळलेले हे
वाहतो सवे निशिगंध कसा

………………… अज्ञात

शृंगारकविता

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

23 Aug 2013 - 4:43 am | स्पंदना

पावना के पवना?
म्हणजे निशिगंधाचा सुवास पवनासवे वाहिल .

अज्ञातकुल's picture

23 Aug 2013 - 1:31 pm | अज्ञातकुल

"पवना" च हवे. पण पला इथे दुरुस्त करता येत नाहीये :(

स्पंदना's picture

24 Aug 2013 - 5:03 pm | स्पंदना

केल्या गेल्या आहे.:)

अज्ञातकुल's picture

25 Aug 2013 - 11:25 am | अज्ञातकुल

हे कस झालं मला माहित नाही. ज्याने केलं त्याला धन्यवाद.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Aug 2013 - 2:49 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

नेहमीसारखी दमदार नाही वाटली. नाही?
कां मलाचं निट कळली नाही?

अज्ञातकुल's picture

23 Aug 2013 - 4:35 pm | अज्ञातकुल

असाही प्रतिसाद मिळाला तरी आवडेल. धन्यवाद मिका. :) मात्र आज ती का आवडली नसेल याचा अंदाज मला लावता येणं अवघड आहे. असो.

प्रसाद गोडबोले's picture

26 Aug 2013 - 5:23 pm | प्रसाद गोडबोले

सेम हीयर

पैसा's picture

25 Aug 2013 - 11:35 pm | पैसा

मलाही जरा उलगडत नाहीये.

आतिवास's picture

26 Aug 2013 - 11:57 am | आतिवास

अक्षरांत शिंगवते
हे समजण्याची वाट पाहते आहे.

यशोधरा's picture

26 Aug 2013 - 12:00 pm | यशोधरा

हो, हे मलाही नाही समजले.

अज्ञातकुल's picture

26 Aug 2013 - 1:30 pm | अज्ञातकुल

खरं तर ते "झिंगवते" असं आहे पण दुरुस्त कसं करायचं ते माहित नाही.

पैसा's picture

26 Aug 2013 - 1:32 pm | पैसा

दुरुस्ती केली.

अज्ञातकुल's picture

26 Aug 2013 - 3:16 pm | अज्ञातकुल

"शोधासा" ऐवजी "शोधास" असे करता आले तर तेही करावे प्लीज. :)