रंग उमलत्या मनकळीवर
दारिद्र्याचा ठसा उमटतो,
अळणी जीवन काय कामाचे
सावलीकडूनही 'दु:स्वास' होतो !!
मोहोरभरल्या अम्राला
वाटसरुही पाईक होतो,
भार ओसरता मग भूमीला
पोटातील मुळ्यांचा 'त्रास' होतो !!
उमंग , इर्षा , धडपड पाहता
त्याचा सन्मान 'खास' होतो,
थकून डोळ्यावर हात घेता
आंबल्या स्वप्नांचा 'वास' येतो !!
कूजट कुबट दारिद्र पाहून
तापला जीव कासावीस होतो,
मूडदुसलेली मान्स बघून
हाती घेतला 'घास' राहतो !!
कसं जागीवल आजपातुर
बाप संघर्षाचा पुतळा वाटतो,
वजनाच्या या दुनियेत मातुर
शिकून आयुष्याचा 'नास' होतो !!
काळोखात किरण दृष्टी पडता
कुठेतरी अस्तित्वाचा भास होतो,
झेप घेता अनंतामध्ये
गुदमरतो, बंद 'श्वास' होतो !!
श्री. साजीद यासीन पठाण
दह्यारी ता - पलूस, जिल्हा - सांगली
प्रतिक्रिया
14 Aug 2013 - 12:06 pm | स्पंदना
क्या बात है।
14 Aug 2013 - 12:30 pm | कवितानागेश
छान अभिव्यक्ती.
14 Aug 2013 - 2:28 pm | जेपी
*****
14 Aug 2013 - 2:51 pm | मदनबाण
मस्त !
14 Aug 2013 - 8:11 pm | Bhagwanta Wayal
खुपच छान