क्षण
क्षण हातातुन निसटुन जातात
काही क्षण क्षणिक तर
काही रुतून बसतात.
सुखाची झुळुक
तर दुखाची वादळ
झुळुक क्षणिक
तर वादळ रेंगाळतात.
क्षण हातातून निसटुन जातात
मागे पाहताच क्षण ओळख विसरतात
काही मात्र मानगुटीवरची
भूत बनतात.
क्षण हातातून निसटुन जातात
काही दिवाळी असतात
काही होळी असतात
काही सुखाची मोळी बांधतात.
क्षण हातातून निसटुन जातात....
प्रतिक्रिया
19 Aug 2013 - 4:49 am | स्पंदना
छान!
19 Aug 2013 - 9:29 am | अत्रुप्त आत्मा
क्षण भर अवडली.
19 Aug 2013 - 9:58 am | दत्ता काळे
सुखाची झुळुक
तर दुखाची वादळ
झुळुक क्षणिक
तर वादळ रेंगाळतात.
.. मस्तं
19 Aug 2013 - 1:10 pm | प्रसाद१९७१
क्षण हातातून निसटुन जातात
मागे पाहताच क्षण ओळख विसरतात
काही मात्र मानगुटीवरची
भूत बनतात. >>>
मस्त च!!!
19 Aug 2013 - 1:24 pm | प्रभाकर पेठकर
वास्तव असलं तरी कवितेला असणारी, निरुत्साहित करणारी दु:खद आणि निराशाजनक झालर मन काजोळून टाकते.
सुख आणि दु:ख दोन्ही आयुष्याला समृद्ध करणार्या भावना आहेत. दु:खांकडून येणारी परिपक्वता अंगीकारून, प्रत्यक्ष दु:खांना विसरण्याचा प्रयत्न करावा आणि सुखकारक आठवणींना गोंजारावे जेणे करून आयुष्याला एक सकारात्मक दृष्टीकोन लाभेल.
19 Aug 2013 - 3:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
आवडली कविता.
अवांतरः माझी क्षण कविता आठवली. काहीसे हेच मांडण्याचा प्रयत्न होता त्यात.