संस्कृती

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
20 Aug 2013 - 9:27 am

संस्कृती जाहली मरणप्राय
जगवणारी तुरळक गणती
मेली संस्कृती केंव्हाच
सर्वत्र जाहिरात होती ll १ ll

संपली, काळवंडली संस्कृती
उजळवणारी तजवीज थोडी
गाडून टाकणारी तिजला
गर्दी संपत नव्हती ll २ ll

जमवाया लोक जागृतीस
मित्रास कळविला मोर्चा
बघू उद्या म्हणाला
दुरूनच हात केला ll ३ ll

दुष्परिणाम कथित प्रगतीचे
तुडवीत संस्कृती होते
मात्र लोकांना याचे
अप्रूप काहीच नव्हते ll ४ ll

रक्षणास बोलावता
आले उपायास नव्हते
विकृतीचे बसता फटके
ते मोर्चात सामील होते ll ५ ll

मुक्तक